Home राजकीय घडामोडी सरकारच्या भरवश्यावर राहू नका; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सरकारच्या भरवश्यावर राहू नका; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0
सरकारच्या भरवश्यावर राहू नका; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

www.janvicharnews.com

नितीन गडकरी कायमच आपल्या अनोख्या कार्यशैलीसाठी तसेच स्पष्टोक्तीकरिता चर्चेत असतात. केवळ भाजपमधील मोदी शहा भक्त वगळता मूळ भाजपा विचारधारेच्या लोकाकडून विशेषत विरोधकाकडून हि गडकरींच्या कामाचं कौतुक होते. गडकरी म्हणजे स्पष्ट वक्ते. भाजपचे सरकारमधील नितीन गडकरी हे एकमेव नेते असुन ते परखडपणे स्वतच्या भुमिका मांडताना दिसतात. यावेळी नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना अनोखा सल्ला दिला आहे. नागपुरात अॅग्रो व्हिजन फाउंडेशनच्या वतीन विदर्भातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी संधी या विषयावर हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नितीन गडकरी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. दरम्यान गडकरींनी शेतकऱ्यांना मोलाचा वास्तविक सल्ला दिला

www.janvicharnews.com

स्वतःच्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी स्वत प्रयत्न करा स्वतः मार्केट शोधा. सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून तुम्हाला सांगतो असे सुचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी करून सरकारला अप्रत्यक्ष घरचा आहेर दिला. तसेच आपल्याकडे लोकांचा विश्वास सरकार आणि परमेश्वरावर खूप असतो. मात्र, लग्न झाल्यानंतर नवविवाहितांनी प्रयत्न केले नाहीत आणि परमेश्वर आणि सरकारने कितीही इच्छा व्यक्त केली तरी घरी पाळणा हलणार नाही असा विनोद करून हशा पिकवला.

माझं मार्केट मी शोधलं आहे, तुमचं मार्केट तुम्ही शोधा, असा मोलाचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजीपाला व फळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला आहे. तसेच शेती क्षेत्रात प्रगती करायची असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढे आले पाहिजे. तरच शेतकरी वर्गाचा विकास होईल, स्वावलंबी आणि मार्केटची जाण असणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्या” असा सल्ला देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here