Home महाराष्ट्र अजित पवार यांची अवस्था “घर का ना घाट का”

अजित पवार यांची अवस्था “घर का ना घाट का”

0
अजित पवार यांची अवस्था “घर का ना घाट  का”

महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची तोडफोड करून सत्तेची खुर्ची एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांना दिली खरी परंतु सत्तेची चावी मात्र भाजपाने आपल्या हातात ठेवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता दिल्लीश्वरांच्या इशारावर चालते आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे गट (मूळ शिवसेना) आणि भाजपा यांचे वैचारिक सख्य जुने आहे त्यामुळे यांच्या एकत्र येण्याला महाराष्ट्र समजू शकते पण भाजपाने ज्या प्रकारे शिंदे गटाला सोबत घेऊन पुन्हा सत्ता मिळवली तो प्रकार सर्वसामान्य जनतेला आवडला नाही तिथे शिंदे गटाला गद्दारीचा कलंक लागला तसेच जनमानसात खोके मंत्री असा उल्लेख केला जातो.एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली आणि भाजपाच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्यांनी त्यांचे राजकीय इप्सित साध्य केले पण अजित पवार आणि त्यांचा गट हा तर भाजपाने न फोडताच सत्तेच्या वळचणीला गेला. अजित पवार गट हा विकासासाठी सत्तेत सामील झाला असे अजित पवार गटातील नेते सांगत असतात. भाजपाच्या ध्येय धोरणावर टीका टिप्पणी करणाऱ्या अजित पवार यांना सत्ता जाताच खुर्ची जाताच भाजपाच्या विकासाचा साक्षात्कार झाला असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापने अगोदर आणि नंतरही शरद पवार यांच्या वरदहस्ताने अजित पवार हे सतत सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांना वयाच्या 14 व्या वर्षापासून ते आज वयाच्या 64 व्या वर्षापर्यत जे काही दिले ते अख्या महाराष्ट्राला माहित आहे. पण सत्तेत राहण्याच्या लालसेने आणि भाजपाच्या अमिषाला बळी पडून अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी फोडली आणि आता ते अजित पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत. अजित पवार यांनी भाजपाला विकासासाठी पाठींबा दिला आहे असा युक्तिवाद अजित पवार गट करत असतो पण जनमानसांच्या प्रतिक्रिया काहीशा वेगळ्याच आहेत..

अजित पवार गटाने भाजपाला पाठींबा दिला कारण अजित पवार यांच्या सह 9 नेते जे आज मंत्रिमंडळात आहेत ते कोणकोणत्या घोटाळ्यात अडकले आहेत त्यांच्यावर ईडी सीबीआय इन्कम टक्स विभाग चौकश्या लावणार नाही म्हणून ते भाजपा सोबत गेले. हे सर्वसामान्य जनतेचे ठाम मत झाले आहे. 

अजित पवार आगीतून उठून फुफाट्यात?

पवार गट सत्तेत का गेला? याच एक हि ठोस कारण सत्तेत सामील झालेले अजित पवार सह त्यांच्या गटातील एक हि मंत्री आमदार देवू शकत नाही.

आज सत्ता असूनही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही,

दिल्लीच्या आदेशाशिवाय सही नाही ना अंमलबजावणी नाही,

सत्तेतील खुर्ची मिळाली पण खुर्चीला असलेले अधिकार काढून घेतले,

शरद पवार यांचा वरदहस्त असतांना पक्षात आणि राज्यात चालणारी दादगिरी संपली, भाजपाने अजित पवार यांना कपातून बशीत आणले त्यामुळे दादा थंड झाले आणि थंड झालेला चहा लोक काय करतात हे वेगळ सांगण्याची आवश्यकता नाही 

आज अजित पवार राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत पण  हिंदी आणि इंग्रजी भाषा व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे अजित पवार राष्ट्रीय पातळीवर काम कसे करणार…

अजित पवार यांनी फडणवीस यांच्या सोबत जो पहाटे शपथविधी केला आणि पुढे जे राजकीय नाट्य घडले ते सर्वश्रुत आहे पण यामुळे भाजपची जी नाच्चकी झाली त्याचा बदला भाजपातील नेते घेणारच..अजित पवार यांनी भाजपला २०१९ मध्ये फसवले भाजपा आता अजित पवार यांना सातवे अस्मान दाखवणार…

अजित पवार हे सत्तेच्या खुर्चीसाठी शरद पवार यांना धोका देवू शकतात तसेच विचारधारेला तिलांजली देवू शकतात तर मग ते भाजपासोबत कसे प्रामाणिक राहतील याची जाणीव ही भाजपा नेत्यांना आहे..

अजित पवार सत्तेसाठी काहीही करू शकतात हे उघड आहे म्हणून आज अजित पवार गटातील नेते मंत्री आमदार हे सावध पवित्र्यात आहेत..

कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी असा दावा केला आहे की अजित पवार गटातील मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करतील तसेच त्यांनी याबाबत असे टविट केले आहे की  “धोके पे धोका ..ऐसा कोई सगा नही जिसे भाजपाने ठगा नाही” या सूचक वाक्या वरून बरेच काही समजून घेता येईल.. अजित पवार गटातील मंत्री आणि बहुतांश आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप हे उघड असल्यामुळे ते स्वत:च्या कातडी बचावासाठी ते भाजपात प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जातो..

अजित पवार हे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिरवत आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष कधी पर्यंत राहतील याचा निर्णय भाजपा करणार आहे. लोकसभेची निवडणूक झाली की अजित पवार यांचे राजकीय वस्त्रहरण भाजपा करणार हे अंतिम सत्य आहे. अजित पवार यांच्या सोबत जे नेते आहेत त्यांची पार्श्वभूमी भाजपाला चांगलीच माहित आहेत. त्यातील काहीजण भाजपाच्या वळचणीला वैचारिक दृष्ट्या पोहचले आहेत. पक्षनिष्ठा फाट्यावर मारून, विवेकबुद्धीला तिलांजली देवून स्व;संरक्षणसाठी बेईमानी करणाऱ्या नेत्यांना ना जनतेची काळजी ना ना देशाची चिंता यामुळे अजित पवारांनी जे पेरले तेच उगवणार असे चित्र दिसते आहे.. अजित पवारांची पक्षीय दादागिरी जवळपास संपलीच आहे पक्षातील मोठे नेते केवळ व्यासपीठावर अजित पवारांची खोटी खोटी स्तुती करतात पण पडद्यामागे वेगळेच राजकारण शिजत असल्याचा वास जनतेला अप्रत्यक्ष येतो आहे..

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील  आणि धनंजय मुंडे यांच्या सह अन्य मंत्री आमदार हे अजित पवार यांच्या मूळ राष्ट्रवादी पक्षातर्गत दादागिरीचे शिकार झालेले आहेत त्यामुळे यातील काही भाजपावाशी होऊन तर काही शरद पवार यांच्या कडे स्व:गृही परतून अजित पवार यांना वाऱ्यावर सोडतील तसेच अजित पवार यांना घर का ना घाट का करतील 

मराठा आरक्षणाबाबत विरोधी भूमिका मंत्री छगन भुजबळ घेत असताना…अजित पवार यांनी शांत बसण्याचे आदेश देवून छगन भूजबळ शांत बसले नाहीत याचा अर्थ एकच भुजबळ अजित पवार यांना पक्ष प्रमुख मानत नाहीत 

मराठा आरक्षणबाबत अजित पवारांनी कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही याचा अर्थ एकच अजित पवार भाजपाच्या आदेशाशिवाय काहीही करू शकत नाहीत अथवा काही बोलू पण शकत नाहीत..

अजित पवारासोबत गेलेले आमदार हे विचाराने शरद पवार यांच्या सोबत आहेत  पण केवळ मतदारसंघात निधी मिळवण्यासठी काही काळ अजित पवारासोबत आहेत आचारसंहिता कार्यक्रम जाहीर आणि निधी वाटपाचा विषय संपला की यातील काही भाजपावाशी होतील तसेच बहुतांश शरद पवार यांच्याकडे येतील 

शरद पवार यांचे न ऐकल्यामुळे पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदार संघातून पराभव झाला याला सर्वस्वी अजित पवार यांचे पुत्रप्रेम जबाबदार आहे.. क्षमता नसताना उभा करणे उचित नाही.. २०२४ च्या निवडणुकीत हि भाजपाच्या आभासी पाठींब्याने पत्नी सुनेत्रा पवार यांना खासदार करायचे स्वप्न अजित पवार पाहत आहेत पण जनतेच्या प्रतिक्रिया पाहता असे दिसते आहे की सुनेत्रा पवार यांचाही पराभव अटळ दिसतो आहे..

ज्या पवार कुटुंबाने अजित पवार यांना खूप काही दिले पण त्या कुटुंबाला परत देण्याची वेळ आली तेव्हा अजित पवार यांनी स्व:कुटुंबाच्या स्वार्थासाठी संपूर्ण पवार कुटुंबाला बाजूला केले. आणि आता जनतेला भावनिक आवाहन करतात की माझे कुटुंब माझ्या विरोधात प्रचार करेल पण ज्या कुटुंबाने तुम्हाला मोठे केले त्या कुटुंबाचा विसर का पडला याचा हिशोब जनता करणार की नाही…

अजित पवार यांनी काय मिळवले आणि काय गमावले?

एकंदरीत अजित पवार यांनी स्व:ताच्या कुटुंबाची नाराजी ओढवून घेतली,

शरद पवार यांनी काका म्हणून अजित पवार यांच्या वयाच्या  14 व्या वर्षापासून ते 64 व्या पर्यत अजित पवार यांना भरभरून दिले त्यांचा जो विश्वातघात केला ते जनतेला आवडलेले नाही 

महाराष्ट्रात दादा नावाने मिळवलेली प्रसिद्धी मलीन झाली,

भाजपा सोबत जाऊन पुरोगामी विचाराची प्रतारणा केली असा संदेश जनमानसात गेला.

भाजपाच्या विकासाचा जो साक्षात्कार अजित पवार यांना झाला त्याबद्दल जनता आश्चर्यचकित झाली आहे  की अजित पवार यांना कोणत्या चष्म्यातून विकास दिसतो आहे

राजकीय विश्वासहार्यतेला गालबोट लागले, शरद पवार गटासह महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची नाराजी तसेच भाजपाने परिपूर्ण स्वीकारलेले नाही.

मराठा आरक्षणाबाबत सत्तेत असूनहि ठोस भूमिका नाही तसेच जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलून मराठा समाजाची नाराजी ओढवून घेतली 

भाजपाकडून कोणतेही ठोस आश्वासन नसताना हि अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे जनतेच्या मनात सांशकता त्यामुळे अजित पवार यांची प्रतिमा आणखीनच मलीन होत असल्याची चर्चा ऐकायला मिळते 

भाजपाचे काही आमदार नेते अजित पवार यांच्यावर डायरेक्ट आरोप करतात तरी अजित पवार मुग गिळून शांत राहतात याचे कारण अजित पवार यांची काहीतरी मजबुरी असल्याची कुजबुज जनतेच्या दरबारात होत आहे 

अजित पवार यांनी कुटुंबाला दुखावले, राजकीय विश्वासहार्यता गमावली, स्वपक्षातील आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या चक्रव्युहात अडकले, अजित पवार यांच्या दादागिरीचा हिशोब चुकता करण्यासाठी सर्व पक्षातील नेते सरसावले आहेत..सर्वात महत्वाचे म्हणजे वडिला समान शरद पवार यांचा वरदहस्त यांपुढे मिळणार नाही…यापुढे चुकीला माफी देऊन सत्तेचा चावी देणारा कोणी वाली अजित पवार यांना मिळणार नाही…अजित पवार यांना यापुढे चुकीला माफी नाही हे मात्र नक्की.. 

अजित पवार यांनी इतके गमावून मिळवले ते असंविधानिक उपमुख्यमंत्री पद आणि अधिकार नसलेले अर्थ खात