Maharashtra Latest News Today, 19 June 2022 : शनिवारी मुंबईत २,०५४ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. १०४ रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर प्राणवायू खाटांवर १७ रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत करोनातून बरे झालेल्यांची संख्या १,७४३ एवढी आहे. तसेच मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के आहे.
www.janvicharnews.com
विधान परिषदेच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली असून, प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या उमेदवारांसाठी शेवटच्या टप्प्यांत पुरेशा मतांचे गणित जुळवण्यावर भर दिला आहे. ‘या निवडणुकीत चमत्कार कसा घडेल हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहील’, असे भाकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तविल्याने महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीच्या पराभवाचे उट्टे काढणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.