Home संपादकीय महाराष्ट्राच्या माणसांची मन मेली आहेत…

महाराष्ट्राच्या माणसांची मन मेली आहेत…

0
महाराष्ट्राच्या माणसांची मन मेली आहेत…
  • नारायण अशोकराव भोसले
    (राजकीय विश्लेषक, इतिहास तज्ज्ञ)

गेल्या काही दिवसांन पासून ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांन कडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सुरु आहे ते खरंच क्लेशदायक आणि महाराष्ट्राच्या काळजावर वार करणारे आहे. भाजप हा पक्ष मुळात कधीच छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा अथवा त्यांच्या संस्कारात चालणार पक्ष नव्हता. तसा त्यांचा इतिहासही नाही. भाजपने कधीच शिवजयंती साजरी केली नव्हती. केवळ शिवसेनेशी युती असल्यामुळे त्यांना काहीठिकाणी कार्यक्रमांना हजर रहावे लागायचे. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त असल्यामुळे भाजप नेत्यांना त्यांच्या सोबत राहावे लागत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वि.टी स्थानकाला देणे असो, रायगडावर महाराजांचे दर्शन प्रत्येकाला करता यावे यासाठी रोपवे असो अथवा मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ हें नाव देणे असो प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर यात फक्त शिवसेनेचा वाटा आहे.

भाजप हा मुळातच शेटजी आणि भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी मराठा लॉबीचा प्रभाव चालत आलाय. हा प्रभाव भाजपने मोडला आणि फडणवीसांच्या हातात संपूर्ण ताकद देऊन मराठा लॉबीला दाबण्याचे काम केले. परंतु मराठा समाजाला नाराज करूनही चालणार नाही म्हणून त्यांनी महाराजांच्या नावाचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी करायचे ठरवले आणि नारा दिला कि, शिवछत्रपतींचा आशीर्वाद….चला देऊ मोदींना साथ. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा आणि मोदींचा एक फंडा आहे कि, ते ज्या ज्या राज्यात जातात तिकडच्या महापुरुषांचे नावं वापरून राजकारण करतात. मोदी राजस्थान मध्ये गेल्यावर सांगतात महाराणा प्रताप माझे आदर्श आहेत, महाराष्ट्रात आल्यावर सांगतात शिवाजी महाराज आदर्श आहेत, पंजाब मध्ये गेल्यावर भगतसिंग त्यांचे आदर्श होतात. हे सर्व निवडणूक जिंकायचे त्यांचे फंडे आहेत.

एकीकडे स्वातंत्रवीर सावरकर यांच्या नावाचा उदो उदो करायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत अवमान करायचा हा अत्यंत हीन प्रकार भाजप कडून सुरु आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांन शिवाय आपण स्वतःची कल्पनाच नाही करू शकत. शिवराय होते म्हणून आपण आहोत. पण छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांच्या विषयी त्या काळापासून बदनामीचे षडयंत्र सुरु आहे. अनाजी पंत पासून चालत आलेली हि परंपरा फडणवीसांन पर्यंत अविरत सुरूच आहे. भाजप शासित कर्नाटक सरकार कडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला, भाजपचा अहमदनगर चा उपमहापौर श्रीपाद छिन्नम अत्यंत शिवराळ अशी भाषा वापरतो, महाराजांच्या मूर्तीची विटंबना हि लहान गोष्ट आहे असा कर्नाटकचा भाजपचा मुख्यमंत्री बोमाई म्हणतो, राज्यपाल कोशियारी महाराजांना जुन्या जमान्याचे आदर्श म्हणतो, भाजपचा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे महाराजांचा एकेरी उल्लेख करतो, भाजपचे सरकार असलेल्या गुजरातच्या आणि गोव्याच्या पुस्तकांन मध्ये महाराजांचा अत्यंत चुकीचा इतिहास छापण्यात आला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधतो सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा शो तयार केला. काय अगदी त्या बोटीतून पाण्यात गेले, जलपूजन वैगरे केले. पुढे काय झाले ? आज ज्या ठिकाणी जलपूजन केले ती जागा देखील त्यांना आठवत नाही. स्मारक तर विसरूनच जा. पण शेजारी गुजरात मध्ये तब्बल ३००० कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचे अतिशय भव्य असें स्टॅच्यू ऑफ युनिटी दिमाखात उभे आहे. महाराष्ट्र जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यावर इतका थंड बसत असेल तर महाराष्ट्राच्या माणसांची मन मेली आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. हेच जर राजस्थान मध्ये महाराणा प्रताप यांच्या विषयी करायची हिंमत भाजपनेते दाखवू शकतील का ? मुळीच नाही. परंतु अनाजी पंताची द्वेषाच्या परंपरेचेच संस्कार भाजपवर आहेत. दुर्दैवानं आजही राज्याच्या सत्तेचे रिमोट कंट्रोल संपूर्णपणे अनाजी पंताच्याच इशाऱ्याने चालत आहे.

प्रत्येक कडवट हिंदू, मराठी माणूस आणि राष्ट्रप्रेमी माणसाला आवर्जून पाठवा !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here