Home राजकीय घडामोडी भ्रष्टाचाराला आमदारांची, मुख्यमंत्रीची मुकसंमती !

भ्रष्टाचाराला आमदारांची, मुख्यमंत्रीची मुकसंमती !

0
भ्रष्टाचाराला आमदारांची, मुख्यमंत्रीची मुकसंमती !

विधानसभा अधिवेशन कशासाठी घेतले जाते,हे सामान्य माणसाला माहिती नाही.तशी माहिती कोणीही आमदाराने अद्यापपर्यंत जनतेला दिली नाही.जनतेला अज्ञान ठेवून, अंधारात ठेवून त्यांना लपवाछपवी करायची असते.आमदार म्हणजे संविधानिक पद आहे, विधायक.विधायक म्हणजे ज्याला कायदा विधीचे ज्ञान असते.तो जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी कायदा बनवण्यासाठी विधेयक मांडतो.त्या विधेयकावर इतर विधायक साधकबाधक चर्चा करतात.काही बदल सुचवतात.ते बहुमताने विधानसभा अधिवेशनात पारीत होते.विधासभा व विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहातून पारीत होऊन अध्यक्षांच्या माध्यमातून राज्यपाल कडे जाते.त्यात काही वाटले तर सुचना देऊन फेरबदल केले जातात.राज्यपालांनी संमती दिली कि त्याचे कायद्यात रूपांतर होते.ही प्रक्रिया राबवतांना आमदार, मंत्री, मुख्यमंत्री यांची सारखीच भुमिका असते.असे विधेयक मांडणारा,त्यावर चर्चा करणारा आमदार हाच खरा लोकप्रतिनिधी मानला जातो.मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली .

माझ्या जळगाव जिल्ह्यातील एकाही आमदाराने अद्यापपर्यंत असे विधेयक मांडले नाही.किंवा मांडले त्यावर चर्चाही केली नाही.असे ठोंबे,दगडधोंडे आमदार आम्ही विधानसभेत पाठवतो.यातच आमच्या लोकशाही हक्काची पायमल्ली होते.आधिकतम आमदार हे दारू विक्रेते,भुखंड लाटणारे आहेत.अशा आमदाराला ही सुबुद्धी येणे शक्यच नाही.मी टपरी चालवत होतो.एक टपरीवाला माणूस आमदार झाला, मंत्री झाला असे गुलाबराव पाटील कितीही तुणतुणे वाजत असले तरीही त्यांनी अठरा वर्षाच्या आमदारकीच्या काळात असे एकही विधेयक काम केले नाही.गुलाबराव देवकर,शिरीष चौधरी, किशोर पाटील,अनिल पाटील,सावकारे भोळे यांना विधेयक म्हणजे काय ,हेच माहित नाही.एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि चिमणराव पाटील यांना संसदीय कामकाजाचे ज्ञान आहे.पण आबा तसे धाडस करीत नाहीत.खडसे चुकीचे काम करुन गोंधळात पडले.महाजन विधानसभा बाहेरील भाजप हॅंडल करतात.निवडणुका लढतात.जिंकतात.त्यामुळे जळगाव जिल्ह्यात अकरा आमदार असूनही एकही विधायक नाही.विधानपरिषदेत स्मीता वाघ,चंदू पटेल,जगवानी यांचे काम शुन्य होते.फक्त निधी मागणे आणि आपल्या चेलेचपाट्यांना ठेके देणे, इतकेच.चंदू पटेल आणि जगवानी यांना तर ते पद पक्षाने ठोक भावात विकले होते.

आमदार, खासदार पदांचा लिलाव होतो,हे जनतेला माहिती असले पाहिजे.तसा आता मंत्री पदाचा सुध्दा लिलाव होतो.खात्याची वसुली वर त्याचा दर ठरतो.छगन भुजबळ आणि अनिल देशमुख हे समुद्रातील हिमनगाचे टोक आहे.फक्त १।९ भाग वर दिसतो .गृह, महसूल,सा.बां.यांची इंडेक्स प्राईस जास्त आहे.जो मंत्री वसुली करू शकतो त्यालाच ही खाती सोपवली जातात.सांगतांना सांगितले जाते कि,त्यांनी गृहखात्याची धुरा सांभाळली.महसूल खात्याची जबाबदारी सांभाळली.सा.बां.खात्याची जबाबदारी पेलली.धुरा, जबाबदारी,पेलणे वगैरे हे जनतेला मुर्ख बनवणारे शब्द आहेत.खरे म्हणजे असे बोलले पाहिजे,कि यांनी गृहखात्याची हप्ते वसुली केली.महसूलची रेती तून संपत्ती मिळवली.रस्ते न बनवता निधी हजम केला.ही कमाई त्या त्या मंत्रीची नसते.यातील काही हिस्सा मुख्यमंत्री ला , अर्थमंत्री ला द्यावा लागतो.म्हणून तर मुख्यमंत्री बनवण्यासाठी कामाख्य देवीला साकडे घालावे लागते.कत्तलखान्यातील गाईंसारखे गाडीत कोंबून आमदारांना पळवून न्यावे लागते.प्राणीमित्र संस्थेने या द्विपाद सफेदपोष प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराकडे अजूनतरी लक्ष दिलेले नाही.कदाचित हे त्याच लायकीचे आहेत,असे समजून कानाडोळा केला असावा.

कोरोना महामारीत सरकारने तिजोरीचे झाकण उघडे ठेवले.त्यातून वाट्टेल तितका निधी उचलायला पालकमंत्र्यांना परवानगी दिली.कंडीशन एकच, मुख्यमंत्रीचा वाटा कोटा सुरळीत पोहचला पाहिजे. ती जबाबदारी आरोग्य मंत्री आणि पालकमंत्री कडे होती.ही जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली.म्हणून उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणालाही दोष दिला नाही.हा त्यांचा मोठेपणा आमचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आरोग्यमंत्री राजेश टोपे कधीही विसरणार नाहीत.कोरोना निधीतून औषधी व वैद्यकीय यंत्रसामग्री न घेता निधी कागदावरच खर्च दाखवला.परिणामी जळगाव जिल्ह्यातील २९९१बाया माणसे ऑक्सिजन व औषधी वाचून तडफडून मेली.अनेक कुटुंब उघडी पडली.याचे पुण्य गुलाबराव पाटील यांना लाभेलच.त्यांचे सुप्तशत्रू चिमणराव पाटील यांनी हा प्रश्न आधी डीपीडीसी मधे उठवला.तेंव्हा पालकमंत्री ने त्यांचा हात दाबला.”आबा, आपलेच सरकार आहे तर लुटायला काय हरकत आहे?” तरीही आबांनी हाच प्रश्न विधानसभेत विचारला.तेथेही उद्धव ठाकरे यांनी पायावर पायाने इशारा केला.”आबा,आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत.बोलू नका.नाहीतर भाजप त्याचा गैरफायदा घेईल.” इकडून गिरीश महाजन यांनी डोळा दाबला,”चालू द्या तुमचे.आमचे जेवण झाले.”असे सर्वच आमदार जेऊन तर्र झाले.दोन्ही खासदार सुद्धा तृप्त झालेत.याला श्राद्ध जेवणे म्हणतात.मृताला,प्रेताला अग्नीडाग दिला कि उष्टी तोंडे करणे म्हणतात. तरीही आम्ही प्रत्येक आमदाराला, दोन्ही खासदारांना भेटून २५९१ मृतात्म्यांची वकालत केली.कि ते ऑक्सिजन व औषधी वाचून तडफडून मेल्यामुळे स्वर्गात एन्ट्री मिळत नाही.ब्रम्हदेव अडून बसलेत.त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना शिक्षा दिली पाहिजे.पण एकाच मंडपातील,एकाच पंक्तीतील पित्तर असल्यामुळे त्यांनी मौन साधले.मौनम सर्वार्थ साधनम ,शांती धनसंपदा च ! शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे कडून अपेक्षा होती.कि हे कधीकधी शेतकरी होते.एकेकळी रीक्षा चालवत.काहीकाळ धर्मवीर आनंद दिघेंचे शिष्य होते.तर आपण त्यांना सांगितले कि भयंकर राग येईल.ते काठी, कुऱ्हाड,रूमणे घेऊन या हत्यारींना बदडून काढतील.आम्ही त्यांना मलबार हिल वर नंदनवन बंगला मुक्कामी जाऊन भेटलो.कैफियत मांडली.

गुलाबराव पाटील यांना मंत्रीमंडळात घेऊ नका.जोपर्यंत त्यांचेरील आरोप निरस्त होत नाहीत.२५९१ मृतात्म्यांना शांती मिळत नाही.तेंव्हा शिंदे साहेबांनी आपली मजबुरी कथन केली.”तुमचे म्हणणे खरे आहे.पण माझी सुद्धा अडचण आहे.कि माझ्या टिम मधे एकही आमदार प्रामाणिक नाही.सर्वच भ्रष्टाचारी आहेत.तर तुम्हीच सांगा ,मी कोणाला मंत्री बनवू ?” एका मुख्यमंत्रीचे असे आत्मविचलन ,रडकंदन आणि अश्रूपतन आम्हाला भिजवून गेले.ऐकून आम्हाला रडू कोसळले. अरे बाप रे! अशा संकटात असलेल्या माणसाला आपण जास्त त्रास देत आहोत.ज्यासाठी ते मुख्यमंत्री बनले,त्याच कामात आपण व्यत्यय आणत आहोत.खंत एकच आहे कि, जळगाव जिल्ह्यातील ते २५९१ मृतात्मे अजूनही स्वर्गातील फाटकावर ताटकळत आहेत.

… शिवराम पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here