धीरूभाई अंबानी म्हणजे “स्वप्न ” सत्यात उतरवणारे अवलिया!
स्वप्न पाहणं माणसाचा स्वभावधर्म आहे.
‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असं म्हणतात,
ते खरंच आहे
www.janvicharnews.com
१९४९ सालातल्या एका सायंकाळची गोष्ट आहे. एडन मधल्या बर्मा शेल अवलिया तरुण काम करत होता. स्वप्नांच्या दुनियेत रमणाऱ्या ह्या युवकाचे इमाने इतबारे काम सुरु होते. अचानक कुणाचा धक्का लागला अन् थोडेसे पेट्रोल सांडल . तसा पेट्रोल पंपाचा मालक खवळला. तरुणाचा हात धरून ढकलले आणि कडाडला” फालतू स्वप्न बघत फिरतोस, कामावर लक्ष नाही. चल निघ. नको येवू उद्यापासून कामावर ” तसा तो पोर उसळला. ” अरे जा! मला नाही गरज नाही. माझ्या स्वप्नांना बोलू नकोस. ती तर मी पुर्ण करेलच आणि परत येईल नातो तुझ्यापेक्षा मोठा होऊनच !” पाहता पाहता अनेक वर्षांचा काळ लोटला आणि एके दिवशी एक अलिशान कार पेट्रोलपंपाच्या समोर येवून थांबली. एक व्यक्ती साधारणपणे गाडीतून खाली उतरला. पेट्रोलपंपाच्या मालकासमोर जाऊन म्हणाल उभा राहिला अन त्याला विचारले ,“ओळखलत का मला? ” हा मालक म्हणाल नाही? तशी ही व्यक्ती कडाडली , ” मी तोच , ज्याला तुम्ही तुमच्या पेट्रोल पंपावरून हाकलून दिले होते आणि सांगितले होत की स्वप्ने पाहू नकोस, आज माझे स्वप्न पूर्ण झालय. भारतातल्या प्रत्येक शहरात माझा पेट्रोल पंप आहे मी तोच ! धिरुभाई अंबानी !! हा तोच माणूस ज्याने भारतीयांना स्वप्ने पहायला शिकवले.
सर्वसामान्य कुटुंबामध्ये कधी कधी अशा असामान्य व्यक्ती जन्म घेतात कि ज्या कर्तृत्वाने इतिहास घडवून जातात आणि त्या इतिहासाची पाने कुटुंबापुरती मर्यादित राहात नाही ती जगाला अभ्यासावीच लागतात असाच इतिहास धिरुभाईंनी घडवला. सुरुवातीच्या काळात रस्त्यावर धिरुभाईना फळे विकून दिवस काढावे लागले. पण दिवसभर रस्त्यावर फळे विकणारे धिरुभाई सायंकाळ झाल्यावर एका मोठ्या हॉटेलात जाऊन चहा प्यायचे. एके दिवशी त्यांचा सोबतच्या फळविक्रेत्याने त्यांना विचारले, ” धीरुलाल आपली कमाई सारखीच आहे मग आम्ही सगळे विक्रेते हातगाड्यावर जाऊन पंचवीस पैशाची चहा पितो, मग तुच का मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन एक रुपयाची चहा पितो? ” धिरुभाईनी उत्तर दिले . ” मला तुमच्या सोबत ढाब्यावर चहा प्यायला कधीच आवडत नाही. पण तुमची स्वप्ने खूप छोटी असतात. मोठ्या हॉटेलमध्ये बसल्यावर मोठे कसे व्हायचे हे मला समजते. म्हणून मी मोठ्या हॉटेलमध्ये चहा पितो ” ” जितना बडा सोचोंगे उतना बडा बनोंगे ” हा विचारच धिरुबाईंना जगातला आघाडीचा उद्योगपती बनवून गेला !एकेकाळी ३०० रूपये महिना पगारावर पेट्रोल पंपावर काम करणारा हा अवलिया ज्यावेळी स्वत : च्या कारखान्याच्या इमारतीसाठी बँकेकडे कर्जाची मागणी करत होता. त्यावेळी बँकांनी स्पष्ट शब्दात नकार कळवला. धिरुभाईंनी सरळ सरळ जनतेतूनच पैसा उभा करायला सुरुवात केली. उद्योग जगतात प्रचंड खळबळ माजली. भारतीय उद्योग क्षेत्राला हे सगळे नवीन होते. पण जगसामान्याची नस ओळखलेल्या धिरुभाईनी हे सत्यात उतरवून दाखवले.१९९५ सालापर्यंत धिरुभाईनी जनतेतून ६४२३ कोटी रुपयांचे भांडवल उभे केले होते. ह्या माणसाच्या जीवनाचे तत्वज्ञान अगदी साधे सरळ होते. तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या चाकोरीबध्द विचारांना सोडून वरच्या कक्षेत विचार करायला शिका, यश तुमच्या पायशी लोळण घेईल. ह्या तत्वज्ञानाने रिलायन्सची निर्मितीला जन्म घातला.
१९८६ साली ९०० कोटी रुपयांच्या रिलायन्सचा वर्धापन दिन साजरा झाला . त्यावेळी पत्रकारांनी धीरुभाईला विचारले आता तुमचे पुढचे स्वप्न काय आहे धिरुभाई तात्काळ कडाडले, पुढच्या दहा वर्षात मला रिलायन्सची उलाढाल ८००० कोटीपर्यंत घेऊन जायचीय. दुसऱ्या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांनी धिरुभाईची खिल्ली उडवली. काहीनी सपनोका सौदागार म्हणून हेटाळणी केली. पण धिरुभाई थांबले नाहीत त्यांनी आपली वाटचाल सुरूच ठेवली आणि त्यावेळी १ ९९ ६ साल उडाजले त्यावेळी सर्वांच्या लक्षात आले की, रिलायन्सची उलाढाल ७८०० कोटींवर येवून पोहचली होती. स्वप्न पाहात असतांना तुम्ही जर त्यांचा यशस्वी पाठलाग केला तर तुमची वाटचाल रोखणे कोणालाच शक्य नाही. असाच त्याचा अर्थ निघतो. परंतु हा पाठलाग सोपा नाही, त्यासाठी शेकडो अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. अनेक अवघड प्रसंगांना सामोरे जावे लागते . धिरुभाईच्या आयुष्याचा लेखाजोखा सुध्दा तसाच आहे. सातत्याने यशस्वी घोडदौड करीत असतांना धिरुभाईच्या आयुष्यात एक वर्ष अस उदभवले की सगळी रिलायन्स अक्षरक्ष : सैरभैर झाली. नफ्याचे मुख्य स्रोत असणाऱ्या नरोदा येथील कारखान्यामध्ये कामगारांनी संप पुकारला, त्यामुळे नव्याने उभ्या राहत असणाऱ्या कारखान्यांचे काम थांबले. मोठा भाऊ रमणिकलाल कुटुंबातुन विभक्त झाला आणि या सगळ्या तापातुन धिरुभाईंनी पक्षाघाताचा झटका आला. “तब्येत इतकी बिघडली की त्यांना मुंबईच्या जसलोक रुग्णालयातुन सरळ,अमेरिकेत हलवावे लागले.
सर्वत्र बातमी पसरली रिलायन्सचा बुडबुडा फुटला ” अंबानी संपले ” लाखो गुंतवणुकदारांमध्ये खळबख माजली.” प्रत्येकाचे लक्ष ऑगस्ट महिन्यातल्या रिलायन्सच्या वार्षीक सभेकडे होते आणि हर एक जण विचार करीत होता की वार्षीक सभेला धिरुभाई येणारच नाहीत. कारण एकीकडे रिलायन्सचे आर्थिक दिवाळे निघाले आणि दुसरीकडे पक्षाघातामुळे धिरुभाईना उभे सुध्दा राहता येत नाही. अशावेळी ते येऊच शकत नाही. ऑगस्ट महिना उजाडला. बैठक सुरू झाली आणि काही क्षणात पक्षाघाताने आजारी असणारे धिरुभाई स्वतःच्या पायावर चालत आले. हा संपूर्ण देशासाठी आश्चर्याचा धक्का होता. त्यावेळी बोलतांना धिरुभाई कडाडले ” रिलायन्स थांबण्यासाठी नाही तर धावण्यासाठी जन्माला आली आहे. आम्ही थांबणान्यातले नाहीत आणि तरीदेखील ज्यांना कुणाला विश्वास नसेल त्यांनी सरळ माझ्याकडे यावे आणि आपली गुंतवणुक परत घेऊन जावी, मी द्यायला तयार आहे ” अपेक्षेप्रमाणे गुंतवणुक घ्यायला परत कुणी आल नाही, परंतु महत्वाची गोष्ट ही आहे की त्यावेळी धिरुभाई जवळ दमडी सुध्दा नव्हती. आत्मविश्वास मात्र हत्ती एवढा होता कारण त्या आत्मविश्वासाला प्रयत्नांची जोड होती. त्यांच्या कार्यालयाबाहेरचा सुरक्षारक्षक आजही सांगतो की ” बारा तास काम करुन रिलायन्समधुन सर्वात शेवटी बाहेर पडणारी व्यक्ती ही धिरुभाई असायचे ” ‘ बिझनेस ऑफ द इअर ‘ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देत असतांना बिझनेस इंडियाने त्यांचे वर्णन नव्या भारताच्या स्वप्नांचे प्रतिक असे केले होते ते उगाच नाही !!
धीरूभाई अंबानी यांचे अनमोल विचार
www.janvicharnews.com
मोठा विचार करा, जलद विचार करा, पुढे विचार करा. कारण विचार करणे ही कोणाच्या बापाची मालमत्ता नाही.
जिद्द आणि परिपूर्णतेने काम केल्यास यश नक्कीच मिळेल.
कठीण काळातही आपले ध्येय सोडू नका आणि प्रतिकूलतेचे संधीत रूपांतर करा.
तरुणांना चांगले वातावरण द्या. त्यांना प्रेरणा द्या. त्यांना हवा तो आधार द्या. त्यातील प्रत्येक एक अफाट उर्जेचा स्त्रोत आहे. तो करेल.
माझा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील एक समान घटक म्हणजे नाते आणि विश्वास. हा आपल्या विकासाचा पाया आहे.माझा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांच्यामध्ये
अंतिम मुदतीपर्यंत काम पूर्ण करणे पुरेसे नाही, मी मुदतीपूर्वी काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
एक दिवस धीरूभाई निघून जातील. मात्र रिलायन्सचे कर्मचारी आणि भागधारक ते चालवत राहतील. रिलायन्स आता एक कल्पना आहे. ज्यात अंबानींना काही अर्थ नाही.
आपली स्वप्ने मोठी असावीत. आपली महत्त्वाकांक्षा उच्च असली पाहिजे. आमची बांधिलकी खोल असली पाहिजे आणि आमचे प्रयत्न अधिक असले पाहिजेत. रिलायन्स आणि भारतासाठी हे माझे स्वप्न आहे.