तुळशीचे अध्यात्मिक महत्व
भारतिय समाजांत,, तुळशिला मानाचे, पूजनिय, धार्मिक स्थान आहे. समुद्रमंथनातून जेव्हा अम्रुत निघाले, तेव्हा त्याचे काहि थेंब जमिनिवर पडले. त्यापासून * तुळस* या वनस्पतीचा जन्म झाला असे म्हणतात.
प्रत्येकाच्या अंगणात, गँलरीत, अगदी..,, डालडा,, च्या डब्यात का असेना, पण तुळस हि विराजमान असतेच.
नित्यनेमाने तिची पूजा केली जाते. सांजवेळी तिच्यापुढे दिवा लावल्या जातो….,,नैव्येद्द्यावर तुळस ठेवल्याशिवाय तो परिपूर्ण समजल्या जात नाही. म्हणूनच मग म्हटल्या जाते..,, हलवाईच्या घरावर तुळशिपत्र,,.. पंढरपुरच्या विठोबाच्या गळ्यात तुळशिचि माळ घातल्या जाते पूजेच्या वेळेस.. तुळस ही लक्ष्मीचे रूप मानले जाते…
तेव्हा अश्या या बहुगुणि वनस्पतिचे औषधि गुण म्हणून देखिल, आयुर्वेदात मोलाचे महत्व आहे.🌿
आरोग्याच्या बाबतीत तुळस अधिक गुणकारी
- तुळस हि कफनाशक, पाचक,आहे.
२) सर्दी, पडसे, कफ, खोकला, दमा, यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे.,
३) तुळशिची पाने व आले व गूळ पाण्यात उकळून हा काढा घेतल्या जातो.
४) तुळशीची पाने जेवल्यानंतर खाल्यास पचन चांगले होते.
५) तुळशीचा काढा, रस, कायम प्राशन केल्यास..,, मूत्रपिंडाची क्षमता वाढते. रक्तातिल कोलेस्ट्रोल कमी होते..
६) कोलायटिस, अंग दुखणे, मेदव्रूद्धि, डोकेदुखि यांवर तुळस गुणकारी आहे…
७)उचकी लागल्यास तुळस खावी
८) तुळस खाल्याने स्मरणशक्ति वाढते.
९) तुळशीच्या मंजि- या म्हणजे तुळशिची फूले, त्यात पाणि, दूध, व साखर घालून पिल्यास युरिन स्वच्छ होते..
१०) अर्धांगवायू, व संधिवातात तुळशिच्या पानांच्या काढ्याचा वाफारा घेतला जातो…
११) निद्रानाशावर काळ्या तुळशिच्या पानांचा काढा घेतात.
१२) तुळशीच्या पानात कर्करोग, ह्रदयरोग, किडनिचे विकार आणि त्वचारोग बरे करण्याचि अपूर्व शक्ति आहे.
१३) उष्णतेच्या विकारांत तुळशीचे बी पाण्यात भिजत घालून त्याचि खिर घेतात.
१४) तुळशीचि पाने दह्यात घालून खाल्यास शरिरातील अतिरिक्त मेद, चरबी, झडते.
१५) पांढरे कोड, गजकर्ण, दाद, खरूज, नायटा, घामोळ्या, इसब, या सर्व त्वचाविकारांवर तुळस गुणकारी आहे….
१६) तुळशीच्या झाडासमोर दीर्घश्वसन केल्यास फुफूत्साचे आजार बरे होतात….
१७) परदेशात देखिल ,, बेसिल,, म्हणून तुळस वेगवेगळ्या पदार्थांत वापरल्या जाते…
१८) तीव्र ताप असेल तर याचा काढा घ्यावा…
१९) चंदन, व तुळस एकत्रित करून तो लेप मस्तकावर द्यावा… डोकेदुखी थांबते….
२०) तुळशीच्या पानांची पावडर करून मोहरीच्या तेलात मिसळवून त्याने दात घासल्यास,, सर्व प्रकारचे दंतरोग बरे होतात..हिरड्या मजबूत होतात…
२१) मध व तुळशिचि पाने चावून खावित…. सुगंधामुळे मनप्रसन्न राहते.
तुळस सौंदर्यवर्धक आहे. पिंपल, मुरूमे, पुरळ बरे होतात.. तिच्या पानांचा वाटुन लेप लावावा..डागदेखील राहत नाही. त्वचा टवटवित राहते. व चमकदार होते..
२२) तुळशीत असलेले,, ,, इगेनाँल द्रव्य,, मधूमेहावर नियंत्रण ठेवते…
तुळशीच्या पानांचा रस १० ते २५ मि. लि. घ्यावा..
२३)शरिरातील रोग प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी मदत होते.. थकवा दूर करते…
२४) लहान बाळांच्या आंघोळी च्या पाण्यात तुळस टाकावि… कारण ती जंतूनाशक आहे.
२५) विविध संक्रमणापासून वाचवते…,, अँटि बँक्टेरिअल,, आहे.. म्हणूनच चंद्र व सूर्य ग्रहणाच्या वेळि, आजही अनेक घरांत, अन्नात, व पाण्यात तुळस घालून ठेवतात.
२६)तुळस घरांत असल्यास हवा शुद्ध होते.
२७ मौखिक स्वास्थ..दातांच्या वेदना, मुख दुर्गंधि, चव नसणे, तोंड येणे, अल्सर, सूज हे सर्व त्रास दूर होतात तुळशिच्या सेवनाने..
२८)तुळशीतील कँम्फेन, किनोल, युग्नोल, कार्वकोल, व मिथाईल, चार्वाकोल या औषधीय घटकांमूळे डोकेदुखी जाते…
२९)डोळ्यांकरताः। डोळ्यांत संक्रमण झाल्यास, तुळशिच्या पानाने डोळे धुवावेत… डोळ्यांचि सूज, डोळे जळजळणे, यांवर तुळशिच्या तेलाचे २,३ , थेंब डोळ्यात घालावे… जठरांत दुखणे, डांग्या खोकला, काँलरा, हात- पाय, दुखणे यांवर वेदना शामक आहे..
३०) पचनसंस्थेचे कफ दोष वाढल्याने पोट जड होते. सुस्ती वाढते. तोंडाला चव नसते. अश्या वेळि तुळशीची पाने, व आले यांचा चवीपूर्ति साखर घालून केलेला चहा घोट घोट घ्यावा..
३१) उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे. यांवर ती उत्तम काम करते..
३२) तुळशीच्या लाकडापासून जपमाळ करतात. ती गळ्यात घातल्यास , कंठाचे आजार, गालगुंड, थायराँईड हे आजार नियंत्रित राहतात..
अशी ही..धार्मिक व औषधियुक्त वनस्पति प्रत्येकाच्या अंगणात पाहिजेच..
आयुर्वेद अभ्यासक…..सुनिता सहस्रबुद्धे….