पावसाळी वातावरणात द्राक्ष बागेची घ्यावयाची काळजीश्री.सतिश भोसले
नमस्कार द्राक्षबागायतदार बंधुनो,
www.janvicharnews.com
सध्याच्या हवामान अंदाजानुसार येणार्या आठवड्यात सर्वच द्राक्ष विभागांत दि.१२ ते १७ डिसेंबर दरम्यान पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बर्याच विभागांमध्ये द्राक्ष बागा या वेगवगळ्या स्टेजमध्ये आहेत. कालपासून काही विभागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी तर थोडाफार पाऊस ही झाला आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या स्टेजनुसार फेलफूट ते दोडा अवस्था, फुलोरा अवस्था, सेटिंग अवस्था, पहिली डिप अवस्था, दुसरी डिप अवस्था अशा अनेक अवस्थेत द्राक्ष बागा आहेत. यावेळी घड जिरणे, गळकुज समस्या, डाऊनी आणि भूरी रोग समस्या, क्रकिंग समस्या अशा स्टेजनुसार अनेक समस्या निर्माण होऊ शकतात या समस्या सोडविण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून रोगांचा प्रादुर्भाव नष्ट करावा. त्यासाठी खालील प्रमाणे ऊपाय योजना कराव्यात व योग्य त्या अवस्थेनुसार योग्य त्या स्पर्शजन्य व आंतरप्रवाही औषधांच्या फवारणी घ्याव्यात. त्याच बरोबर अन्नद्रव्यांची पुर्तताही वेळोवेळी करावी ज्यामुळे वेलीत रोग प्रतिकार शक्ती वाढून वेल रोगास बळी पडनार नाही…
एकात्मिक नियंत्रण :-
सर्वात महत्वाचे म्हणजे या कालावधीत द्राक्ष वेलीमध्ये स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांची भरपुर प्रमाणात उपलब्धता राहिल याची काळजी घ्यावी यामुळे द्राक्ष वेलीमध्ये आंतरिक रोग प्रतिकार शक्ती वाढेल व पिक सहजासहजी रोगांला बळी पडणार नाही.
अ) जैविक नियंत्रण:-
अशा पावसाळी वातावरणात ट्रायको + बँसिलस किंवा ट्रायको + सुडो या सारख्या बँक्टेरीयाच्या फवारण्या आवश्यक आहेत..
पिकांमध्ये Induced Resistance Power वाढविण्याचे काम फक्त बँक्टेरिया करतात. रोगांच्या प्रतिबंधक उपायासाठी खुप प्रभावीपणे कार्य करतात.
पाऊसात किंवा पाऊसाळी वातावरणात जैविक बुरशीनाशके ही प्रतिबंधात्मक (Preventive) आणि उपचारात्मक (Curative) या दोन्ही पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात . म्हणून पाऊस येण्यापूर्वी किंवा संपल्यावर देवअमृत बॅसिलस (बॅसिलस सबटिलिस) ३ मिली + देवअमृत ट्रायको (ट्रायकोडर्मा व्हिरीडी) ३ मिली किंवा देवअमृत सुडो (सुडोमोनास फ्लोरोंसिस ) ३ मिली + देवअमृत ट्रायको (ट्रायकोडर्मा व्हिरीडी) ३ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी द्यावी. ज्याचा फायदा डाऊनी, करपा, भूरी तसेच घड गळकूज पासून द्राक्ष वेलीचे संरक्षण होते. त्यामुळे रोगाच्या नियंत्रणासाठी बायोअमृत ट्रायको आणि बायोअमृत बॅसिलस याचा वापर फवारणी व आळवणी मधून अवश्य करावा.
आळवणी :- फळ छाटणीच्या दोन ते चार दिवस अगोदर बायोअमृत ट्रायकोची आळवणी १ लिटर प्रति एकर अशा प्रकारे पहिला डोस घ्यावा त्यानंतर दर १५ दिवसांनी फळ पिकण्याच्या अवस्थेपर्यंत बायोअमृत ट्रायकोची आळवणी घ्यावी. यामुळे रोगांचे मातीतील जे जुने स्पोअर्स असतील किंवा ज्या वेगवेगळ्या हानिकारक बुरशी किंवा त्यांचे अवशेष असतील तर त्याचा नायनाट होईल. तसेच यादरम्यान ट्रायकोडर्मा हि मित्र बुरशी एक प्रकारचे रसायन बाहेर टाकते या रसायनाचा उपयोग करून वेल किंवा वनस्पती आपली आंतरिक रोग प्रतिकार शक्ती वाढवते व त्यामुळे डाऊनीसारख्या बुरशींना प्रतिकार करण्याची क्षमता वेल किंवा वनस्पती यामध्ये येते.
फवारणी :- साधारणतः फळ छाटणीनंतर ते मणी सेटिंग पर्यंत बायोअमृत ट्रायको + बायोअमृत बॅसिलस आणि बायोअमृत ट्रायको आणि बायोअमृत सुडो या जैविक उत्पादनांचा आलटुन पलटून फवारणीसाठी किमान ५ ते ६ वेळा वापर करावा. पावसाळी वातावरणात जैविक उत्पादनांचा वापर केल्यास अत्यंत प्रभावशाली रिजल्ट्स मिळतात. या जैविक उत्पादनाचा वापर डाऊनी रोगांच्या नियंत्रणासाठी ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणीसाठी तर ५ ते १० मिली आळवणीसाठी करावा. याप्रमाणे १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा पिकात फवारणी करावी. वरील बुरशी रोगाच्या बुरशीवर उपजीविका करते त्यामुळे रोग नियंत्रणास तसेच प्रतिबंधास मदत होते.
ब) ब) सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण :-
फंगीनिल १ ते २ मिली आणि निमकरंज किंवा गार्डप्लस १ ते २ मिली आणि स्टीकोस्प्रेड ०.५ ते १ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. कीड आणि रोगांच्या विरोधी लढण्याची क्षमता वाढीसाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन १ मिली प्रति लिटर तसेच कायनेटिन घटक असणारे कीटोगार्ड २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फुलोरा अवस्थेपूर्वी २ वेळा फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण:-
आपल्या परिसरात पाऊस झाला असेल किंवा येणार असेल अशा परिसरात द्राक्ष बागांमध्ये डाऊनी या रोगावर प्रतिबंधक ऊपाय म्हणुन सकाळी लवकर दव पडत असतील तर झेड -७८ – ५०० ग्रॅम + देवअमृत प्रोफायटर (पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड) – ५०० ग्रॅम असा स्प्रे घ्या आणि आपल्या विभागात पुढील २ दिवस पाऊस आहे असे संकेत असतील तर अशा ठिकाणी Systemic औषधांची फवारणी करुन द्यावी, दुपारी पाऊसाची उघडीप भेटताच मेलोडी ड्यूओ किंवा अक्रोबॅट + पाॅलिराम या औषधांची फवारणी घ्यावी.
१) फूट फुटल्यानंतर ३ ते ५ पान अवस्थेत कॉपरयुक्त बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी यामध्ये कॉपर हायड्रॉकसाईड या स्पर्शजन्य बुरशीनाशकांची १.५ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे एकत्र मिसळून फवारणी घ्यावी. कारण सुरवातीला फुटींची श्वसन क्षमता चांगली असते कॉपर या घटकामुळे काही वाढीस आवश्यक मिनरल्स पानात घेण्यास मदत होते. त्याचबरोबर कॉपर हे पान, खोड, काडी यावर एक कवच तयार करते ज्याचा उपयोग रोगांचा प्रतिरोध करताना होतो म्हणजे डाऊनी रोग सहजासहजी पानात प्रवेश करू शकत नाही.
२) फूट फुटल्यानंतर ७ ते १० पान अवस्थेत वातावरण खराब असल्यास चांगल्या बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. यामध्ये CAA (Carboxylic Acid Amides Working Group) ग्रुपचे कोणतेही एक यामध्ये डिमेथोमॉर्फ किंवा इप्रोवॅलीकर्ब् अधिक प्रोपीनेब किंवा मँडीप्रोपामिड यापैकी एकाची फवारणी घ्यावी. या घटकांची फवारणी ५ ते ७ दिवसांच्या अंतराने किमान दोन वेळा घ्यावी चांगले परिणाम दिसून येतील.
३) त्यानंतर साधारणतः ३५ ते ४० दिवसांच्या आतमध्ये एक Next Generation चे Curative बुरशीनाशक ज्यामध्ये QiI (Quinone inside
Inhibitors) ग्रुपचे अमिसुलब्रोम १७.७%SC w/w किंवा अमिसुलब्रोम २०%SC w/v हे १५० मिली प्रति एकरी फवारणीसाठी वापरावे. या कालावधीत आंतरप्रवाही बुरशीनाशकांसोबत झायरम किंवा प्रोपीनेब किंवा मेटीराम यापैंकी कोणतेही एक स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरावे.
४) ४० ते ५० दिवसांच्या कालावधीत जर वातावरण खराब असेल व डाऊनीस पोषक असेल तर सायमोक्झॅनील अधिक मॅंकोझेब या बुरशीनाशकांचा फवारणीसाठी २.५ ते ३ ग्रॅम उपयोग करावा किंवा सोलो सायमोक्झॅनील २.५ ग्रॅम ने देखील वापरता येईल.
५) जर छाटणीनंतर ५० दिवसांपुढे बाग पोचलेली असल्यास अशा बागेमध्ये देवअमृत प्रोफायटर (पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड) २ ते ३ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम मिसळून फवारणी करावी. शक्य झाल्यास शेंड्याच्या काही पानांवर वाढलेली डाऊनी काढून टाकावी.
६) जर फुलोऱ्याच्या जवळपास बाग असल्यास आंतरप्रवाही बुरशीनाशके उदा. डायमिथोमार्फ (५० टक्के) १ ग्रॅम व मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रॉपीनेब संयुक्त बुरशीनाशक ३ ग्रॅम किंवा मॅन्डीप्रोपामीड ०. ६५ मिली प्रति लिटर अधिक २ ग्रॅम मॅन्कोझेब, सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर मिसळून फवारावे.
७) फुलोऱ्याच्या जवळपास असलेल्या बागांमध्ये डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी दोन फवारण्यांतील अंतर आता पाच ते सहा दिवसांपर्यंत वाढविल्यास धोका राहणार नाही.
विविध अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांना करावयाच्या उपाययोजना खालीलप्रमाणे :-
(फवारणी प्रमाण २०० ली पाण्यासाठी)
१) फेलफूट ते दोडा अवस्था:-
फेलफूट ते दोडा अवस्थेत असलेल्या बागांना पहिली फवारणी देवअमृत प्रोफायटर – ५०० ग्रॅम + चिलेटेड कॉपर – ५०० ग्रॅम फवारणी घेणे. यामुळे फॉस्फरसची पानातील लेव्हल वाढून रोगप्रतिकारक क्षमता अधिक होईल.
दुसरी फवारणी अन्ट्रोकॉल ५०० ग्रॅम + फ्लॉवर बूस्ट २५० मिली प्रति २०० लिटर पाण्यासाठी एकत्र मिसळून फवारणी घ्यावी, या दरम्यान अतिरिक्त असलेली फुट काढून घेणे. विरळणी व्यवस्थित करणे. घडाखालची पाने काढणे.
अतिरिक्त वाढणारा शेंडा थांबविण्यासाठी पोटॅशियम शोनाइट ५०० ग्रॅम + रिचर २५० मिली स्प्रे घ्यावा.
२) फुलोरा अवस्थेत असलेल्या बागांसाठी :-
– गळकुज होऊ नये याकरीता देवअमृत प्रोफायटर – ५०० ग्रॅम + फंगीनील ५०० मिली स्प्रे घ्यावा.
– कीड नियंत्रणासाठी सिलऍक्टिव्ह २५० मिली + गार्डप्लस ५०० मिली
– लवकर सेटिंग होण्यासाठी गोल वाणांसाठी रिचर – २५० मिली + फ्लॉवर बूस्ट २५० मिली
– लंब गोलाकार वाणांसाठी पॉईंटर – ५०० मिली + फ्लॉवर बूस्ट २५० मिली हा स्प्रे घ्यावा.
३) सेटिंग ते पहिली डिपिंग या अवस्थेत :-
बायोअमृत ट्रायको, बायोअमृत बॅसिलस आणि बायोअमृत सुडो ह्या तिन्ही जैविक बुरशीनाशकांची एकत्रित फवारणी घ्यावी. पावसाळी ढगाळ वातावरणात जैविक बुरशींनाशके उत्तम काम करतात.
– डिपिंगमध्ये GA सोबत भुरी /डावणी नियंत्रणसाठी फंगीनील – २५० मिली एकरी जरूर वापरावे.
– बहुतांश बागेत कॅल्शियमची कमतरता मोठ्या प्रमाणात असल्याने पुढे फुगवण व मनी क्रॅकिंग समस्या उदभवू शकते याकरिता ड्रीपणे एकरी १ ते २ ली न्यूट्रीकॅल ११% अवश्य देणे.
– बागेतील मुळी ऍक्टिव्ह असल्यास, फिक्स झालेली NPK खते वेलीला उपलब्ध झाल्यास फुगवण होत राहते याकरिता बायोअमृत स्लरी किट अवश्य वापरावे.
– योग्य औषध, योग्य डोस व योग्य वेळ ह्या त्रिसूत्रीचा वापर केल्यास कमी खर्चात रोगावर नियंत्रण करता येते. पावसाळी वातावरणात डावणी भुरी नियंत्रनासाठी कॅनोपी मॅनेजमेंट हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने द्राक्ष बागेत भरपूर खेळती हवा आणि सूर्यप्रकाश पाहिजे, याकरिता अतिरिक्त फुटी काढून घेणे गरजेचे आहे.
वरील पद्धतीने नियोजन केल्यास रासायनिक घटकांचा वापर कमी होईल तसेच रोग नियंत्रणास चांगली मदत होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल. द्राक्ष पिकांमध्ये डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उत्पादनाचा दर्जा घटण्यासोबतच उत्पादनामध्येही घट होते. त्यामूळे वेळीच नियंत्रण केल्यास उत्पन्नात वाढ होते.
द्राक्ष पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, भरघोस फळधारणा, फुगवण, चकाकी आणि संपुर्ण रोग व कीड नियंत्रण व भरघोस ऊत्पादनासाठी देवअमृत अॅग्रोटेकची दर्जेदार व विश्वसनीय उत्पादने एकदा अवश्य वापरून पहा…
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!
शेतकरी हितार्थ
—-
!! अन्नदाता सुखी भव: !!
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
विचार बदला! जीवन बदलेल!!