शेवगा लागवड….
www.janvicharnews.com
हवामान :
शेवग्याच्या उत्तम वाढीसाठी सम व दमट हवामान चांगले. तापमान २५ ते ३० अंश से. मध्ये झाडाची वाढ चांगली होते. मात्र ४० अंश से. पेक्षा अधिक तापमान असल्यास फुलगळ होते. सर्वसाधारपणे ७५० ते १००० मि.मी. पर्जन्यमान असलेल्या भागात हे पीक येऊ शकते. हे पीक उष्ण तापमानाला व मोठ्या काळोख्या रात्रीला फार संवेदनशील आहे. फुले येण्याच्या कालावधीत जर पाऊस असेल तर फुलांचा मोहर गळतो. एकसारखे ढगाळ वातावरण या पिकास हानीकारक असते. त्यामुळे फुलोरा उशिरा येऊन उत्पादनात घट होते. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या हवामानात शेवग्याची लागवड करतात. उष्ण व दमट हवामानात शेवग्याची वाढ चांगली होते. जमीन :
हलक्या ते मध्यम आणि पाण्याचा योग्य निचरा होणान जमिनीत तसेच डोंगर उताराच्या जमिनीत हे पीक चांगले येते. भारी काळ्या जमिनीत शेवग्याची झाडे जोमाने वाढतात. शाखीय वाढ माजते व त्यामुळे अशी झाडे केवळ फोफावली जातात. परिणामी शेवग्याचे उत्पन्न कमी होते. अशा जमिनीत हे पीक जिरायत म्हणून घ्यावे. चोपण जमिनीत शेवग्याची वाढ चांगली होत नाही. शेवग्यासाठी निवडलेल्या जमिनीचा सामू ६ ते ६.५ च्या दरम्यान असावा.
वाळूमिश्रित पोयट्याच्या जमिनीत शेवग्याचे उत्पन्न चांगले येते. डोंगर उतारावर तसेच हलक्या माळरानाच्या भरड जमिनीतही शेवग्याची वाढ चांगली होते. परंतु चोपण जमिनी या पिकास उपयुक्त नाहीत. भारी काळ्या जमिनीत शेवग्याचे झाड जोमाने वाढते. परंतु त्याला शेंगा कमी लागतात. उत्तम निचऱ्याच्या जमिनी लागवडीसाठी निवडाव्यात. शेवगा हे उंच वाढणारे झाड असल्यामुळे शेवगा लागवडीसाठी भारी,
काळ्या व खोल जमिनी अतिशय चांगल्या माळावर किंवा मुरमाड जमिनीतसुद्धा शेवगा चांगला वाढतो. परंतु काळ्या जमिनीत शेवगा जेवढा विस्तारीत होतो. तेवढा माळरानाच्या व मुरमाड जमिनीत विस्तारीत होत नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास शेवगा हा जमिनीबाबत विशेष चोखंदळ नाही.
शेवग्याची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस करावी. शेवग्याला दुष्काळी लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस करावी. शेवग्याला दुष्काळी पट्ट्यात डिसेंबरात फुले येतात. तर मार्च-एप्रिलमध्ये शेंगा राहतात. कोकणात पाऊस भरपूर असतो, हवा ढगाळ असते, उन्हाळा कडक नसतो. त्यामुळे कोकण तसेच कोकणसदृश पाऊस व हवामान असलेल्या कोल्हापूरच्या आजरा, राधानगरी, गडहिंग्लज व पुण्याच्या वेल्हे, भोर व वडगाव मावळ या तालुक्यात शेवग्याचा हंगाम १६ आठवडे इतका चालतो. अभिवृद्धी :
शेवगा झाडाची अभिवृद्धी बियांपासून रोप तयार करून आणि फाटेकलमापासून केली जाते. भरपूर शेंगा देणाऱ्या आधुनिक जातीच्या जातिवंत झाडांच्या ५ ते ६ सें.मी. जाडीचे व सुमारे १ ते १.२५ मीटर लांबीच्या फांद्या लागवडीसाठी वापराव्यात. फाटे लावताना ते सहा इंच) जमिनीत गाडले जातील याची काळजी घ्यावी. फाट्याच्या वरच्या बाजूला शेणाचा गोळा लावावा व ते रोप जून-जुलैमध्ये ठरलेल्या ठिकाणी लावावे..
हंगाम व लागवड :
शेवगा शेती व्यापारी पद्धतीने करावयाची असल्यास आधुनिक तंत्र वापरणे आवश्यक आहे. सुरुवातीस शेतीची निवड केल्यानंतर बहुवर्षीय जातीची लागवड करताना दोन झाडांतील व दोन ओळींतील अंतर ४ मीटर ठेवावे. बुटक्या जातीची किंवा कमी आयुष्य असणाऱ्या जातींची लागवड २.५ ते ३.५ मीटर अंतरावर करावी.
कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरने शेवगा पिकात वळण व छाटणी तंत्रज्ञान विकसित करून हलक्या जमिनीत ८ बाय ८ आणि मध्यम जमिनीत १०
बाय १० फुटांवर लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. वरील अंतर ठेवून जमिनीची आखणी केल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ६० बाय ६० बाय ६० सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्ड्यांमधील वरची चांगली माती अधिक एक घमेले शेणखत, १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० ग्रॅम कार्बारिल पावडर किंवा लिंडेन टाकून खड्डे मे महिन्याच्या शेवटी भरून घ्यावेत. पेरणीपूर्वी बिया कार्बेर्डेझिम या बुरशीनाशकाच्या द्रावणात (०.१ टक्के) २४ तास बुडवून ठेवल्यास बियांचा रुजवा चांगल्या जोमाने होतो. बियांपासून तयार केलेल्या रोपांची जून-जुलैमध्ये लागवड करावी.
खते :
शेवगा हे पीक खतास उत्तम प्रतिसाद देते. त्यामुळे कोरडवाहू तसेच बागायती शेवगा लागवडीमध्ये शिफारसीप्रमाणे खते देणे गरजेचे आहे. कारण काही वेळा खतांच्या अयोग्य वापरामुळे दुष्परिणामदेखील पहावयास मिळतात. असमतोल किंवा प्रमाणापेक्षा जास्त खते दिल्यास बागायती क्षेत्रात शेवग्याची झाडे नुस्तीच अवाढव्य माजतात. परिणामी शेंगांचे प्रमाण घटते. शेवग्याच्या झाडांना दिल्या जाणान्या रासायनिक किंवा सेंद्रीय खतांचे प्रमाण हे शिफारसीनुसारच असायला हवे. व्यापारी तत्त्वावर लागवड करावयाची झाल्यास प्रथम जमिनीच्या प्रतवारीनुसार आणि माती परिक्षणानुसार कोणती खते कमी आहेत व कोणती खते द्यावयास नकोत याचादेखील अभ्यास केला पाहिजे. रासायनिक खते द्यावी लागत असतील तर तेथे पाण्याची उपलब्धता नेमक्या हंगामात रहावयास हवी. या बाबींचादेखील विचार करावयास पाहिजे. अन्यथा खतांचा अपव्यय होतो. सुरुवातीच्या काळात म्हणजेच खड्डे भरताना सिंगल सुपरफॉस्फेट १ ते २ किलो अधिक ५ ते १० घमेले चांगल्या कुजलेल्या शेणखतांची आवश्यकता असते. यानंतर शेवग्याला प्रतिवर्षी १० किलो शेणखत त्याच्या बुंध्यालगतची आळी चांगली चाळून घेऊन त्यात मिसळून द्यावे. पहिल्या एक-दोन मोठ्या पावसानंतर रासायनिक खते देणे गरजेचे आहे. यामध्ये ७५ ग्रॅम नत्र म्हणजेच १६५ ग्रॅम युरिया + ५० ग्रॅम स्फुरद म्हणजेच ३१५ ग्रॅम सुपर फॉस्फेट व ५० ग्रॅम पालाश म्हणजेच ८५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असे खतांचे प्रमाण ठेवून ती एकत्रित मिसळावीत आणि सदरील मिश्रण शेवग्याच्या झाडाला बांगडी पद्धतीने द्यावे. काही वेळा शेतकरी बांधवांकडे रासायनिक खते उपलब्ध असतात. अशावेळी उपलब्ध मिश्रखते शेवग्यास हिशोब करूनच द्यावीत. खत दिल्यानंतर शेवग्यास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
शेवगा पिकास जास्तीत जास्त सेंद्रीय खते वापरणे फायद्याचे आहे. कृषी विज्ञान केंद्र सोलापूरने शेवग्याला प्रतिवर्षी प्रतिझाडास १० किलो शेणखत, २ किलो स्टेरॉमिल मेहनतीच्या वेळी (छाटणीनंतर आळे बांधताना) आणि जून महिन्यात दर झाडी २०० ग्रॅम १८:१८:१० हे खत बांगडी पद्धतीने दिले नंतर फलधारणेच्या कालावधीत एका झाडास ५० ग्रॅम युरिया दिला. जर शेवग्याचे वर्षातून दोन बहार घ्यावयाचे झाले तर वर सांगितल्याप्रमाणे रासायनिक खते जानेवारीत व फलधारणेच्या कालावधीत पुन्हा द्यावीत.