janvicharnews.com
महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आज खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते ती जागृत व्हावी आणि समाजात हे त्यांच्या विषयीआरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी हे गरजेचे आहे. आहार,चांगल्या सवयी,योगा आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांच्या आरोग्य टिकणे आवश्यक आहे.समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे महिला आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या बदलत्या जीवन शैलीमुळे स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग या आजारांना महिलांना तोंड द्यावे लागत आहे.आज महिला चुल आणि मूल या पलीकडे गेल्या आहेत.घराबाहेर पडून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या भारतातील महिला मात्र हवे तेवढे लक्षात येत नाही.शहरातील सुमारे तीस टक्के महिलांना स्तनाचा कॅसर धोका असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
स्त्रीयांमध्ये संधिवात, डायबिटीस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारी वाढत आहेत. स्त्रियांचे मानसिक आरोग्य,जननसंस्थेचचे आजार व कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदीबाबत जरी सरकारने महिलांच्या आरोग्यविषयक उपक्रम राबविल्यास अनेक महिलांची जीव,प्राण वाचवू शकतात.आपल्याकडे अनेक स्त्रियांना चाळीसच्या आत त्यांना त्रासदायक सांधेदुखीचा त्रास चालू होतो. स्त्री आरोग्य बाळंतपण एवढ्यावरच मर्यादित न राहता स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे.ॲनिमिया, रक्ताच्या गर्भाशयातील आजार, गर्भाशयाचा कॅन्सर, डायबिटीस विषयी प्रत्येक महिलेला योग्य माहिती पुरवली पाहिजे.भारतामध्ये कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये मृत्यूच्या प्रमाणे जास्त आहे. स्त्रियांनी निकोप शरीर व निकोप मन यांचा आग्रह धरला पाहिजे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी होमिओपॅथी नक्कीच उपयोगी पडू शकते ..
महिलांचा आहार
सध्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया हिरिरीने भाग घेत आहेत. प्रगती करत आहेत. राजकारण,शिक्षण,सरकारी नोकरी या सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण आहे. घराबाहेर सर्व क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रिया घरांमध्ये स्वतःकडे किती हिरिरीने पाहतात, स्वतःच्या आरोग्य,आवडीनिवडी यांना किती महत्त्व देतात?
जरी अर्ध्या आयुष्य स्वयंपाक घरात जात असले तरी सर्वांचे जेवण झाल्यानंतर उरेल तेच खायच आणि काही वाया जाऊ द्यायचे नाही म्हणून संपवायच,या मानसिकतेतून आजची स्त्री एकविसाव्या शतकात तरी बाहेर येत नाहीये.
जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी जागी होते. त्याला भूक लागलेली असते आणि तिला काम ही करायचा असतं.त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या लवकरात लवकर काहीतरी खाल्ले पाहिजे आणि चहा हा त्यावरचे उत्तर नाहीच यामुळे भूक याची भावना विसरून जाते. आपण नाष्टा पुढे ढकलतो सकाळी लवकर नाष्टा केला दिवसभरात अचानक भूक कमी लागते. पित्त होणे या गोष्टीचा त्रास होत नाही. नाश्त्यामध्ये बाहेरून आणलेले ब्रेड बिस्कीट वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या एखादा धान्याचा पदार्थ खाल्ल्यास उत्तम.
दुपारच्या जेवणामध्ये भात, वरण, भाकरीसोबत हिरव्या पाल्याभाज्या डाळी उसळी, ताक ,दही अशा पदार्थांचा समावेश असू द्या.मुले नवरा घराबाहेर आहेत किंवा तिकडेच जेवतात म्हणून कितीतरी स्त्रिया स्वतःसाठी स्वयंपाक करण्याचा आणि खाण्याचा कंटाळा करतात. जेवणाची एखादी वेळ सोडल्यास आपले दैनंदिन पोषण मुल्यांची गरज पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. संध्याकाळी चिप्स चिवढा या गोष्टीपेक्षा सुकामेवा,फळे,लाह्या फुटाणे अशा पदार्थांचे सेवन करावे रात्रीचा आहार शक्यतो हलका असावा. त्यामधे तळलेले पदार्थ,गोड पदार्थ, खाणे टाळावे. अंडी मासे करण्यासाठी संध्याकाळची वेळ वेळ योग्य ठरते. आपला आहार हे आपले इंधन आहे हे ध्यानात घेऊन प्रत्येक स्त्रीने आजाराविषयी काळजी घेतली पाहिजे.
महिलांचे मानसिक विकार
मासिक पाळीची सुरुवात, गर्भारपण, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे या टप्प्यावर काहीतरी विशिष्ट मानसिक आजार होतात.त्यांना स्त्रियांमधील मानसिक आजार असे म्हटले जाते. या टप्प्यावर स्त्रियांना या कालावधीत मोठे शारीरिक मानसिक व सामाजिक बदल करावे लागतात.त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते. शरीरातील प्रत्येक कार्य मेंदूशी निगडीत असल्याने या हार्मोनचे मेंदूवर परिणाम होतो. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे स्त्रियांना हे आजार होतात असे समजले जाते. पौगंडावस्था मध्ये मुलांमध्ये उदासीनता, भित्रेपणा यासारखे आजार मुलांच्या तुलनेने जास्त दिसून येतात. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या थोड्या आधी किंवा त्या दरम्यान लहरीपणा,कंटाळा, त्रास होतात. काही स्त्रियांना हा त्रास तीव्रतेचे होतात. त्याशिवाय शरीर बोजड वाटणे, चिडचिडेपणा,उदास झोपेचा त्रास होतात हा त्रास होताना होताना स्त्रियांमध्ये टोकाचे बदल होतात. गर्भारपणात महिला आनंदी समाधानी असणे अपेक्षित असते. पण काही स्त्रियांना समाधान वाटते कधी कधी स्वतः भीती वाटू शकते. हे सर्व त्रास नंतर वाढतात किंवा नव्याने सुरुवात होते .मासिक पाळी थांबण्याचे वेळी बहुतेक स्त्रिया झोपेच्या तक्रारी अनुभवतात, वारंवार झोप नीट न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना अशक्तपणा, निरुत्साह,उदासीनता धोका जाणवतो त्याला डोमिनो इफेक्ट्स म्हणतात. अशा झोपण्याच्या तक्रारीमुळे आणि इतर मेंदूतील बदलामुळे स्त्रियांना उदासीनतेच्या आजार ओळखण्याचे किंवा नव्याने होण्याची शक्यता असते. अलीकडच्या संशोधनात असे आढळून आले आहे की या वयात विस्मृतीचे लक्षण असू शकते या सर्व कारणांमुळे या वयात या स्त्रीने झोपेच्या त्रासाची दखल घेऊन वेळेत होमिओपॅथिक उपचार केले पाहिजे. स्त्रियांच्या आरोग्यावर आणि स्थैर्यावर तिच्या कुटुंबाच्या भविष्य अवलंबून असते शारीरिक आरोग्यासाठ जसा उपचार सल्ला गरजेचा असतो त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजी महत्त्वाची असते.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ समता गोर्हे
865787556