बहुजन मराठा समाज भिडेच्या समर्थनात का येतो?
याचे कारण अँटोनीओ ग्रामची. (Antonio Gramsci)
हा जागतिक कीर्तीचा तत्वज्ञ आणि इतिहासतज्ञ आहे त्याने “हेजिमनी ” (Hegemony) म्हणजे “सांस्कृतिक धुरीनित्व” या नावाचा सिध्दांत मांडला – तो म्हणतो की एखादा छोटा समूदाय मोठ्या कष्टकरी, श्रमकरी,शेतकरी वर्गावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा इतिहास बदलतो आणि आपले वर्चस्व अबाधित ठेवणारा त्यांचा खोटा इतिहास लिहितो आणि मग आपोआप मोठा समूदाय त्याचा गुलाम होतो. उदा.- मराठा समाज.
आणि हेच कारण आहे की का पुरंदरे च्या इतिहासाचं भिडे ने समर्थन केले याचे. कारण बाबा पुरंदरेने “राजा शिवछत्रपती ” हा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाची मांडणी ब्राम्हणीवर्णवर्चस्ववादी आहे.
सुप्रसिध्द वक्ते शिवचरित्रकार, इतिहासतज्ञ, इंडॉलोजिस्ट, आर्किओलोजिस्ट, आँथ्रोपोलोजिस्ट आणि शिक्षणतज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे म्हणतात तसे दादोजी कोंडदेव, रामदास हे शिवरायांचे गुरु म्हणून सांगितले की आपोआप शिवरायांच्या कर्तृत्वाचे श्रेय ब्राम्हांनंकडे जाते. शिवाजीराजे मुस्लिम विरोधी होते, असे मांडले की आपोआप आजचे मावळे आणि मुस्लिम यांच्यात अकारण संघर्ष सुरू होतो. आजच्या मावळ्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कलेक्टर,न्यायाधीश, उद्योगपती होण्याऐवजी हिंदू – मुस्लिम संघर्षात त्यांची ऊर्जा खर्च व्हावी, तीन टक्के ब्राम्हण सर्वक्षेत्रात रहावा आणि बहुजन मराठा त्यांचा गुलाम व्हावा अशा प्रकारची मांडणी पुरंदरे याने केली आहे.हे बहुजन मराठा समाजाला धोकादायक आहे.
क्रमशः
विजय पाटील.
शिवप्रबोधिनी, कोल्हापूर.