भिडे पुराण भाग – ९.
शिवप्रतिष्ठानच्या नावाखाली भिडे काय काम करतो?
ब्राम्हण स्वतः ला आर्यसंस्कृतीचा, ब्राम्हनसंस्कृतीचा, वैदिकधर्माचा किंवा सनातनधर्माचा म्हणतात पण स्वतः ला हिंदू समजत नाहीत. हिंदू म्हणजे गुलाम आणि बहुजन मराठा समाज हा ब्राम्हणी विकृतीचा गुलाम आहे, त्यामुळे हजारो वर्षांपासून तो समाज शिक्षणसंस्था, धर्मसंस्था,अर्थसंस्था,राजसत्ता ह्या सर्व सत्तांपासून वंचित होता
आज देश स्वातंत्र्य असला तरी वरील संस्थांवर सत्ता जरी बहुजन समाजाची असली तरी त्या संस्थात काम करणारी माणसं आणि संस्थापक हे ब्रामन्ह्यग्रस्त आहेत. त्यामुळे ब्राम्हणी कावे भोळ्या बहुजन समाजाच्या लक्षात येत नाहीत. आपण मानसिकदृष्ट्या गुलामगिरीत आहोत हे बहुजन समाज विसरलेला आहे. त्याच्या मेंदूवर वैदिकधर्मज्ञान पूर्णपणे बिंबले आहे.
मेंधराच्या कळपात कुत्र्याचे सोंग घेऊन लांडगा घुसल्या प्रमाणे भिडे घुसला आहे. मेंधरांना वाटत की आपल रक्षण करण्यासाठी मेंढपाळाने पाळलेला हा कुत्राच आहे. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेऊन त्या जगत असतात तसेच बहुजन मराठा समाजातील तरुण जगत आहेत. छत्रपति शिवाजीमहाराज , छञपती संभाजी महाराज यांच नाव घेऊन तो बहुजन समाजात घुसला आहे. त्यामुळे ब्राम्हण हाच आपला मालक आहे ह्या मानसिकतेत बहुजन मराठा जगत आला आहे, तो ब्राम्हणांच्या आदेशाचे पालन करीत असतो.हा सारा प्रकार संतापजनक आहे.
भिडे नेमकं हेच करतो, खोटा इतिहास, शिवरायांवर असलेले त्याचे बेगडी प्रेम आणि बहुंजन मराठ्यांच्या मनात तो बिंबवत असणारा द्वेष यामुळे बहुजन मराठा समाजातील तरुण दिवसेंदिवस विकृत मानसिकतेचा होत चालला आहे.
भिडे हा शिवप्रेमी नसून शिवकुळाला बदनाम करण्याची सुपारी घेतलेला विकृत अण्णाजी पंत आहे.
क्रमशः
विजय पाटील.
शिवप्रबोधीनी, कोल्हापूर.