janvicharnews.com
क्षेत्राची ओळख
भारतीय संस्कृतीत चौसष्ट कला मानल्या जातात. या कलांमध्ये पासष्ठावी कला म्हणून जाहिरात कलेकडे पाहिले जाते. जाहिराताना आपल्या रोजच्या व्यवहारात मोठे स्थान व्यापले आहे. सकाळी उठल्यापासून लागणाऱ्या टूथपेस्टपासून ते अगदी रात्री झोपताना लागणाऱ्या गाद्यापर्यंत साऱ्या वस्तूच्या जाहिराती आपण टेलिव्हिजन व इतर माध्यमांद्वारे पाहतो किंवा ऐकत असतो त्यामुळे, जाहिरातीत आपले संपूर्ण आयुष्यच व्यापले आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. आजचे युग हे जाहिरातीचेच असल्यामुळे जाहिरात क्षेत्रात करिअरच्या नामी संधी उपलब्ध आहेत. परंतु त्या आधी जाहिरात क्षेत्र आहे तरी कसे हे पाहूया. सर्वप्रथम ‘जाहिरात’ म्हणजे काय हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
- नेमक्या शब्दांत व चित्ताकर्षक पद्धतीने आपले उत्पादन ग्राहकाला खरेदी करण्यास भाग पाडणार माध्यम म्हणजे जाहिरात..
- जाहिरात क्षेत्रात मुख्य मीडिया प्लानिंग, क्लाएंट सर्व्हिसिंग व क्रिएटिव्ह रिसर्च असे भाग येतात.
- या विभागांद्वारे जाहिरात संस्थांना ग्राहकापर्यंत पोहोचवणे,
- प्रमोशनसाठी संशोधन करणे,
- कामाची रूपरेषा आखणे,
- शब्दांतून नवनवीन कल्पनेतून बँडचा संदेश ग्राहकापर्यंत पोहोचवणे असे काम केले जाते.
जाहिराती महत्त्वाच्या का आहेत?
जाहिराती व्यवसायांसाठी महत्त्वाच्या आहेत कारण त्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात थेट आणि सिद्ध मार्ग आहेत. त्यांचा तुमच्या व्यवसायावर अनेक मार्गांनी झटपट प्रभाव पडू शकतो, यासह:
- ब्रँड जागरूकता: जाहिराती तुमच्या लक्ष्यित प्रेक्षकांना तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ शकतात, त्यांना विक्री फनेलमध्ये पहिले पाऊल टाकण्यास मदत करतात.
- ब्रँड प्रतिष्ठा: काळजीपूर्वक तयार केलेले संदेश प्रेक्षकांना सांगू शकतात की तुमचा ब्रँड काय आहे आणि तुम्ही कसे कार्य करता. तुमचे ध्येय, तत्त्वज्ञान, मूल्ये आणि ट्रॅक रेकॉर्ड सामायिक करून, तुम्ही हेवा करण्यायोग्य प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी जाहिरात वापरू शकता.
- दुरुस्त्या आणि क्षमायाचना: जाहिरातीमुळे तुम्हाला एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहे असे वाटत असल्यास, स्लिप-अपसाठी माफी मागण्याची किंवा रेकॉर्ड दुरुस्त करण्याची संधी देऊ शकते.
- विक्री: शेवटचे परंतु कमीत कमी, जाहिरातींचा मोठा बहुसंख्य भाग विक्री वाढवण्यासाठी डिझाइन केला आहे, मग ते एखाद्या विशिष्ट उत्पादनाचा, सेवा किंवा व्यवहाराचा थेट प्रचार करून किंवा वर सूचीबद्ध केलेल्या कमी थेट पद्धतींद्वारे.
क्षेत्राची व्याप्ती व संधी
जाहिरात क्षेत्राची वेगाने होणारी वाढ पाहता जाहिरात क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. जाहिरात बनवण्याच्या सुरुवातीच्या प्रक्रियेपासून ते एक परिपूर्ण आकर्षक जाहिरात तयार होऊन तो माध्यमांवर झळकेपर्यंत अनेक टप्पे असतात आणि साहजिकच या सर्व टप्यामध्ये विविध प्रकारची कौशल्ये असणाऱ्या उमेदवारांची गरज भासत असते.
- अँडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये चित्रकार,
- कॉपी रायटर,
- आर्ट डिरेक्टर,
- स्पेस सेलिंग टीम,
- दिग्दर्शक,
- फोटोग्राफर्स,
- एडिटर्स,
- लाइटमन,
- अकाऊट एक्झिक्युटिव्ह
असे लोक समाविष्ट असतात. बहुराष्ट्रीय कंपन्यानीही जाहिरात क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवल्यामुळे या क्षेत्रातील संधी व वेतनही चांगलेच वधारले आहे. सुरुवातीला लहानशा कंपनीत सुरुवात करूनही कामातील कौशल्याने अल्पावधीतच नामकत कंपन्यापर्यंत पोहोचता येते.
या क्षेत्रात वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके, रेडिओ, दूरदर्शन, मार्केट रिसर्च ऑर्गनायझेशन, फ्रीलान्सर असे काम करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अँडव्हर्टायझिंग मॅनेजर, सेल्स मॅनेजर, पब्लिक रिलेशन्स डायरेक्टर, क्रिएटिक डायरेक्टर, कॉपी रायटर मार्केटिंग कम्युनिकेशन्स मॅनेजर अशा महत्वाच्या पदावर काम करता येते..
जाहिरात क्षेत्रात काम करण्यासठी लागणारे आवश्यक गुण-
- जाहिरात क्षेत्रात करिअर करण्यासाठी अंगात उपजत कलात्मकता व सृजनशीलता हवी.
- खूप मेहनत घेण्याची तयारी हवी.
- सूक्ष्म निरीक्षण शक्ती चौफेर वाचन,
- संवाद व सादरीकरण कौशल्य हवे.
- या क्षेत्रात वेळेचे बंधन पाळावेच लागते.
- कामाच्या प्रचंड दबावाखाली काम करण्याचे कसब असावे लागते.
- कामाच्या वेळाही अनियमित असतात.
- त्यामुळे, या गोष्टीची शारीरिक व मानसिक तयारी असणाऱ्यासाठी हे क्षेत्र मोकळे आहे.
- मुळातच स्वभाव तडफदार, जिद्दी असेल तर या क्षेत्रात यश मिळवणे कठीण नाही.
- स्वभाव कौशल्यासोबतच इंग्रजी व हिंदी भाषेवर प्रभुत्व असणेही महत्त्वाचे असते.
- संघ आणि नेतृत्व कौशल्ये
भारतातील आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना जाहिरातींसाठी; निश्चितच उच्च पात्र आणि अनुभवी मनुष्यबळाची गरज आहे. तथापि, यागतिमान व्यवसायात कोणत्याही दिवशी वैयक्तिक सर्जनशीलता; आणि नवकल्पना करण्याची क्षमता शैक्षणिक पदवीपेक्षा महत्वाची ठरते.
अभ्यासक्रम
जाहिरात क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी साधारणत: अॅडव्हर्टायझिंग किवा मास कम्युनिकेशनमधील अभ्यासक्रम पूर्ण करणे उपयुक्त ठरते. यासाठी अनेक डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट पातळीवरील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत
- क्लायंट सर्व्हिसिंग: मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा एमबीए.
- चित्रपट: ऑडिओ व्हिज्युअल मध्ये स्पेशलायझेशन.
- प्रॉडक्शन: प्रिंटिंग आणि प्री-प्रेस प्रक्रियांचा अभ्यासक्रम.
- मीडिया: पत्रकारिता, जनसंवाद किंवा एमबीए.
- वित्त: सीए, आयसीडब्लूए, एमबीए (वित्त)
- स्टुडिओ: व्यावसायिक कला किंवा ललित कला (बीएफए किंवा एमएफए)
भारतात जाहिरातींवर चांगले अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी; अनेक महाविद्यालये आहेत. क्लायंट सर्व्हिसिंग किंवा कॉपीरायटिंगमध्ये येण्यास स्वारस्य असलेली व्यक्ती; मास कम्युनिकेशन पदवी किंवा जाहिरातीमधील बीए अभ्यासक्रमांची निवड करु शकते. ग्राफिक डिझायनिंगचा पाठपुरावा करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी; विविध कला आणि डिझाइन अभ्यासक्रम, डिप्लोमा आणि पदवी आहेत
प्रशिक्षण संस्था
अजूनही जाहिरात क्षेत्रात करिअर करण्यासाठी फार कमी महाविद्यालये पदव्युत्तर शिक्षण देतात. मीडिया प्लॅनिंग आणि क्लाएंट सर्विसिंग हे विषय मास कम्युनिकेशनची पदवी घेतेवेळी पदवी शिक्षणात समाविष्ट असतात.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अरूणा असफ अली मार्ग, जे.एन.यु, न्यू कॅम्पस, नवी दिल्ली. www.iimc.nic.in
- एम.एस युनिवर्सिटी ऑफ बडोदा, फतेहगंज, वडोदरा, गुजरात.
- मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, शेला, अहमदाबाद, गुजरात.
- नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडिज, व्ही.एल मेहता रोड, विले-पार्ले (वेस्ट), मुंबई. www.nmims.edu
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हर्टायझिंग, दीन दयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली. www.nia.org
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, पल्डी, अहमदाबाद, गुजरात. www.nid.edu
- सर जे.जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट, डॉ. डि.एन रोड, मुंबई.
- युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, कॉलेज ऑफ आर्ट, टिळक मार्ग, नवी दिल्ली.