Home राजकीय घडामोडी नालायक नगरसेवक व आमदारांना निवडून देऊ नका!

नालायक नगरसेवक व आमदारांना निवडून देऊ नका!

0
नालायक नगरसेवक व आमदारांना निवडून देऊ नका!

शिवराम पाटील

 सरकारी नोकर पेन्शन साठी संप करीत आहेत.म्हातारपणाची तरतूद पाहिजे.तर मग आता उधळपट्टी कमी करा.पगार वाचवा.उतारवयात कामी येईल सरकारी नोकरांचा अर्धा पगार कापून त्यांचेच पेन्शन द्या.

पगार डबल झाला आहे
शिवाय ज्यांचेवर भ्रष्टाचाराचा ,काम चोरीचा आरोप आहे त्याला निलंबित करून पगार थांबवा.
भ्रष्टाचार आपोआप बंद होईल.नोकर म्हणजे सांगितले तितके काम करणारा माणूस.तर मग त्याला काम सांगावे लागते,हाकावे लागते,भीती घालावी लागते,दंड करावा लागतो.डिसीप्लीन ऍन्ड अपील रूल त्यासाठीच आहे.
कोणताही नोकर प्रामाणिक पणे काम करीत नाही.अगदी कलेक्टर एसपी सुद्धा.तर मग तलाठी आणि पोलिस कसे करणार? यांचेवर नियंत्रण ठेवावेच लागते.
यांचेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींची निवड केली जाते.ते आपण सामान्य लोक निवडतो.पण तो सुद्धा चोर, नालायक,ढ असेल तर तो नियंत्रण ठेवू शकत नाही.चोर असेल तर तो नोकरांना चोरी करायला लावतो.नालायक असेल तर दारू गांजा विकतो.ढ असेल तर पडून राहातो.त्याचे वाईट परिणाम मतदार ,सामान्य लोक भोगतात.जळगांव जिल्ह्यातील पालकमंत्री हे चुकीचे काम करतात.यांना प्रशासन कळत नाही.त्यांना दारू,रेती कळते.ते म्हणतात, तुम्ही काहीही करा अथवा नका करू पण मला माझा हिस्सा काढून ठेवा.जळगावचा आमदार स्वतः दारू विक्रेता आहे.त्यांना सामाजिक भान नाही. दारु माणसाचा,कुटुंबाचा,संसाराचा नाश करते. राजकिय भान तर मुळीच नाही.म्हणून जळगाव चा सत्यानाश झाला आहे.यांनी दहा वर्षात एकही कायदा बनवला नाही, रद्द केला नाही.तरीही विधायक कसे ? हे फक्त सरकारी तिजोरीतून निधी आणतात.मक्तेदार शोधतात.जो काम न करता निधीची विल्हेवाट लावून देईल.जर तसा मक्तेदार मिळाला नाही तर निधी परत जातो.गुलाबरावचा निधी परत जात आहे.तर गुलाबराव लायक कि नालायक? असे करीत असतील तर हे लायक कसे?जनतेने त्यांचा जवळून अभ्यास केला पाहिजे.हा लायक कि नालायक याबाबत चर्चा केली पाहिजे.लायक असेल तर मतदान करा.नालायक असेल तर मत देऊ नका.अगदी उद्धव ठाकरे यांनी सांगितले तरीसुद्धा.गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदींनी सांगितले तरी सुद्धा.कारण हे आपल्याला सांगून निघून जातील.नंतर येणार नाहीत.नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत जळगाव कुसुंबा विमानतळावर आले.भाडोत्री श्रोते आणले.भाषण ठोकून गेले.नंतर आलेच नाहीत.ते तिकडे इंग्लंड अमेरिका फिरत राहिले.देवेंद्र फडणवीस सुद्धा नंतर एकदाही आले नाहीत.गिरीश महाजन फक्त गणपती, शिवजयंती, नवरात्रीला नाचायला येतात.अगदी न बोलावता येतात.लोक अपमान करतात तरीसुद्धा. पण आमदाराच्या कामाकडे लक्ष देत नाहीत.मंत्रीच्या विरोधात तक्रार ऐकून घेत नाहीत.नगरसेवकांच्या विरोधात ऐकून घेत नाहीत.तर मग आपण महाजन यांचे का ऐकून घ्यावे? मोदी व फडणवीस यांचे का ऐकून घ्यावे?
अजितदादा पवार दोनदा आले.जयंत पाटील दोनदा आले.सुप्रिया ताई पण आल्या.पण त्यांच्याच चोरमंडळीसोबत फोटो काढून गेले.लोकांचे प्रश्न ऐकून घेतले नाहीत.तसेच संजय राऊत आले.काहितरी अभिनय करून गेले.आम्हाला त्यांचा अभिनय नको आहे.खूप झाला वात्रटपणा.गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांनी सारणखेडा,चोरवड,अमळनेर,बोरीस च्या यात्रेत आमनेसामने कार्यक्रम घ्यावेत.तिकीट लावून.येथे जळगाव ला नको.
आम्हाला काम पाहिजे.
जळगाव जिल्ह्यातील कांग्रेस आता जिवंत नाही.जे आहेत ते कंकाल आहेत.काही फोटोंमध्ये बंदिस्त झालेत.काहींचे थडगे बनले.जे थोडीफार हालचाल करतात ते सुरक्षित बीळ शोधत आहेत.
आता जळगाव शहरातील रस्ते बनवणे चालू आहेत.एकही नगरसेवक रस्ता पाहात नाही.लोकांची तक्रार ऐकत नाहीत.इतके नालायक आणि कमीशन खोर लोकांना गिरीश महाजन यांनी नगरसेवक निवडून आपल्या पदरी बांधलेत.येथे मोदी आणि फडणवीस काहीच बोलत नाहीत.तर मग आता मोदी फडणवीस यांचे का ऐकून घ्यावे?
आता जळगाव च्या लोकांनी या बाहेर गावच्या मदारींवर,गारूडींवर विश्वास ठेवू नये.हे निवडणुकीत माणसाच्या चड्डीतून अंडे काढून दाखवतात.बावळट लोक टाळी वाजवतात.शहाणे लोक शिवी हासडतात.माणूस कधी अंडी देतो का?इतकी तर डोकी चालली पाहिजे.महाजन म्हणाले होते कि, जळगाव शहराचे एक वर्षात शांघाय करू.पण निवडणूक नंतर तेच शांघाय ला निघून गेले.त्यांचे वेगळे शांघाय वसवले असेल कदाचित.
एकनाथ खडसेंचे ऐकले तर ते आमदार, खासदार मंत्री, नगरसेवक, डायरेक्टर,चेअरमन,चोरमन आपल्याच कुटुंबातील देतात.इतरांना अक्कल नाही,असा त्यांचा समज आहे.इतरांची ती लायकी नाही,असे मानतात.ते सदेह ,सधन, सहकुटुंब स्वर्गात जाऊ इच्छित आहेत.तेथे स्वर्गात निवडणूक घेतली नाही.हे त्यांना माहित नसावे कदाचित! समजाऊन सांगा कुणीतरी.
आता आपण जळगाव शहरातील नागरिकांनी जागृत झाले पाहीजे.नालायक,चोर, हरामखोर,कामचोर, लाचखोर लोकांना नगरसेवक निवडून देऊ नये.जे आता नगरसेवक आहेत त्यांना तर मुळीच नाही.लोकप्रतिनिधी दर पांच वर्षात बदलला पाहिजे.असे राज्यघटनेत लिहीले आहे.ते तरी अनुपालन केले पाहिजे.जर तसे करीत नसाल तर तुम्ही राज्यघटना विरोधात वर्तन करीत आहात.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here