कायदा (Law) क्षेत्रातील करिअरच्या संधी
कायद्याचा व्यवसाय करण्याची इच्छा सामान्यतः एखादया प्रेरणेतून जन्माला येते. मग ही प्रेरणा एखादया वैयक्तिक आदर्शापासून मिळालेली असते, कथा/कादंबरीतल्या एखाद्या काल्पनिक पात्रापासून मिळालेली असते किंवा आपलं मत आपली भूमिका एखादा महत्त्वाचा बदल/निर्णय घडवू शकते या विश्वासातून. कायदयाच्या व्यवसायापासून सुरुवात करून पुढे देशाचं नेतृत्व ज्यानी केल, अशा असामान्य नेत्याची यादी केल्यास ती खूप मोठी होईल यात शंका नाही.
आजची परिस्थिती बघितली तर ‘काळा कोटाचा गणवेश आणि न्यायासनासमोर अशिलाची बाजू मांडणं ही आपल्या सामान्य आकलनातली पारंपरिक चाकोरी ओलांडून कायदयाचा व्यवसाय अनेक दिशांमध्ये अनेक आधुनिक रूप घेऊन विस्तारला आहे.
क्षेत्राची व्याप्ती व संधी
कायदयाच्या व्यवसायाने आज धारण केलेल्या आधुनिक रुपांमुळे या क्षेत्रात अनेक विविध करिअर संधी उपलब्ध झाल्या आहेत.
- या व्यवसायाचं पारंपरिक रूप म्हणजे न्यायालयात वकिली करणे. यासाठी नवीन विधी स्नातकांनी (law graduate) एखादा ज्येष्ठ वकिलाला त्याच्या कामात मदत करत शिकायचं असतं. सध्या नवीन विधी स्नातकांना न्यायालयात वकिली करण्याआधी ‘Bar Exam’ च्या माध्यमातून पात्र व्हावं लागतं. या प्रकारच्या व्यवसायात खाजगी व सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये अनेक Specialization (विशेषीकरण) करता येते. उदा. करप्रणाली, संविधान, कुटुंब (Family matters), गुन्हे प्रकरण. त्यातही प्रत्यक्ष खटले किंवा फक्त अपिलांची प्रकरण असही Specialization करता येते.
- Law firms: गेल्या काही दशकांमध्ये हा व्यवसायाचा नवीन प्रकार विकसित झाला आहे. यात स्वतंत्रपणे / एकटयान आपली प्रैक्टिस करण्याऐवजी अनेक वकील एकत्र येऊन आपली कंपनी स्थापन करून संघटित व्यवसाय करतात.
- Corporate law– एखाद्या खाजगी कंपनीला त्यांच्या व्यवसायासंबंधी कायदेशीर गोष्टींबाबत मार्गदर्शन करणे, सल्ले देणे इत्यादीसाठी कंपनीचा वकील/विधिज्ञ म्हणून काम पाहणे. यात मग वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक कंत्राटांच (Business Contracts) लेखन, त्यांतली विशिष्ट शब्दयोजना तसेच अशा कंत्राटाबाबत इतर संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधीशी वाटाघाटी करणे या गोष्टींचा समावेश होतो. याशिवाय, विविध व्यावसायिक खटल्यांमध्ये/वादामध्ये न्यायासनासमोर आपल्या कंपनीची बाजू मांडण्यात येते.
- विधी सेवा (Judicial Services): लोकसेवा आयोगा‘ कडून (UPSC / MPSC) घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षाप्रमाणेच विधी सेवासाठी त्या-त्या राज्यांच्या उच्च न्यायालयांमार्फत ‘विधी सेवा परीक्षा‘ घेतल्या जातात. स्थिर सरकारी सेवेप्रमाणेच करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांना हा योग्य पर्याय उपलब्ध आहे. अशाच प्रकारच्या सेवेसाठी UPSC मार्फतही IAS, IPS, IRS यासारख्या सेवाप्रमाणेच II.S (Indian Legal Services) साठीही परीक्षा घेतल्या जातात. यामार्फत कायदयाच्या क्षेत्रातील जाणकार असलेले शासनाचे उच्च अधिकारी निवडले जातात.
- सामाजिक कार्य: सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा बदलांसाठी/ सुधारणांसाठी काम करण्याची इच्छा व त्या प्रकारची संवेदनशीलता ज्यांच्यात आहे. असे अनेक विधी स्नातक सध्या विशिष्ट सामाजिक विषय (Social Causes) निवडून त्यावर काम करणाऱ्या NGOs साठी काम करतात यामध्ये पर्यावरण संवर्धन, लैगिक किंवा जातीवर आधारित भेदभाव, रोजगार कामाच्या ठिकाणची परिस्थिती अशा विषयावर काम काम करणाऱ्या NGOs आणि नागरी संघटनांना कायदेशीर बाबीमध्ये मदत करणे इत्यादी.
- माध्यम (media) आणि कायदा पत्रकारिता आणि कायदा हे दोन व्यवसाय अनेक प्रकारे एकमेकांशी संबंधित आणि एकमेकांत गुंतलेले आहेत. दोन्हीमध्ये प्रभावी शोधक वृत्तीची आणि लेखन कौशल्याची गरज असते. दोन्हीमध्ये सरकारी आणि न्यायालयीन कार्यप्रणालीची चांगली जाण असणं आवश्यक असत. त्यामुळे, या प्रकारात Legal publishing आणि Legal reporting सारखे उपलब्ध आहेत.
- अ Legal Publishing: कायदयाच्या जाणकारांना विविध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये (वर्तमानपत्र आणि न्यूज वाहिन्या) संपादक म्हणून काम पाहण्याची संधी मिळते. येथे लेखन कौशल्य महत्त्वाच असते.
- ब. Legal Reporting” “लॉ रिपोर्टर म्हणून वर्तमानपत्र किवा यूज चैनल्समध्ये काम करता येत. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषय, मानवी हक्क यांसारख्या विषयावर प्रभावीपणे काम करण्याची इच्छा असणाऱ्यासाठी हा चांगला पर्याय आहे..
- Academics: लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक होऊन कायद्याच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणे याकडे चांगले शिकवता येणे) कल आहे, अशा विधी स्नातकांनी (आवश्यक ती पुढील पात्रता प्राप्त करून चांगले वकील व विधीज्ञ घडवण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करायला हरकत नाही.
- विधी लिपिक (Law Clerk): विधी लिपिक हे न्यायालयामध्ये कायदेशीर कामकाजात साहाय्यक म्हणून काम करतात. या प्रकारच्या कामाचा अनुभव घेणाऱ्यांना न्यायालयीन कामकाजाची व कार्यपद्धतीची उत्तम माहिती होते.
- Legal Process Outsourcing: यामध्ये मोठ्या law firms खटल्यामधील केसचा प्राथमिक मसुदा तयार करण, केस संबंधित आकडेवारी/संदर्भ इत्यादी माहिती गोळा करणं अशी काम outsource करतात आणि ही outsourced प्रकारची काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणं हाही एक पर्याय आहे. या क्षेत्रातही मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या (MNCs) अस्तित्वात आल्या आहेत.
आवश्यक गुण / कौशल्ये
या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी नेमक्या शब्दात प्रभावीपणे संवाद साधणे, आपलं म्हणणे स्पष्ट व निःसंदिग्ध स्वरूपात (तोंडी व लेखी दोन्ही) मांडता येणे हे गुण महत्त्वाचे असतात तसेच वाचनाची आवड असणे आणि आपल्या कामाच्या स्पेशलायझेशनच्या विषयातील नवनवीन संकल्पना/घडामोडी/सुधारणा इत्यादीचा अद्ययावत माहिती/ज्ञान मिळवण्यास आवश्यक ते वाचन करणे गरजेचे असते. सर्वात महत्त्वाची क्षमता म्हणजे तार्किक कारणमीमांसा (logical reasoning) त्यासाठी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून गोष्टीकडे / घटनाकडे पाहून निश्चित ठाम निष्कर्ष काढता येणे व आपलं स्पष्ट मत बनवणे महत्त्वाचे असते.
अभ्यासक्रम
कायदयाच्या क्षेत्रातील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे:
अभ्यासक्रम/शैक्षणिक पात्रता
LLB (5 वर्षे)– बारावी (आर्ट्स / कॉमर्स/ सायन्स)
LLB (3 वर्षे) -पदवी (आर्ट्स / कॉमर्स/ सायन्स)
LLM (2 वर्षे)–LLB ची पदवी
कायदा प्रवेश परीक्षा :
कायदयाच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) ही प्रवेश परीक्षा दयावी लागते