रात्री आकाशाकडे पाहताना लुकलुकणारे तारे, अनेक तारे जोडून होणारे तारकासमूह पाहताना अगदी आदीमानवापासून आजतागायत अवकाशातील गूढ व अनाकलनीय असे घटक व त्यासंबंधित घटना यांबाबत कुतूहल वाटत आले आहे. आजही या कुतूहलापोटी मानवाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे; किंबहुना हा प्रयत्न सुरूच आहे. म्हणूनच आपल्यातील अवकाश निरीक्षणाची आवड, अभ्यास व संशोधनवृत्ती यांचा योग्य विकास करण्याच्या दृष्टीने खगोलशास्त्र विषयाचा अभ्यास हा उत्तम पर्याय
खगोलशास्त्राची व्याप्ती
अवकाशातील पृथ्वी व्यतिरिक्त इतर खगोलीय घटक जसे सूर्य, चंद्र, तारे, इतर ग्रह, तसेच धूमकेतू, आकाशगंगा, वायू, धुलिकण आणि या सर्वांसबंधित घटना यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र होय, खगोलशास्त्र हे खगोलीय भौतिकशास्त्राशी (Astrophysics) संबंधित असलेला विषय असला तरीही खगोलशास्त्राच्या काही उपशाखा आहेत. ज्यांच्या पदव्युत्तर पदवी स्टारवर विशेष अभ्यास करता येतो. आधुनिक काळात खगोलशास्त्राची मुख्य दोन क्षेत्रे निर्माण झाली आहेत:-
- निरीक्षणात्मक खगोलशास्त्र- यामध्ये ग्रह तारे आकाशगंगा इत्यादींना प्रतक्ष प्राध्यान्य दिले जाते
- सैद्धांतिक खगोलशास्त्र- यामध्ये अवकाशीय घटक व घटना यांची प्रतिमाने आणि त्यांचे विश्लेषण यावर भर दिला जातो
खगोलशास्त्राचे प्रकार
1 ग्रहासम्बंधित खगोलशास्त्र
2 ताऱ्यासंबधित खगोलशास्त्र
3 सुर्याविषयक खगोलशास्त्र
4 आकाशगंगेसंबधित खगोलशास्त्र
5 विश्वाच्या उत्प्पतीविषयक खगोलशास्त्र
6 मापनासंबधित खगोलशास्त्र
भारतातील फारच कमी विद्यापीठामध्ये पदवी स्तरावर खगोलशास्त्र विषय अभ्यासला जातो
क्षेत्रातील संधी
खगोलशास्त्रात पदव्युत्तर पदवी व Ph.D केलेल्या उमेदवारांमध्ये निश्चितपणे संशोधन व निरीक्षण करण्याची क्षमता असते. याच्या जोरावर विश्वातील अनाकलनीय घटक व घटनांचे कोडे उलगडण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्तरावर इस्रो व इतर भारतीय संशोधन संस्था, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नासा, युरोपीय स्पेस एजन्सी, जपानमधील यासबंधी संस्थांमध्ये विशेष तज्ज्ञ आणि अंतराळवीर बनण्याची संधी प्राप्त हेऊ शकते.
अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळणे ही फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
आवश्यक गुण
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उमेदवाराकडे संशोधन, माहिती संकलन व विश्लेषण, समस्या निराकरण यांसंबंधित क्षमता असणे आवश्यक असते. वैयक्तिक कौशल्ये जिज्ञासा, उत्साह आणि तीव्र लक्ष हे खगोलशास्त्रज्ञ होण्यासाठी आवश्यक गुण मानले जातात. या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांची सरासरी बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, समस्या सोडवण्यात पारंगत, विश्लेषणात्मक कौशल्ये, तसेच गणित आणि संगणक अनुप्रयोगांमध्ये पारंगत असावे.
त्यांना रात्री उशिरापर्यंत कामाच्या अनियमित वेळेत काम करावे लागत असल्याने संयम आणि तणावाला सामोरे जाण्याची क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी रिसर्च टीममध्ये काम करणे अपेक्षित आहे, त्यामुळे त्यांच्याकडे चांगले संवाद कौशल्य देखील असले पाहिजे. याशिवाय विहित नमुन्यात आणि भाषेत वैज्ञानिक उपक्रम आणि माहिती सहजतेने समजावून सांगण्यात ते प्रवीण असावेत.
अभ्यासक्रम व पात्रता
खगोलशास्त्रात पदव्युत्तर पदवी (M.Sc) संपादन करण्याकरता पदवी स्तरावर गणित विषयासह भौतिकशास्त्राची पदवी संपादन करावी लागते.
याशिवाय, याविषयात Ph.D करता येते. यासाठी JEST (Joint Entrance Screening Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यानंतर मुलाखतीचा टप्पा पार करावा लागतो. IIA (इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऑस्ट्रोफिजिक्स) मध्ये Ph.D करण्याकरता GATE किंवा JEST परीक्षेचे विशेषतः त्यातील भौतिकशास्त्र पेपरमधील गुण लक्षात घेतले जातात. आयुका (IUCAA), पुणे येथे Ph.D प्रवेशाकरता JEST व INAT या दोन परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
विशेष बाब : पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांना JRF व SRF करता अर्ज करता येतो.