आपल्या देशाला ‘7517 किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. या किनारपट्टीचे संरक्षण करण्याची अल्पत महत्वपूर्ण जबाबदारी भारतीय नौदल पार पाडते. अमर्याद साहस, विलक्षण चिकाटी आणि अथांग सागराची ओढ असलेल्या युवकासाठी भारतीय नौदल हे करिअर करण्यासाठी सर्वोत्तम क्षेत्र मानले जाते. नौदलाची प्रशिक्षण यंत्रणाही अत्यंत सुसज्ज असून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन नौदलात दाखल झालेल्या उमेदवारांना त्याच्या कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण असे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. भूदल आणि वायुदलाप्रमाणेच भारतीय नौदलामध्येही अधिकारी आणि खलाशी अशा दोन प्रकारे उमेदवाराची नियुक्ती केली जाते. खलाशी (Sailor) हे पद भूदलातील शिपाई आणि वायुदलातील एअरमन या पदांशी समकक्ष असते.
प्रशिक्षण केंद्र:
इंडियन नेव्हल अॅकॅडमी, एरिमळा (केरळ)
अधिकारी भरती
नौदलातील अधिकारी पदाचे हुद्दे उतरत्या क्रमानेः
व्हाइस अॅडमिरल
रिअर अँडमिरल
कोमोडोर
कॅप्टन
कमांडर
लेफ्टनंट कमांडरलेफ्टनंट
सब लेफ्टनंट
नौदलातील अधिकारी भरती पुढील विभागांनुसार होते.
1. एक्झिक्युटिक जनरल–सर्व्हिस, हायड्रोग्राफर, पायलट, ऑबझर्व्हर लॉजिस्टिक्स, नेव्हल आममिट इन्स्पेक्शन, आयटी, एअर ट्राफिक कंट्रोल, लॉ, स्पोर्ट्स, म्युझिशिअन
2. इंजिनीअर–जनरल सर्व्हिस, सबमरीन, नेव्हल आर्किटेक्ट
3. इलेक्ट्रिकल -जनरल सर्व्हिस, सबमरीन
4. एज्युकेशन
5. मेडिकल
वरीलपैकी एज्युकेशन आणि मेडिकल हे विभाग वगळता अन्य सर्व पदांसाठी उमेदवार अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतील B.E. किंवा B. Tech असणे आवश्यक आहे. एक्झिक्युटिव्ह विभागातील लॉजिस्टिक ऑफिसर या पदासाठी उमेदवाराने प्रथमश्रेणी सह B.E. / B.Tech किंवा MBA/B.Sc/B.Com / BSc (IT) आणि फायनांन्स, लॉजिस्टिक, सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये पदविका /MCA/M.Sc (IT) यांपैकी कोणतीही एक पात्रता धारण करणे आवश्यक आहे.
एक्युकेशन या विभागाकरता पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. तसेच यासाठी विज्ञानशाखेतील पदव्युत्तर पदवी व्यतिरिक्त : अर्थशास्त्र / इतिहास / राज्यशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवीदेखील ग्राह्य मानली जाते.
युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम-
या परीक्षा योजनेद्वारे एक्झिक्युटिव्ह मॅचमधील (जनरल सर्विस) अधिकाऱ्याची भरती पर्मनंट कमिशनसाठी केली जाते, तर एक्झिक्युटिव्ह मॅचमधील (जनरल सर्व्हिस) अधिकारी वगळता अन्य अधिकाऱ्यासाठी, तसेच अन्य तात्रिक मॅचमधील अधिकाऱ्याची शर्ट सर्व्हिस कमिशनसाठी भरती केली जाते. या स्कीममध्ये महिला अधिकाऱ्याची नेमणूक फक्त शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी केली जाते. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या सत्राला असलेले महिला आणि पुरुष उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात; मात्र उमेदवाराला सरासरी 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे वयोमर्यादा 18 वर्षे ते 24 वर्ष
सेलर भरती
2: भारतीय सैन्यदलातील करिअर (Armed Forces)
भारतीय नौदलामध्ये अधिकारी पदाव्यतिरिक्त अन्य तांत्रिक साहाय्य मंत्रसामग्रीची देखभाल करणे इत्यादी कामासाठी कामाच्या स्वरूपानुसार विविध विभागामध्ये सेतर या हृदयासाठी भरती केली जाते.
मेलर भरतीचे प्रकार:
- मॅट्रिक रिक्कूट (MR): शेफ, स्टेवार्ड, सैनिटरी हायजिनिस्ट बम 17 वर्षे ते 21 वर्षे
- सिनिअर सेकंडरी रिक्रूट (SSR) वय 17 वर्षे ते 21 वर्षे
- आर्टिफायर टायसेस (AA) स्पोर्ट्स एंट्रीज कोटा
- म्युझिशिअन
वरील सर्व पदाच्या भरतीसाठीची जाहिरात Employment News या वृत्तपत्रात आणि राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील आघाडीच्या वृत्तपत्रामध्ये वर्षातून दोन वेळा डिसेंबर / जानेवारी आणि जून जुलै या कालावधीत प्रसिद्ध केली जाते.
वरीलपैकी एकाहून अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवाराला स्वतंत्र अर्ज करावे लागतात तसेच वर दिलेल्या मॅट्रिक रिक्रूटमधील चार पदांपैकी एका पदासाठीच उमेदवार अर्ज करू शकतो.
पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैदयकीय चाचणीसाठी बोलावले जाते.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
- MR अंतर्गत पदासाठी शासन मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण. वय 17 वर्षे ते 21 वर्षे
- SSR पदासाठी → गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय तसेच रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्र यांपैकी एक विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण. वय 17 वर्षे ते 21 वर्षे
3. AA पदासाठी—60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय जीवशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र या विषयामध्ये सरासरी 60 टक्क्यांहून अधिक गुण वय 17 वर्षे ते 20 वर्षे
4. स्पोर्ट्स कोटा एंट्री → 12 वी उत्तीर्ण वय 17 वर्षे ते 20 वर्षे
5. म्युझिशिअन → शासन मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण आणि पाश्चात्य वादयसंगीतामध्ये प्रावीण्य असणे आवश्यक