पुरातत्त्वशास्त्र ही मानववंशशास्त्राची एक शाखा असून ती प्रागैतिहासिक युग, त्यात राहणारे लोक व त्याच्या संस्कृतीचा अभ्यास करते. पुरातत्वशास्त्रज्ञ नाणी मोहरा, शिलालेख स्मारके, घरे, हत्यारे, दागिने आणि इतर पुराव्याच्या अभ्यासाद्वारे माणसाचा इतिहास व चालीरीती याचा अन्वयार्थ लावतात. हे उत्खनन बऱ्याचदा औत्सुक्यपूर्ण असते, कधी त्याला बातमीचे मूल्य लाभते, तर कधी ते कल्पनाशक्तीला भावते. चालना देते आणि त्यातूनच मानवी वंशाचा, कला-संस्कृती, साहित्याचा सखोलपणे आढावा घेतला जातो, हे तितकेच महाकष्टप्रद आणि दीर्घकाळाचे काम आहे. इतिहासाचा वेध घेण्याबरोबरच विविध ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तूचे, स्मारकाचे बहुआयामी स्वरूपाचे हे क्षेत्र आहे.
व्याप्ती व संधी
पुरातत्वशास्त्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी विविध संग्रहालये, विदयापीठे आणि भारताच्या अभ्यास करणाऱ्या अनेक संस्थामध्ये काम करू शकतात:
पुरातत्त्वशास्त्रज्ञः
UPSC किंवा SPSC (राज्य लोकसेवा आयोग) च्या परीक्षा देऊन ‘आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञ‘ म्हणून काम करता येते स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून असिस्टट आर्किऑलॉजिस्ट पदासाठी भरती केली जाते.
प्राध्यापक:
मास्टर्स केल्यानंतर NET किंवा Junior Research Fellowship (JRF) ची परीक्षा देऊन भारतभरात कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापकपदावर नोकरी मिळू शकते. एखाद्या विशिष्ट राज्यात प्राध्यापक म्हणून नोकरी हवी असल्यास त्या राज्याची SLET (State Level Eligibility Test) दयावी लागते. JRF ची परीक्षा दिल्यानंतर डॉक्टरेटकरता विद्यार्थ्यांना पेड रिसर्च फेलोशिपही मिळते.
विविध शासकीय, आंतरराष्ट्रीय संस्थाः
आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI), स्टेट डिपार्टमेंट ऑफ आर्किऑलॉजी ‘The planning Commission” अशा भारतीय, शासकीय संस्था तसेच ‘युनेस्को‘, ‘युनिसेफ‘ यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थात काम करण्याची संधी मिळते. CRMS (कल्चरल रिसोर्स मॅनेजमेंट स्टडीज‘) कंपन्या, ICMR (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद) WHO (जागतिक आरोग्य संघटना‘) तसेच विविध स्वयंसेवी संघटना, पोलीस खाते या विभागातही पुरातत्व शास्त्रशाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
संग्रहालय क्षेत्र:
नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट, इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च अशा शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील संग्रहालयात, विविध सांस्कृतिक कलादालनात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.
संशोधन, प्रकाशन, लेखन:
पुरातत्व विभागाच्या विविध समित्यांची संशोधनाला वाहिलेली विविध मासिके, नियतकालिके यातून लेखन, संपादन, संशोधन प्रकाशनाच्याही संधी मिळतात.
आर्किटेक्चरचे शिक्षण घेतल्यानंतर आर्किऑलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना कन्झर्वेशन ऑर्किऑलॉजीमध्ये या करण्याच्या उत्तम संधी मिळू शकतात. त्याचप्रमाणे आर्किऑलॉजिस्ट, आर्किओबॉटनिस्ट, अडर वॉटर आर्किऑलॉजी इत्यादी प्रकारच्या काही विशेष संधी उपलब्ध असतात.
आज पुरातत्वशास्त्र या क्षेत्राचा विस्तार खूप वाढला आहे. कॉर्पोरेट विश्वातही हे क्षेत्र मूळ धरू पाहत आहे. या क्षेत्रात नोकरी सुवर्णसंधी मिळवण्यासाठी त्यातील अदयावत शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी परदेशातही उच्च शिक्षणाचे विविध मार्ग खुले आहेत. UCL यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडन) सारख्या मान्यताप्राप्त परदेशी शिक्षणसंस्थेतून शिक्षण घेता येऊ शकते.
आवश्यक गुण
या क्षेत्रात कार्य करण्यासाठी एक आकलनक्षम व चिकित्सक मन, सखोल निरीक्षण, विवेचक आणि तार्किक विचारशक्ती विका बुद्धिमत्ता, कलात्मक संवेदनशीलता स्वयंशिस्त व भूतकाळाबद्दल अपार कुतूहल हे गुण अंगी बाणवणे आवश्यक असते. बाहेरगावी कष्टपद परिस्थितीत काम करण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी व सशक्त असणेही गरजेचे आहे. बाहेरगावच्या प्रकल्पांच्या वाचन, मनन, लेखन, संशोधनांसोबत मौल्यवान व नाजूक गोष्टी हाताळण्याचे कौशल्य, स्वतंत्र तसेच गटात काम करण्याची वृत्ती इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या क्षेत्राविषयी कुतूहल असले तरी हे क्षेत्र तितकेसे वलयांकित नाही. ज्यांना इतिहास संशोधनात अधिक रुची आहे. कुतूहल आहे व अत्यंत परिश्रम घेऊन चिकाटीने काम करण्याची आवड आहे. त्यांच्यासाठी पुरातत्त्वशास्त्र हे चांगले आणि आव्हानात्मक करिअर आहे.
अभ्यासक्रम
पदवी अभ्यासक्रम
B.A/B.Sc
पात्रता: 12 वी पास (इतिहास विषय अनिवार्य)
पदव्युत्तर अभ्यासक्रम
- M.A/M.Sc
- M.Phil
- PGD
- Ph.D.
पात्रता: प्राचीन इतिहास / भूशास्त्र (geology)/ आर्किटेक्चर/भूगोल/ मानववंशशास्त्र/संग्रहालयशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी.
मास्टर्स डिग्रीच्या अभ्यासक्रमात प्रत्यक्ष क्षेत्रभेटीचाही समावेश असतो. यात प्रत्यक्ष भेटी देणे उत्खनन स्थळांचा अभ्यास करून त्यांचे वर्गीकरण करणे आणि उत्खननात उपलब्ध झालेल्या वस्तूंचा अर्थ लावण्याचे कार्य कसे करतात याचा थोडाफार अनुभव विद्यार्थी घेऊ शकतात.
3. इतर संबंधित अभ्यासक्रम
पोस्ट ग्रज्युएशन डिप्लोमा इन म्युझिऑलॉजी म्युझिअम स्टडीज)
पात्रता: BA/B.Sc / B.FA
कालावधी: 2 वर्षे
पोस्ट ग्रेज्युएशन डिप्लोमा इन अर्काइव्हस कीपिंग
पात्रता B.A/B.Pharm/ M.Sc/M.M.S Degree
कालावधी: 2 वर्ष