janvicharnews.com
छपाई (Printing) ही छपाईपत्र वापरून मजकूर आणि चित्रे यांच्या एकापेक्षा अधिक प्रती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. छपाई प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणातील औदयोगिक प्रक्रिया आहे. छपाई हा प्रकाशन आणि व्यावहारिक (Transaction) छपाईचा एक अनिवार्य भाग आहे.
आज छपाई तंत्रज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले असून ते आपल्या सभोवताली प्रत्येक गोष्टीमध्ये आढळून येते. प्रिंटिंगचे तंत्रज्ञान अत्यंत वेगाने विकसित होत आहे व त्याचबरोबर जुन्या पद्धती प्रचलित होत आहेत. पुस्तके, मॅगझिन किया वृत्तपत्र या सारख्या छापील (Printed) सामग्रीचा समाजावर जबरदस्त प्रभाव पडतो, तसेच ते राष्ट्रउभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
प्रिंटिंग क्षेत्रात खूप झपाट्याने प्रगती होत आहे; परंतु या क्षेत्राबद्दल समाजात पुरेशी जागरूकता नसल्यामुळे आजही या क्षेत्रात येणाऱ्या विदयार्थ्यांची संख्या कमी आहे. आजचे प्रिंटिंग क्षेत्र है मेकॅनिकल व केमिकल क्षेत्राचे योग्य असे एकीकरण आहे. या क्षेत्रातील इक मॅनेजमेंटमध्ये गणिताचा उपयोग होतो.
‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर्स मिटर्स (AIEMP) ही प्रिंटर्सची जगातील सर्वात मोठी संघटना आहे. जागतिक छपाई उदयोगात होणाऱ्या तांत्रिक घडामोडीबद्दल जागरूक राहण्यासाठी AIEMP मार्फत प्रिंटिंग आणि अलाइड मशिनरी (PAMEX) यांचे प्रदर्शन दोन वर्षात एकदा महानगरीय शहरात आयोजित केले जाते. (www.aifmp.org)
भारतात अंदाजे 2,50,000 प्रिंटर्स आहेत. भारतात अंदाजे 30 प्रिंटिंग टेक्नॉलॉजी शिकवणाऱ्या संस्था आहेत. प्रत्येक संस्थेमध्ये दर वर्षांसाठी जास्तीत जास्त 50 ते 60 विद्यार्थी घेतले जातात. म्हणजे, एका वर्षाला अंदाजे 1800 विद्यार्थी मिटिंगची पदवी घेतात. त्यामुळे प्रिंटिंग हवा क्षेत्रात नोकरीच्या खूप संधी आहेत, असे म्हणता येईल. तसेच, भारतभर ITI मार्फत अथवा पदविका प्रिंटिंगचे विविध अभ्यासक्रम राबवले जातात. यासाठी उच्च शिक्षणाची गरज नसते. तसेच सरकारच्या धोरणानुसार apprenticeship act नुसार विद्यार्थ्याला शिक्षण कालावधीमध्ये ज्ञानार्जनाबरोबर अर्थार्जनही करता येते.
प्रिंटिंग कंपन्यांचे वर्गीकरण ‘ग्राहकांचे प्रकार’, ‘छपाई होणाऱ्या उत्पादिताचा प्रकार’ आणि ‘आवश्यक असणारी उपकरणे’ यासारख्या निकषांच्या आधारे होते.
1. व्यावसायिक प्रिंटिंग – साधारणत: व्यावसायिक प्रिंटर्स अनेक प्रकारच्या उत्पादनांची छपाई (printing) करतात. यात पुस्तके, मासिके, ब्रोशर्स, कॅटलॉग्ज, डायरी, कैलेंडर व सर्वांत महत्त्वाचे असे वेष्ठण (Packaging) इत्यादी सर्वांचाच समावेश होतो.
2. पब्लिकेशन प्रिंटिंग – वृत्तपत्र, बुक, मॅगझिन हयांची छपाई करणारे प्रिंटर्स एका विशिष्ट बाजारासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचे काम करतात.
3. पॅकेजिंग प्रिंटिंग – पॅकेजिंग प्रिंटर सर्व प्रकारचे पॅकेजिंग जसे- बॉक्स कार्टन बरेज, टेंग्ज आणि लेबल्स यांचे मुद्रण करतात. : पॅकेजिंग टेक्नॉलॉजी हे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत असणारे व्यापक असे क्षेत्र आहे. पॅकेजिंग तंत्रज्ञान (Technology) हे एखादया वस्तूच्या डिझाइन संकल्पनेपासून त्याच्या विक्रीपर्यंत प्रत्येक टप्यावर महत्त्वपूर्ण ठरणारे असे क्षेत्र आहे आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या सर्वच वस्तूंच्या पॅकेजिंगच्या स्वरूपात हे तंत्रज्ञान आपण रोज अनुभवत असतो
उदा. पुस्तकाचे कव्हर, साबणाच्या वडीचे कव्हर, विविध उत्पादनांचे डबे इत्यादी.
सध्याच्या आधुनिक युगात बहुतांश उत्पादने ही आकर्षक पॅकेजिंग करून ग्राहकांसमोर मांडणे ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळेच या ‘पॅकिंग’ साठी आवश्यक असणाऱ्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचे महत्त्वदेखील वाढले आहे.
इंडस्ट्रिअल प्रिंटिंग – इंडस्ट्रिअल मिटिंगमध्ये टेक्सटाइल, पैनल्स, फ्लोअर टाइल किया बॉलपेपरवर मुद्रण करतात या यांसारख्या उत्पादनावर का कार्यात्मक मुद्रणदेखील करतात. प्रिंटेबल इलेक्ट्रॉनिक्स हे इंडस्ट्रीअल प्रिटिंगमधील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाते. प्रिंटेबल इलेक्ट्रॉनिक्स हे विविध पृष्ठभागावर (Substrates) इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसचे मुद्रण करण्याचे तंत्र आहे.
मुद्रण (printing) प्रक्रिया:
प्रिंटिंगसाठी विविध प्रकारव्या तंत्रज्ञानाचा (technologies) उपयोग होतो. यापैकी काही महत्वाच्या टेक्नॉलॉजी खालीलप्रमाणेः
ऑफसेट – या प्रक्रियेचे संपूर्ण नाव ऑफसेट मुद्रण आहे. पूर्वी यास लिथोग्राफी म्हणून संबोधत असत. लिथो म्हणजे शिळा (दगड) शिळेवर उलटी चित्रे अथवा अक्षरे चित्रित करून त्यावरून छपाई केली जात असे. ऑफसेट पुस्तक वृत्तपत्र स्टेशनरी, पकेजिंग इत्यादीच्या छपाईसाठी वापरले जाते
- फ्लेक्सो – फ्लेक्सो प्रामुख्याने पॅकेजिंग आणि लेबलसाठी, तसेच कमी प्रमाणात वर्तमानपत्रांसाठीदेखील वापरले जाते.
- डिजिटल प्रिंटिंग : डिजिटल प्रिंटिंगमध्ये व्हेरिएबल डेटा प्रिटिंगसारख्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होतो. व्हेरिएबल डेटा प्रिंटींगमध्ये मजकूर, ग्राफिक्स आणि इमेजेस या गोष्टी प्रिंटिंग प्रक्रिया चालू ठेवून सुद्धा बदलता येतात. टेलिफोन कंपनी, गैस कंपनीमध्ये मुद्रण करण्यासाठी व्हेरिएबल डेटा प्रिंटींगचा उपयोग होतो.
- “स्क्रीन प्रिंटिंग – हे छपाई तंत्र विविध प्रकारच्या सामग्री हाताळू शकते आणि यामध्ये मुद्रण पृष्ठभाग पूर्णपणे सपाट असणे आवश्यक नसते. स्क्रीन प्रिंटिंगच्या साहाय्याने टी-शर्ट्स काचेचा पृष्ठभाग किया लाकडावर छपाई करतात.
- ग्रव्हर (Gravure) :- ग्रव्हर हे असे तंत्र आहे ज्यात प्रतिमा (image) एका मुद्रण सिलेंडरवर (cylinder) कोरलेली असत सिलेंडर (cylinder) शाईने भरलेला असून या शाईने कागदावर मुद्रण केले जाते. ग्रेव्हरचा वापर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी करतात जसे- वृत्तपत्रे, मासिके आणि पॅकेजिंग इत्यादीमध्ये.
- 3D प्रिंटिंग :- सध्याचे नवीन तंत्रज्ञान म्हणजे 3D प्रिंटिंग, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स व इंजिनीअरिंग ड्रॉइंग यांच्या साहाय्याने वापरण्यायोग्य वस्तू बनवणे म्हणजे 3D प्रिंटिंग होय. 3D प्रिंटिंग अजून भारतात प्रचलित नसले तरी भविष्यात त्याची मागणी खूप वाढणार आहे. आर्किटेक्चर आणि कंस्ट्रक्शन, मेरीटाईम इंडस्ट्री, हेल्थ केअर अशा अनेक क्षेत्रात 3D मिटिंग वापरले जाते.
क्षेत्राची व्याप्ती व संधी
janvicharnews.com
प्रिंटिंग या प्रक्रियेतील टाइपसेटिंग, डिझायनिंग, पेस्टिन्स, प्लेट बनवणे, इमेज सेटिंग, कॅमेरा काम, मुद्रण आणि बायडिंगया महत्त्वाच्या पायऱ्या आहेत,
नोकरीच्या संधी उपलब्ध असणारी क्षेत्रे खालीलप्रमाणे:
- केंद्रीय आणि राज्य सरकारच्या अंतर्गत असणान्या प्रकाशन संस्था
- केंद्रीय आणि राज्य सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या प्रिंटिंग प्रेस
- खाजगी प्रिंटिंग संस्था
- प्री-पेस सोल्यूशन फॉर प्रिंटिंग इंडस्ट्री
- सुरक्षा मुद्रण (Security printing)
- प्रिंट उदयोगासाठी सॉफ्टवेअर सोल्यूशन
- प्रिंट फिनिशिंग अॅण्ड कन्व्हटिंग
- कलर मॅनेजमेंट सोल्यूशन
- ऑफसेट, फ्लेक्सोग्राफी ट्रॅव्हर आणि स्क्रीन प्रिंटिंग करणारी व्यावसायिक (Commercial) प्रिंटिंग प्रेस, वृत्तपत्रे / मासिके,
- इलेक्ट्रोसिटी बोर्ड किंवा टेलिफोन कंपनी
कोणत्याही प्रिंटिंग हाऊसमध्ये खालील पदावर विद्यार्थी रुजू होऊ शकतात.
शिकाऊ उमेदवार (Apprenticeship)
पर्यवेक्षक (Supervisor)
डिप्लोमा होल्डर
मशीन ऑपरेटर
मॅनेजर कैडर डिग्री होल्डर
विदयार्थ्यांना पर्चेस ऑफिसर म्हणून खालील कंपन्यांमध्ये नोकरीची संधी आहे.
- कोणतेही राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ
- कोणतेही प्रकाशन गृह
- लार्ज कॉर्पोरेट किंवा मॅन्युफॅक्चरिंग फार्मास्यूटिकल कंपनी
- एल. आय. सी
- बँका
- जाहिरात एजन्सी
आवश्यक गुण-
प्रिटींग या क्षेत्रात काम करण्यासाठी जुन्या आणि नवीन दोन्ही टेक्नोलॉजी अवगत करून त्यात कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे तसेच समस्यांचे निराकरण करून दिलेल्या वेळेत मार्ग काढण्यासाठी सकारात्मक वृत्ती, नियोजन व वक्तशीरपणा हे गुण आवश्यक आहेत.
प्रिटींग पदवी प्राप्त करण्याचे मार्ग-
१० वी नंतर – 3 वर्षे डिप्लोमा कोर्स -3 वर्षे डिग्री कोर्स –प्रिटींग इंजिनियरिंग पदवी- अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी 2 वर्षे – पीएचडी 3 ते 5 वर्षे