क्षेत्राची ओळख
फॅशन म्हणजे चकचकीत ग्लॅमरची दुनिया असेच या क्षेत्रात येणाऱ्यांना वाटत असते. काही अंशी सत्यही आहे.पण फॅशनचा खरा अर्थ म्हणजे स्वतःची कल्पकता व कौशल्य याचा योग्य वापर करून लोकांची आवड-निवड त्यांचे राहणीमान, जीवनपद्धती यांचा विचार करून नवीन डिझाइन्स बनवणे. फॅशन म्हणजे केवळ कपड्याचेच डिझाइन असेही नसते, तर आता कोणतीही अभिनय कलाकृती फॅशन या सदरात मोडू शकते. दरदिवसागणिक फॅशनमधील ट्रेड्स बदलत जातात. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात प्रचंड उलाढाल होत असते.
क्षेत्राची व्याप्ती व संधी
फॅशन ही संतत बदलत असते त्यामुळे सतत नवनवीन कल्पना व कल्पकता याला फॅशन क्षेत्रात प्रचंड वाव आहे. पूर्वी लग्नसराईसाठीच फॅशन डिझायनिंग केले जायचे. तसे आता नाही. या क्षेत्राची व्याप्ती खूप वाढली आहे. करिअरच्या अनेक सभी आता उपलब्ध होत आहेत. हे क्षेत्र केवळ मुलीसाठीच आहे हाही मुलींसाठीच आहे हाही एक निव्वळ गैरसमज आहे. मुलांनाही या क्षेत्रात तेव्हाच वाव आहे. नामांकित ब्रंड्सच्या डिझायनर्सची नावे पाहिल्यास त्यात पुरुष डिझायनर्स आघाडीवर असलेले दिसून येतात. भारतीय फॅशन उद्योगास परदेशातूनही खूप मोठी मागणी असते याचे मुख्य कारण म्हणजे, भारतातील कुशल कारागिरी व स्वस्त मजुरी फॅशनविषयी लोकामध्ये जागरूकता चढत असल्यामुळे या क्षेत्रातील मागण्यांमध्येही वैविध्य आहे. फॅशन डिझायनर, टेक्सटाइल डिझायनर मॉडल्स, रिटेलर्स, विविध डिपार्टमेंटल स्टोअर्स किंवा बुटिक्ससाठी काम करणारे बायर्स आणि मर्कडायझर्स असे विविध करिअरचे पर्याय येथे उपलब्ध आहेत. अनेक फैशन इन्स्टिटयूटस होतकरू तरुणांना स्वतःचा फॅशन उद्योग किया अनलाईन स्टार्टअप सुरू करण्यासाठीही प्रशिक्षण देतात. या क्षेत्रात अनेक पदावर काम करता येते जसे की फॅशन मार्केटिंग, कन्सेप्ट मॅनेजमेट, फॅशन मीडिया, डिझाइन मॉडक्शन मॅनेजमेंट फॅशन अॅक्सेसरी, क्वॉलिटी कंट्रोल, ब्रँड प्रमोशन, कॉस्ट्यूम डिझायनर फॅशन कसलटंट, अपेरल प्रॉडक्ट मॅनेजर, पर्सनल स्टायलिस्ट, टेक्निकल डिझायनर या आणि अशा आणखी अनेक पदांवर काम करता येते.
आवश्यक गुण
फॅशन डिझायनर होण्यासाठी आवश्यक गुण व आत्मसात करायची कौशल्ये खालीलप्रमाणे मांडता येतील.
नैसर्गिक: नैसर्गिक सौंदर्यदृष्टी, रंगांची रंगसंगतीची उत्तम जाण, उत्तम फैब्रिक ओळखण्याची पारखी नजर या गोष्टी अंगभूत असणे महत्त्वाचे असते.
आत्मसात करण्याची कौशल्ये फॅशन ट्रेडसवर सतत लक्ष ठेवणे व स्वतःला विकसित करत राहणे
जर तुमच्याकडे गुणवत्ता असेल. प्रत्येक गोष्टीत तुम्ही तुमचे वेगळेपण किंवा नावीन्य दाखवू शकत असाल तर हे क्षेत्र तुमचे आहे. यासाठी लोकांनी चांगलं दिसावं अस मनापासून वाटण आवश्यक आहे कारण अशा विचारातूनच आपल्या हातून उत्तम कलाकृती घडू शकते. या क्षेत्रात लवकर करिअरला सुरुवात करणे उपयुक्त ठरते शालेय जीवनातच जर तुम्ही चित्रकला, रंगकला, संगणक ग्राफिक्स याचे शिक्षण घेतले असेल, तर यामुळे तुमची कल्पकता वाढण्यास निश्चितच मदत होते. आत्मविश्वास, व्यवस्थापकीय कौशल्य, संवाद कौशल्य, मार्केटिंग नैपुण्य हे गुणही आवश्यक असतात.
थोडक्यात यशस्वी फॅशन डिझायनर होण्याची त्रिसूत्री खालीलप्रमाणे माडता येईलः
कल्पनाशक्ती——सर्जनशीलता———-कामातले कौशल्य
अभ्यासक्रम
फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात अनेक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदवी कोर्सचा कालावधी 4 वर्षांचा असून पदव्युत्तर कोर्स 2 वर्षांचा असतो. या प्रमुख कोर्सेस व्यतिरिक्त या क्षेत्रातील इतरही कोर्सेस विविध संस्थांमध्ये उपलब्ध आहेत ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.
पात्रता : पदवी अभ्यासक्रमासाठी (बॅचलर ऑफ डिझाइन): मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची 10 + 2 परीक्षा 50% गुण मिळवून उत्तीर्ण. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (मास्टर ऑफ डिझाइन): मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी (कोणत्याही शाखेची) घेतलेली असावी. तसेच, फॅशन क्षेत्रातल्या काही प्रमुख कंपन्यांमध्ये या पात्रतेव्यतिरिक्त गुणवत्तेवर प्रवेश दिला जातो. त्याचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:
- लेखी परीक्षा
- प्रासंगिक परीक्षा
- गटचर्चा
- मुलाखत
करिअर मार्गदर्शक