मर्चंट नेव्ही (Merchant Navy) आणि करिअर

-

मर्चंट नेव्ही (Merchant Navy) आणि करिअर

क्षेत्राची ओळख

- Advertisement -

मर्चंट नेव्ही हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा असून, जगभरातून माल वाहून नेण्याचे कार्य हे क्षेत्र करते. हे एक  व्यावसायिक नौकावहन (shipping) आहे. ज्यात लष्करी कामे येत नाहीत. मर्चंट नेव्ही ही नौदलापेक्षा भिन्न आहे. नौदल हे मुखत्वे राष्ट्राच्या संरक्षणात गुतलेले असते, तर मर्चंट नेव्ही व्यावसायिक सेवा पुरवते,

 एका देशातून दुसऱ्या देशात मालाचे वाहन व त्यांचे वितरण करण्यासाठी व्यापारी जहाजांवर मोठ्या संख्येने कर्मचारी काम करतात मर्चंट नेव्हीशिवाय आयत-निर्यातीचे बहुतेक व्यवसाय होऊ शकत नाहीत.

हे क्षेत्र जगभर प्रवास करण्याची संधी देते. या क्षेत्रात मिळणाऱ्या उच्च मानधनामुळे अनेक तरुण या क्षेत्रात करिअर करण्यास आकर्षित होतात. प्रवासाची तीव्र इच्छा असणाऱ्यांसाठी मर्चंट नेव्ही हे अतिशय आकर्षक असे क्षेत्र आहे. उत्तम अर्थाजनाबरोबरच समाधान व साहसाचा अनुभव देणारे असे हे क्षेत्र आहे.

क्षेत्राची व्याप्ती व संधी

शासकीय व खाजगी क्षेत्रातील कंपन्या या क्षेत्रात नोकरीची संधी देतात. या क्षेत्रातील फ्रेशर्सना, कार्गो वेसल्स, प्रवासी जहाजे, मोठी जाते क्रूझ लाइनर्स व तेल टैंकर या उपविभागांमध्ये नोकरी मिळते. मर्चंट नेव्हीचे काम तीन प्रमुख विभागात चालते.

  • डेक
  • इंजिन
  • सर्व्हिस

डेक विभाग

डेक विभागामध्ये कॅप्टन, चीफ ऑफिसर सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर आणि इतर ज्युनिअर ऑफिसर ही पदे आहेत क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विविध शिपिंग कंपन्यामध्ये थर्ड ऑफिसर म्हणून नोकरी मिळते. डेक या विभागाचा प्रमुख हा कर असतो. जहाज समुद्रात असताना नौकानयनाचे जबाबदारीचे काम कॅप्टनला करावे लागते. समुद्रात जहाजांचे स्थान वर्तवणे, कमी बाँक असलेल्या पट्ट्यातून जहाजाची वाहतूक करणे, जहाजावरील जीवनावश्यक गोष्टीचा पुरेसा साठा करणे इत्यादी कामे कॅप्टन त्याच्या कारण सहकाऱ्यांसह पार पाडती.

इंजिन विभागः

इंजिन विभागामध्ये चीफ इंजिनीअर, सेकंड इंजिनीअर, थर्ड इंजिनीअर, फोर्थ इंजिनीअर, इलेक्ट्रिकल ऑफिसर आणि ज्युनिअर इंजिनीअर हो पदे येतात. मरीन इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कंपनीत ज्युनिअर इंजिनीअर म्हणून नोकरी मिळते. या विभागात मुख्य इंजिनाशिवाय त्याच्या बरोबरीने येणाऱ्या उपकरणांचीही देखभाल करावी लागते. चौथ्या इंजिनीअरवर इंजिनाचे चलनवलन व इंजिन खोलीतील इतर उपकरणे यांच्या देखभालीचे काम असते. इलेक्ट्रिकल ऑफिसर इलेक्ट्रिकल उपकरणाची देखभाल करतो

सर्व्हिस विभाग

सर्व्हिस विभागात किचन, लाँड्री व इतर सुविधा येतात.

वाहतूक क्षेत्रातील वाढती गुंतवणूक व सागरी मार्गाने होणाऱ्या आयात-निर्यातीच्या वाढीतील सातत्य यामुळे शिपिंग उद्योगात झाली आहे. पर्यायाने मर्चंट नेव्हीमधील संधीही वाढल्या आहेत. जगभर भ्रमंती भरपूर सुट्टया तरुण वयात सर्वाधिक वेतन कमावण्याची संधी हवी असेल, तर मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्याला पर्याय नाही.

 आवश्यक गुण

या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमता, कठीण परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता, संघभावना, गटाचे नेतृत्व करणे, त्यांना आश्वस्त करून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, उत्कृष्ट गणितीय क्षमता, तंत्रज्ञानाबद्दल आवड इत्यादी गुण असणे आवश्यक आहे. याच बरोबर अनेक महिने सलग समुद्रात प्रवास करण्याची तयारी व इच्छा असणे महत्त्वाचे असते.

अभ्यासक्रम

डेक विभागामध्ये करिअरची संधी मिळण्यासाठी बीएससी नॉटिकल सायन्स, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स इत्यादी अभ्यासक्रम करावे लागतात,

तर इंजिन विभागात करिअरची संधी मिळवण्यासाठी मरीन इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवावी लागते.

याव्यतिरिक्त खलाशी म्हणून क्षेत्रात पदार्पण करण्यासाठीही कमी कालावधीचे (किमान सहा महिने) अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

या शैक्षणिक अभ्यासक्रमां व्यतिरिक्त काही अटींची पूर्तता उमेदवाराला या क्षेत्रात करिअर सुरू करताना करावी लागते.

उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे.

सामान्य दृष्टी आवश्यक आहे किंवा प्लस मायनस 2.5 पर्यंत चष्यासाठी परवानगी देऊ शकतात. दृष्टी 6/6 असावी, रातांधळेपणा नसावा.

शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे.

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

खोके संस्कृतीने देशप्रेम आणि पक्षनिष्ठा ह्या आणखी धुळीस मिळतील याबद्दल आपणास काय वाटते?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें