१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.
२) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.
४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.
५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
६) B. P. संतुलित राहतो.
७) बद्धकोष्ठता नष्ट होते.
८) आळसपणा कमी होतो.
९) डोक्यावरील केस गळत नाहीत.
१०) स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.
११) तारूण्य टिकून राहते.
१२) शरीर आतून स्वच्छ होते.
१३) किडनी स्टोन होत नाहीत.
१४) अन्नपचन चांगले होते.
१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
१६) जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते.
१७) जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते.
१८) जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते.
१९) जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.
२०) आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.
२१) तहान लागली की पाणी प्यावेच.
२२) जास्तच तहान लागली की मात्र गुळ पाणी प्यावे.
२३) क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या. अन्यथा आजार होतील.
२४) आजारपणात गरम पाणी प्यावे.
२५) रात्री जास्त पाणी पिऊ नये.
२६) पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतार वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.
२७) पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
२८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.
आरोग्य संदेश
पाणी म्हणजेच आपले जीवन
करा आरोग्यासाठी भरपूर सेवन