हैदराबाद संस्थानातील सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ
दत्ता जाधव
हैदराबाद संस्थानाचे निजामशाहीला हैदराबाद स्टेट म्हणून ओळखले जाते. मीर कमरुद्दीन कुलीखान आजम शाह निजाम उल मुल्क याने मोगल बादशाहच्या दुर्बलतेचा आणि राजकीय अस्तित्वाचा फायदा घेऊन दक्षिण भारतात हैदराबाद भागानगर येथे इसवीसन 1724 मध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली होती. निजामाच्या सात पिढया हैदराबाद वर राज्य केले. त्यात पहिला मीर कमरुद्दीन सिद्दकी दुसरा मीर निजाम अलीखान तिसरा मीर अकबर अली खान चौथा मीर नजिमौदला आली खान पाचवा मीर झिनियत अली खान सहावा मीर मेहबूब अलीखान सातवा मीर उस्मान अली खान निजामशाहीचा शेवटचा निजाम होता. हैदराबाद संस्थानात चार महसूली विभाग होते. एक मराठवाडा त्यात औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड. दुसरा गुलबर्गा त्यात बिदर, गुलबर्गा, उस्मानाबाद, रायचूर. तिसरा मेदक त्यात बलदाह, मेहबूबनगर, मेदळ नलकुंडा आणि निजामाबाद. चौथा वरंगल त्यात करीमनगर,आदिलाबाद, आणि वरंगळ. हैदराबाद राज्यातील निजाम घराण्यातील निजामानी 17 सप्टेंबर 1948 पर्यंत राज्य केले. एकून 224 वर्ष हैद्राबादच्या निजामाने राज्य केले होते. या प्रदीर्घ कालखंडात राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक सुधारणा झाल्या. हैदराबाद संस्थानातील निजाम काळात समाज व्यवस्थेचा चार वर्णाचा समावेश होता. समाजात मुस्लिम, हिंदू, ख्रिस्ती व पारसी धर्माच्या लोकांचा समावेश होता. समाजात अनेक जाती जमाती होत्या. निजाम काळात समाजावर मुस्लिम लोकांचा प्रभाव होता. कारण राजे करते
मुस्लिम होते. समाजातील प्रत्येक जाती आणि जमातीचे व्यवसाय परंपरागत चालेले होते. प्रत्येक समाजातील कुटुंबात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. कनिष्ठ वर्गातील स्त्रिया परदा वापरत नसत पण उच्च वर्गीय समाजातील स्त्रीया पडदा वापर होत्या. समाजात बालविवाह प्रथा प्रचलित होती. समाजात सतीप्रथा, पडदापद्धती, बहुपत्नीत्वाची आणि घटस्फोट घेण्याची प्रथा प्रचलित होती. निजामशाही काळात सार्वजनिक सामाजिक आणि धार्मिक उत्सवप्रसंगी
पशुबळी दिला जात असे. तांदूळ, गहु, दूध, दही, ज्वारी, तीळ आणि बाजरी या अन्नधान्य वापर आहारात समावेश होता. हिंदू पुरुष धोतर सदरा डोक्यावर पगडी घालत. स्त्रिया साडी व चोळीचा वापर करीत. मुस्लिम समाजातील स्त्रिया सलवार आणि पायजामा वापरत. मुस्लिम पुरुष कमीज आणि पायजामा वापरत. बंजारा स्त्रिया घागरा, ओढणी, काजळी, छोटला, घुघरी, टोपली वापरत. तर पुरुष धोतर, झगला,कमीज आणि डोक्यावर पगडी वापरत होते. निजामशाही काळात कलाकार प्रत्येक गावात जाऊन आप आपल्या अंगातील कलेचे प्रदर्शन करीत होते. यामध्ये गारुडी, नागवाले, माकडवाले, अस्वलवाले, डोमारी आणि कोल्हाटी कलाकार होते. या जातीच्या कलाकारांनी केलेल्या खेळामुळे लोकांचे मनोरंजन होत असे. भजन, कीर्तन, नाटके, नृत्य, संगीत आणि शिकार करणें, ही निजामशाही काळातील लोकांची मनोरंजनाची साधने होती. हैद्राबाद संस्थानात हिंदू आणि मुस्लिम दोन प्रमुख धर्म होते. हैदराबाद संस्थानात मुस्लिम लोकसंख्या 11 टक्के होती. त्याचें संस्थानावर पकडा होता. सरकारी नोकरीत मुस्लिमचा भरणा होता. केवळ विस टक्के हिंदू लोक नोकरीत होते. तेही हिंदू उच्चवर्गीय होते. निजामशाहीत कधीही हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही. निजाम आपल्या हिंदू आणि मुस्लिम प्रजेला आपल्या दोन डोळ्यांची उपमा देत असे. निजामशाही राजवटीत उर्दू ही सरकार दरबाराची भाषा होती. शाळेत उर्दू भाषेतून शिक्षण शिकवले जात होते. इंटरमीजिएट कॉलेजमधून विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट पदव्या दिल्या जात होत्या. मद्रास विद्यापीठातून बी. ए. च्या पदव्या घ्याव्या लागत होत्या. हैदराबाद संस्थानात वरंगळ, गुलबर्गा, हैदराबाद, आणि औरंगाबाद या ठिकाणी इंटरमीडिएट कॉलेजेस होती. हैदराबाद संस्थान भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. येथे इंग्रजांनी आपली शिक्षण पद्धती राबवली
नाही त्यामुळे येथील जनतेत लवकर आधुनिकतेचा शिरकाव झाला नाही. निजामाने सुधारणेचा वाटा संस्थानात लवकर लागू दिला नाही. राजा मुस्लिम होता तर बहुसंख्य जनता हिंदू धार्मिय होती. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी निजामशाहीत लवकर सुरू झाल्या नाही. हैदराबाद राज्यात विविध भाषिक लोक होते. तेलंगणाचा आठ जिल्ह्यातील लोक तेलुगू भाषा बोलणारे होते. कर्नाटकातील तीन जिल्ह्यात कन्नड भाषा बोलणारे तर मराठवाडय़ामधील पाच जिल्ह्यात मराठी भाषा बोलणारे लोक होते. मुस्लिम उर्दू भाषा बोलणारे होते. बंजारा गोरमाटी भाषा बोलत होते.
हैदराबाद मुक्तीसंग्राम आंदोलनाची कार्य आर्य समाजाने केली होती. आर्यसमाज संघटना संपूर्ण हैदराबाद संस्थानात संघटनात्मक कार्य करणारी एकमेव संघटना होती. हैदराबाद संस्थानातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक राजकीय व्यासपीठ तेथे आवश्य होती. ही राजकीय व्यासपीठ हैदराबाद स्टेट काँग्रेस नावाने ओळखले गेले. ही राजकीयसंघटना होती. हैदराबाद संस्थानातील समाजजागृती करण्याचे कार्य आर्य समाजाने केली होती. हैदराबाद संस्थानातील हिंदू समाजात धार्मिक राजकीय आणि सामाजिक जागृतीचे कार्य आर्य समाजाने केले. समाजास राजकीय धार्मिक जागृती झाल्याशिवाय तो समाज अन्याय अत्याचारविरोधात पेटून उठत नसतो. हैदराबाद संस्थानात इसवी सन 1880 मध्ये किल्ल धारूर जिल्हा बीड मराठवाड्यात सर्वप्रथम आर्य समाजाची स्थापना झाली. इसवी सन 1892 मध्ये या संस्थेचे स्थलांतर हैदराबाद या ठिकाणी सुल्तान बाजार येथे झाले.
इसवी सन 1930 पर्यंत हैदराबाद संस्थानातील प्रत्येक जिल्ह्यात आर्य समाजाची स्थापना झाली. या आर्य समाजाने हैदराबाद संस्थानातील जनतेत जनजागृती करून स्वातंत्र्य आंदोलनाची भरणी केली.सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणले. हे हिंदूंचे एकीकरण करण्याचे कार्य केले. हिंदू धर्मातील लोकांची अस्मिता जागृत करण्याचे कार्य आर्य समाजाने केले होते. आर्य समाजाने केलेल्या जनजागृतीमुळेच हिंदू समाज निजाम सरकारच्या विरोधात उद्रेक करण्यासाठी पेटून उठला होता. 7 डिसेंबर 1934 ला हैद्राबाद येथे “वेदिक आदर्श; हे साप्ताहिक सुरू केले. आर्य समाजानी त्याची जबाबदारी पंडित नरेंद्रजी यांच्यावर सोपवली होती. आर्य समाजाने ठिकठिकाणी आर्य कन्या पाठशाळा स्थापन केल्या व त्याद्वारे स्त्रियांमध्ये जागृती घडवून आणली.
जातीय भिन्नता नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित करणे, ही आर्य समाजाची कार्य होती. हैदराबाद स्टूडेंट्स यूनियनची विद्यार्थी संघटना होती. सोलापूर येथे यासंघटनेची स्थापना झाली होती. दयानंद कॉलेज नावाची एक कॉलेज सोलापूर या ठिकाणीहोती. सोलापूर येथे विद्यार्थ्यांनी या संघटनेची स्थापना केली होती. ही संघटना राजकीय चळवळीत सहभागी होत होती. आर्य समाजानी हैदराबाद संस्थानातील हिंदू समाजात जनजागृती करून त्यांना वैदिक धर्माच्या नावाखाली स्वातंत्र्य आंदोलनातसाठी संगठीत केले. आर्य समाजाने जातीप्रथा, सतीप्रथा बालविवाह बंदी, रूढी परंपरा आणि कर्मकांड यांच्या विरोधात बंड पुकारले होते. हैदराबाद स्वातंत्रसंग्रामातील आर्य समाजाची कामगिरी सुरुवातीपासूनच फार सक्रिय होती. शैक्षणिक व सामाजिक परिषदेमुळे समाजात जागृती होण्यास मदत झाली. पहिली शिक्षण परिषद हैद्राबादला भरली होती. दुसरी सन 1916 ला औरंगाबाद येथे भरली होती. तिसरी व चौथी सन 1917 मध्ये हैद्राबाद येथे भरली होती. पाचवी सन 1919 मध्ये लातूर येथे भरली होती. या परिषदेमधून उस्मानिया विद्यापीठ ईसवी सन 1918 साली स्थापन झाले. महाराष्ट्र परिषदेची जवळपास 1937 ते 1939 या काळात सहा अधिवेशने झालेली होती. या सहा अधिवेशनाच्या सुरूवात च्या तीन अधिवेशनापर्यंत अध्यक्षांची भाषणे मवाळ होती. नंतरच्या तिन्ही अधिवेशनात जहाल गटाची भाषणे चालू झाली होती. या परिषदेने जनतेत जागृती करून त्यांना संघटित केले. 1937 ला या परीषदेची स्थापना झाली होती. हैदराबादतील नेत्यांनी 19 जून 1938 रोजी एक बैठक घेऊन हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेची स्थापना केली. स्वामी रामानंद तीर्थ हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू होऊन यशस्वी झाले.
हैदराबाद स्वातंत्र आंदोलनाची सुरुवात मराठवाड्यातील औरंगाबाद या शहरातून वंदे मातरम या सत्याग्रहानंतर आंदोलनं झाली. उस्मानिया विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केली. सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालयातील, विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संप पुकारला होता. हैद्राबाद संस्थानातील वंदे मातरम सत्याग्रह दडपून टाकण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केले. या मुळे संस्थानात हिंदू जनतेत आक्रोश निर्माण झाला होता. यामुळे स्वातंत्र्य आंदोलनाच्या पाया घातला गेला. 30 जानेवारी 1942 ला निझाम सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. निजाम सरकारने स्वामीजीना नामपल्ली रेल्वे स्टेशन वर 16 ऑगस्ट 1939 ला अटक करून चंचलगुडा जेलमध्ये पाठवण्यात आले होते. 11 जून 1947 रोजी निजामाने हैदराबाद राज्य स्वतंत्र राहणार असल्याची घोषणा केली. हा दिवस मुबारक दिन या नावाने प्रसिद्ध झाले. संस्थानाच्या विलीनीकरण करण्यासाठी स्वामीच्या नेतृत्वाखाली चळवळ करण्याचा निर्णय घेतला.
हैद्राबाद संस्थानात 15 आगस्ट 1947 भारतीय स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले होते. स्टेट काँग्रेसच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळ पास 1046 गावात सामुदायिक झेंडावंदन करण्यात आले. हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अहिंसात्मक मार्गाने जनजागृती आणि चळवळ सुरू केली होती. निजामाने पोलीस लष्कराच्या जोरावर सत्याग्रह करणार्यावर लाठीहल्ले व गोळीबार करीत होते. अशा वेळी स्वातंत्र्यासाठी निजामशाही विरुद्ध स्वतंत्र लढा देणे आवश्यक झाले होते.
त्यामुळे हैदराबाद राज्यातील स्वातंत्र्यसैनिक सरकारी धान्य कोठारे लुटण्याचे कार्य केले. हैदराबाद राज्यात सर्वत्र निजामशाहीच्या सत्तेविरूद्ध स्वातंत्र्याचा लढा दिला जात होता. इसवी सन 1920 ला बहादूर यार यांनी मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेची स्थापना केली होती. रझाकार हे मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेचे लष्करी भाग होते. रझाकार हे शस्त्रधारी संघटनेचे सदस्य होते. रझाकारांचे प्रारंभिक उद्देश धर्म व मुसलमान लोकांना संरक्षण देणे होते. सातवा निजाम या संघटनेचा संस्थापक व सुत्रधार होता. या संघटनेला निजामची पार्टी म्हणून ओळखले जात असे. रझाकार यांच्या बावन केंद्रे होती. रझाकारांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी केंद्र उघडण्यात आली होती. 1948 साली रझाकारांची संख्या जवळपास 2,00,000 होती. रझाकारांच्या लष्करी सहकार्यावर निझाम आणि कासीम रझवी हैदराबाद राज्य स्वतंत्र ठेवण्याची घोषणा करीत होते. हैदराबाद संस्थानातील रझाकारांनी अनेक हिंदूच्या कत्तल केली होती. हिंदू धर्मातील लोकांची घरे लुटण्यात आली होती. कासीम रझवी वाटेल त्या वल्गना करत होता. 31 मार्च 1948 रोजी भाषणात म्हटले की, “जोपर्यंत हैदराबाद मुसलमानांना सार्वभौमत्व मिळणार नाही तोपर्यंत तलवार म्यान घालू नका एका हातात कुराण व दुसर्या हातात तलवार घेऊन शत्रूचा नाश करा” 12 एप्रिल 1948 रोजी केलेल्या भाषणात म्हटले की, जोपर्यंत निजामशाई झेंडा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकाविला जाणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही”. 9 जून 1948 ला कासीम रझवी याने म्हटले, की, राष्ट्राचे भवित्तव्य लेखणीच्या टोकावर नव्हे, तर तलवारीच्या टोकाने घडत असते. या देशाचे भवितव्य रझाकारांच्या हाताने घडणारे आहे. निजाम सरकार आणि रझाकारांच्या सिपाही आणि मुसलमानांनी मनात आणले तर एकही हिंदू शिल्लक राहणार नाही. रझाकारांनी मनात आणले तर एका हिंदूचे डोके शिल्लक राहणार नाही. हैदराबादच्या स्वातंत्र्याच्या निर्णय यमुनेच्या काठी लाल किल्ल्यात होणार नाही तर कृष्णा नदीच्या काठी गोलकोंडाच्या किल्ल्यात होईल. हैदराबाद संस्थानातील बिकट परिस्थितीचा विचार करून भारत सरकारने हैदराबाद राज्यावर पोलीस कारवाई करण्याचे ठरवले. त्यानुसार 13 सप्टेंबर 1947 रोजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरलच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याच्या तुकडीने तीन दिवसात संस्थानातील रझाकारांच्या सोबत लढाई करून हैदराबाद संस्थान ताब्यात घेतला होता. निजामशाहीचा विलय शांतीपूर्ण व्हायला हवा होता. काँग्रेसला तसे करता आलेही असते. परंतु हैद्राबादच्या मुस्लिम शासक आणि रझाकारांना धडा शिकवायचा होता. म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठे अत्याचार केले. ते इतके भयानक होते की, त्या काळात उस्मानाबाद जिल्हा हा तर मुस्लिम विधवांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध झाला होता. पंडित सुंदर लाल कमीशनच्या अहवाला प्रमाणे त्यावेळी उस्मानाबाद शहरातील मुस्लिमांची संख्या 10 हजार होती ती या नरसंहारानंतर तीन हजार उरली होती. गुलबर्गा येथे 5 ते 8 हजार, नांदेड येथे 2 ते 4 हजार मुस्लिमांची हत्या झाली होती.
17 सप्टेंबर 1948 ला निजामशाही शासनाचे भारतात विलीनीकरण झाले. हे विलीनीकरण सोपे नव्हते. यामागे एक रक्तरंजित इतिहास दडलेला आहे, 13 ते 17 सप्टेम्बर 1948 दरम्यान झालेले हैदराबादचे मिलिटरी ऍक्शनने पाच दिवसांत 224 वर्ष जुनी निजामशाही राजवट खालसा केली. ’निजाम& म्हणजे व्यवस्था, ’शाही’ म्हणजे राज्य. हैद्राबाद राज्याला निजामशाही म्हणण्याचा प्रघात आहे मात्र या सल्तनतेचे अधिकृत नाव ’आसफजाही सल्तनत’ आकार आणि श्रीमंतीच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या या सल्तनतीला ’हैद्राबाद स्टेट’ म्हणूनही ओळखले जायचे. निजामशाहीची स्थापना चिनकुलीखान मीर कमरूद्दीन सिद्दीकी यांनी केली. ते तातार म्हणजे मुगल वंशाचे व समरकंदचे राहणारे होते. 1773 मध्ये मोगलांनी त्यांना दक्कनचा सुभेदार नेमला होता.
1707 मध्ये औरंगजेब यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी 1724 मध्ये ’आसिफजाह’या पदनामाने हैद्राबाद येथे आपली आसिफजाही सल्तनत कायम केली. ’आसिफ’ म्हणजे योग्य मंत्री आणि ’जाह’ म्हणजे सन्मान. म्हणजेच मोठ्या सन्मानाचा योग्य मंत्री असा आसिफजाह या शब्दाचा अर्थ होतो. या सल्तनतचे क्षेत्रफळ 82 हजार 686 स्क्वेअर माईल्स एवढे प्रचंड म्हणजे ब्रिटनआणि आर्यलंड पेक्षाही मोठे होते. 1941 च्या जनगणनेप्रमाणे या सल्तनतमध्ये 1 कोटी 60 लाख 34 हजार लोक राहत होते. त्यातील 80 टक्के हिंदू तर बाकी 20 टक्क्यांमध्ये इतर धर्माचे लोक होते. ही रियासत लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत त्या काळातील 562
रियासतींमध्ये सर्वात मोठी रियासत होती. निजामशाही काळातील जामिया, निजामिया,निजाम इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, उस्मानिया विद्यापीठ, उस्मानिया युनानी हॉस्पिटल, निजाम जनरल हॉस्पिटल, निजाम क्लब, निजाम चॅरिटेबल ट्रस्ट, चिरान पॅलेस, चौमहल्ला पॅलेस, किंग कोठी, फलकनुमा पॅलेस (आजचे ताज-कृष्णा हॉटेल), दिल्ली येथे हैद्राबाद हाऊस, मक्का येथे रूबात, कलकत्ता, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या नाईस शहरात कोठ्या. सिकंदराबाद कॅन्टोनमेंटचे बांधकाम, लकडीका पुलचे बांधकाम, रेल्वे, स्वतंत्र डाक- तारची व्यवस्था, स्वतःची मुद्रा, 1941 साली स्टेट बँक ऑफ हैद्राबादची स्थापना, हुसेन सागर, निजाम सागर धरण, स्टेट बँक ऑफ हैदराबाद ची स्थापना इत्यादी निजामशाही काळातील प्रमुख कामे झालेली होती. याशिवाय, माहूरच्या रेणुकादेवी संस्थान, नांदेडचा गुरूद्वारा तसेच रियासतीमधील अनेक मंदिर, मस्जिद, दर्गाह इत्यादींना इनामी जमीनी, देशमुख, देशपांडे, माली पाटील, पोलीस पाटील इत्यादी पदांची निर्मिती व त्यांच्या मार्फतीने
चोख महसुली व्यवस्था इत्यादी महत्त्वाची कामे निजामच्या काळात झाली. सातवे निजाम मीर उस्मानअली हे त्या काळातील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यामुळे त्यांचे चित्र व त्या काळातील क्रमांक एक च्या अमेरिकेतून प्रकाशित होणार्या ’टाईम मॅग्झीन’च्या मुखपृष्ठावर प्रकाशित करण्यात आले होते. त्या काळी इम्पेरियल बँक ऑफ इंग्लंड जी की ब्रिटनची रिझर्व बँक होती. तिच्या भांडवलातील मोठा हिस्सा निजाम उस्मानअली पाशा यांचा होता. हिरे, मोती, सोने अफाट होते. त्या काळातील जगातील पाचव्या क्रमांकाच्या हिर्याचा निजाम पेपरवेट म्हणून उपयोग करीत होते. त्यांच्या पदरी ब्रिटनमध्ये तयार झालेल्या व बोईंग विमानाचे इंजिन तयार करणार्या रोल्स राईस या कंपनीच्या अनेक कार होत्या. मीर महेबूबअली पाशा यांचे कपडे मँचेस्टरहून तर सुगंध फ्रान्सच्या लुईस शहरातून येत असे.38 लोकांची नेमणूक महलातील झूंबर आणि दिवे साफ करण्यासाठी करण्यात आलेली होती.
:मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन व रजाकार संघटनेचे अध्यक्ष अॅड. कासीम रिझवी यांच्या सल्ल्यानुसार सुरूवातील भारतात विलीन होण्यास नकार देणार्या निजाम-उल-मुल्क मीर उस्मानअली पाशा यांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. मराठवाडा मुक्ती संग्रामचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थकडे होते. या मुक्ती संग्रामामध्ये सामील असलेल्या इतर प्रमुख व्यक्ती म्हणजे गोविंदभाई श्राफ, अनंत भालेराव, शंकरराव चव्हाण, पी.व्ही. नरसिम्हाराव, विजयेंद्र काबरा, फुलचंद गांधी, मुल्ला अब्दुल कय्युम खान, सय्यद अखील होते. जनरल करीअप्पा यांना बोलावून सरदार पटेल यांनी हैद्राबाद खालसा करण्यासाठी योजना तयार करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ऑपरेशन ’पोलो’ची आखणी करण्यात आली. त्या काळात
हैद्राबाद शहरामध्ये पोलो खेळण्याचे 8 मैदान होते. त्यावरून हे सांकेतिक नाव या ऑपरेशनला देण्यात आले. 13 सप्टेंबर 1948 साली सोलापूरहून भारतीय सेनेचे पथक मेजर जनरल जयंत-नाथ चौधुरी यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबादकडे रवाना झाले व 17 सप्टेबरला सकाळी 9 वाजता बेगमपेठ विमानतळावर निजाम मीर उस्मानअली पाशा यांनी त्यांचे सेनाप्रमुख सय्यद हबीब एद्रुस यांच्यासह शरणागती पत्करली. येणेप्रमाणे 224 वर्षाच्या निजामशाहीचा अंत झाला.