👇
भाग – १ 👇

👉 भविष्य शोधून सापडत नाही ते घडवाव लागत…👉 योग्य वेळी घेतलेला निर्णय आपले भविष्य उज्ज्वल करू शकतो… हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या २१ वर्षापासून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी, भविष्यात तो आदर्श तसेच संस्कारक्षम व्यक्ती कसा होईल यासाठी योग्य धडे देत आलो आहोत, आणि आज त्याचे फळ म्हणजे आमचे हजारो विद्यार्थी स्वावलंबी झालेले आहेत. विविध कंपन्या तसेच शासकीय नोकरी, वेगवेगळे उद्योगांमध्ये आमचे विद्यार्थी यशस्वी झालेले दिसत आहेत.
यशस्वी झालेल्या एखादा विद्यार्थी समोर आला की एवढा आंनद होतो तसेच अभिमान वाटतो की त्याची किमंत करता येत नाही.
पालकांना माझी विनंती आहे की मुलांना रेसचा घोडा बनवू नका त्याला जे आवडते ते करू द्या, त्याला मानसिक अपंग बनवू नका, त्याला त्याचे निर्णय घ्यायची संधी द्या, तो चुकत असेल तर त्याला त्याचा मित्र बनून मार्गदर्शन करा, त्याला दम देऊ नका, त्याला थोडे मनमोकळेपणाने जगु द्या, त्याला फक्त परस्थितीची जाणीव करून द्या, परस्थिती त्याच्यापासून लपवू नका, आपल्या दैनदिन प्रत्येक व्यवहारामध्ये त्याला सहभागी करुन घ्या, गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व शासकीय तसेच खासगी ऑफीसच्या कामकाजाची त्याला माहिती करून द्या.
बऱ्याच वेळा आपण त्याला टिव्ही बघू नको म्हणतो आणि आपण बघत बसतो, तंबाखूच व्यसन वाईट आहे म्हणतो आणि आपणच त्याच्यासमोर खातो, मोबाईल खेळू नको म्हणतो आणि आपणच तासनतास मोबाईल खेळत बसतो त्यामुळे आपण अगोदर आपल्या स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्या मग मुलांना आपोआप लागतील कारण मुल आपल अनुकरण करत असतात.
मुलांकडे लक्ष देण्याच्या वेळेत आपण मुलांसाठी संपत्ती कमवायच्या मागे लागतो आणि आपल इथच चुकत मुलांच्या लक्षात येते की बापानं भरपूर कमवून ठेवलय आपल्याला काहीच करायची गरज नाही, जास्त संपत्ती कमविण्यापेक्षा मुलांच्या करिअरकडे लक्ष द्या. संपत्ती चांगल्या मार्गाने कशी कमवायची असते हे त्याला लहानपणापासून धडे द्या बघा तो आयुष्यात कधीच अयशस्वी होणार नाही आणि तो आदर्श व्यक्ती झाल्याशिवाय राहणार नाही.
शब्दांकन….✍️
गोरख मोरजकर
शिक्षणतज्ञ