Home कृषी साक्षरता प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा बळी: संपूर्ण मानवजातीच्या हिताचे नाही

प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा बळी: संपूर्ण मानवजातीच्या हिताचे नाही

0
प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा बळी: संपूर्ण मानवजातीच्या हिताचे नाही

प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा बळी: संपूर्ण मानवजातीच्या हिताचे नाही

डॉ निखील अडसुळे

मानवाचे अस्तित्व पृथ्वीवर आले त्याच्याही आधीपासून या निसर्गाचे अस्तित्व होते. मी “अस्तित्व होते” असा शब्द प्रयोग केला कारण आज या भव्य, दिव्य आणि चमत्कारिक निसर्गाचा बराचसा भाग आपणच वापरला. जर त्याकाळी निसर्गाच्या अनमोल खजिन्याची किंमत कळली नसती तर आपण आजही अप्रगत आणि अश्मयुगीन जीवन जगात असलो असतो. तेव्हापासून आतापर्यंत आपण जी दैदिप्यमान प्रगती केली आहे त्यात मुख्य आणि मोलाचं वाटा हा याच निसर्गाचा आहे.

www.janvicharnews.com

जेव्हा आदिमानव निसर्गाच्या चमत्कारिक गोष्टींना नवल करून पहायचा तेव्हा कदाचित त्याला त्या गोष्टी समजण्या पलीकडच्या झाल्या असाव्या. आकाशात चमकणारी वीज, सूर्यास्त आणि सूर्योदयाला असलेला आकाशाच्या रंग, चंद्राच्या रोज बदलणाऱ्या कला, ग्रहण, इत्यादीमुळे आदिमानव निसर्गाकडे कुतुहल म्हणून पाहू लागला असेल. कुतूहलापोटी त्याने निसर्गाच्या बारीक मोठ्या गोष्टीकडे लक्ष दिले असता त्याच्या असे लक्षात आल असावं की त्या माणसाचं अस्तित्व या निसर्गापुढे शून्य आहे. कारण निवारा मिळवण्यासाठी निसर्गाचीच जागा वापरतो. हिंस्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी झाडाचा वापर करतो आणि जर भूक लागली तरीसुद्धा हाच निसर्ग माणसाच्या मदतीस आलेला आहे हे आदिमानवास त्याकाळी कळलेलं होतं. त्याच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीत निसर्ग त्याला मदत करत होता हे लक्षात आल्यानंतर त्याचा निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलला असावा. ज्या निसर्गाकडे तो यापूर्वी कुतूहलाने पाहत होता त्याच निसर्गाबद्दल तो कृतज्ञ झाला. निसर्गाच्या पलीकडे काहीही श्रेष्ठ नाही अशी एक संकल्पना त्यांच्या मनात घर करून बसली असावी.

हे जरी खरं असलं तरी आजची परिस्थिती ही काहीशी वेगळीच दिसत आहे.

www.janvicharnews.com

आजच्या युगात पाहिले असता या दशकामध्ये माणसाने माणुसकी हरवली आहे असे वाटत आहे. या दशकात माणसाने माणुसकी हरवल्याचे असंख्य उदाहरणे तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतील. 2019 मध्ये तर कहरच केला. या काही महिन्यांमध्ये अनेक घटना घडल्या ज्यामुळे सर्वांनाच वाटत आहे की पृथ्वीच्या विनाशाला सुरुवात झाली. ॲमेझॉन हे जगातील सर्वात संपन्न, जैवविविधतेने नटलेल्या ठिकाणांपैकी एक. ॲमेझॉन च्या जंगलाला पृथ्वीची फुप्फुस असं देखील म्हटलेलं आहे. जगाला लागणारा 20 ते 25 टक्के ऑक्सिजन फक्त ॲमेझॉन च्या जंगलांमधून येतो. या जंगलात असंख्य प्राणी, पक्षी, मासे, बेडूक, साप इत्यादी राहतात. ऑगस्ट महिन्यामध्ये या जंगलाला आग लागली होती. तिथल्याच काही राजकीय भांडणामुळे या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

याचा परिणाम, त्या आगीमध्ये असंख्य प्राण्यांची जीवित हानी झाली. जर मानवाने वाद-विवाद यामध्ये न पडता आपण निसर्ग कडूनच आलेलो आहोत आणि निसर्ग संकटात असताwww.janvicharnews.comना आपण निसर्गाला जमेल तेवढी मदत केली पाहिजे या भावनेने मदत केली असती किंवा आग विझवली असती तर जगाची फुप्फुस अजूनही चांगली राहिली असती. बीबीसी न्यूज 12 ऑक्टोबर 2019 ला प्रसारित केलेल्या अहवालानुसार ती आग अजूनही विझली नव्हती. हे उदाहरण एवढ्या प्रकर्षाने सांगावेसे वाटते कारण जंगलाला आग किंवा वनवा लागणे ही साधारण गोष्ट आहे. प्रगतीच्या टप्प्यावर माणूस उभा असताना या आगीवर नियंत्रण कसे मिळवावे हेही त्याला चांगलेच माहित आहे. सर्व प्रगत तंत्रज्ञान जवळ असतानाही जंगलाला जी आग लागली ती आग काही आठवडे तशीच धगधगत राहिली. याचाच परिणाम तिथल्या स्थानिक तापमानावर झाला. तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये जो पाऊस झाला तो काळा पाऊस होता कारण आगीच्या धुरामुळे तयार झालेली ढग राख घेऊन पावसाच्या रूपात आजूबाजूंच्या शहरांवर पडली. दोन महिन्यांहून अधिक काळ जंगलातील वणवा टिकला म्हणून हा विपरीत परिणाम झाला.हा परिणाम केवळ स्थानिक लोकांसाठीच नव्हे तर जगासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण ॲमेझॉन च्या जंगलाला लागलेली आग ही ही ग्लोबल वॉर्मिंग मध्ये अप्रत्यक्षरीत्या परिणाम दाखवून गेली.

असाच विरोधाभास आपल्याला भूटान या राष्ट्रांमध्ये पाहायला मिळतो. भूटान हे राष्ट्र ब्राझील पेक्षा नक्की छोटे आहे पण जगातल्या छोट्या देशांपैकी एक अशा या उद्देशाने जगापुwww.janvicharnews.comढे स्वतःचे उत्तम उदाहरण उभे केले. ब्राझील सारखेच भूतान राष्ट्र जैवविविधतेने नटलेले आहे. याच राष्ट्रांमध्ये तिथल्या स्थानिक लोकांना मोफत वीज पुरवली जाते. याचं कारण लक्षात घेता असे दिसून येते कि या राष्ट्राने त्यांच्या या देशातील नागरिकांना इंधन म्हणून लाकडाचा वापर कोणत्याही प्रकारे करण्यात येऊ नये याची खबरदारी घेतली असावी आणि म्हणूनच या राष्ट्रांमध्ये त्यांच्या नागरिकांना मोफत वीज पुरवठा केला जातो. हे एक उदाहरण म्हणून घ्यावे कारण फक्त मोफत वीज पुरवठा केल्यामुळे तेथील स्थानिक जंगलांची तोड ही कायमस्वरूपी बंद झाली.आज भूटान देशामध्ये जेवढा कार्बन उत्सर्जित होतो तेवढा सगळा कार्बन हा तिथल्या झाडांमुळे शोषला जातो. कार्बन न्यूट्रल ही संकल्पना अगदी तंतोतंत देशासाठी जुळते पण भूतान देशांमध्ये एवढी वनसंपदा आहे की भूतान देशाला जगातील प्रथम कार्बन निगेटिव्ह देश म्हणून ओळख मिळाली. 

www.janvicharnews.com

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कांगारू देश ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा हृदय हेलावणारी घटना घडली. ऑस्ट्रेलियातील जंगलांना आग लागली आणि आणि त्या आगीमध्ये शेकडो नाही तर तब्बल 48 कोटी जनावरे जळून मेली अशी नोंद दिव्य मराठीच्या तसेच बीबीसी न्यूज अहवालात आहे. एका प्राण्याचे किंवा एका पक्षाचे किंवा एका सजीवाचे महत्त्व आपल्याला जरी कमी वाटले तरी पर्यावरणाच्या दृष्टीने त्या प्रत्येक सजीवाचे तेथील इकोसिस्टीम मध्ये खूप महत्त्व आहे. तो एक सजीव कोणाचातरी भक्ष ठरून भूक भागवू शकतो आणि तोच एक सजीव कदाचित दुसऱ्या सजीवाला भक्ष बनवून त्या सजीवाची संख्या नियंत्रित करण्याचं काम करत असतो. त्यामुळे एका सजीवाला इकोसिस्टीम मध्ये फार महत्त्वाचे स्थान मिळालेला आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामध्ये अशी सर्वात मोठी जंगलाला लागलेली आग आणि त्या आगीमध्ये 48 कोटी जनावरे मेली ही संख्या विचारात घेता ऑस्ट्रेलियाच्या इकोसिस्टीम मध्ये भविष्यात होणारा बदल हा नक्कीच विचित्र ठरेल याबद्दल दुमत नाही.

बिहार मध्ये जिवंत नीलगाय जमिनित काढण्यात आली. माणसाच्या जातीला काळीमा फासणारा हे कृत्य. माणसाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्याने त्या गोष्टीला इतwww.janvicharnews.comक्या अमानुष पद्धतीने नष्ट करावा हे खरच एक दुर्दैवी बाब आहे. याच नील गाईंच्या कळपा मुळे शेतीचे नुकसान होते अशी बिहारची स्थिती आहे. पण त्यांना मारण्याची इतकी अमानुष पद्धत का अमलात आणली असावी? माणसात खरच माणुसकी शिल्लक राहिली नाही का? जमिनीत गाडून मारणे हाच पर्याय शिल्लक होता का? असे अनेक प्रश्न ती ध्वनिचित्रफीत पाहताना मनात वादळ निर्माण करून जातात.

प्रगतीच्या नावाने रस्ता रुंदीकरणाचे काम असेल किंवा  मेट्रोसाठी जागा उपलब्ध करून देणे असेल. या प्रगतीच्या टप्प्यावर आपण निसर्गाचा समतोल ढळू न देता केलेलं काम हे कधीही उत्तम ठरेल. याचं एक उत्तम उदाहरण पुणे शहरात पाहायला मिळेल. मेट्रो साठी जागा उपलब्ध करून देत असताना आकाशवाणीच्या भागातील काही ही जुनी झाडं कापावी लागणार होती. पण ती झाडं न कापता त्यांचं पुनर्रोपण करून प्रगतीसाठी मार्ग खुला केला. कारण त्यांना एका झाडाचं महत्व माहिती असावं. एक मोठे झाड तीन हजार स्क्वेअर फूट हवा शुद्ध करतो. एका झाडामुळे आसपासच्या वातावरणात चार डिग्री चा फरक जाणवतो. तसेच एक झाड जर घराशेजारी असेल तर ध्वनीप्रदूषण होत नाही आणि त्या घरातील सर्वजण हायपर टेन्शनमुळे आजारी पडणार नाहीत. अशाच पद्धतीने जर प्रत्येक शहराने रस्ता रुंदीकरणासाठी घेतलेल्या कामांमध्ये झाड कापण्याची ऐवजी तयार होणारे नवीन रस्त्याशेजारी त्याच झाडांचे पुनर्रोपण केले तर तिथल्या वातावरणामध्ये चांगला बदल दिसून येईल. एक पन्नास ते शंभर वर्ष जुने झाड कापले आणि आणि त्याची भरपाई म्हणून 50 झाडे लावली तरीही ही 50 झाडे पन्नास वर्ष जुन्या असलेल्या त्या झाडाची बरोबरी करू शकत नाहीत.www.janvicharnews.com

           माणूस आणि निसर्ग यांमध्ये खरंच समतोल असला पाहिजे. प्रगतीच्या मार्गावर जात असताना माणूस आणि निसर्ग दोघेही सोबत चालले पाहिजेत. पण इथे होतं काय प्रगती करत असताना मानव निसर्गाला विसरून स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न असतो. ह्याच स्वार्थी प्रयत्नांमध्ये स्वतःचेच नुकसान नकळत करून घेत असतो. हे झालेले नुकसान कालांतराने दिसून येते. मनुष्य तो मनुष्यच स्वतःची प्रगती करत राहणार आणि ज्याच्यामुळे मोठे झाला त्या या निसर्गालाच विसरून जाणार. पण माणसाच्या स्व- प्रगतीच्या लढाईमध्ये विजय फक्त निसर्गाचाच होणार.