Home व्यापार विश्व जीएसटी पासून स्वतःला कसे वाचवायचे?

जीएसटी पासून स्वतःला कसे वाचवायचे?

0
जीएसटी पासून स्वतःला कसे वाचवायचे?

जीएसटी पासून स्वतःला कसे वाचवायचे?

सरकारला दोष देऊ नका…

थोडं डोकं चालवा आणि जीएसटी पासून सुटका करून घ्या.

१.जेव्हा जेव्हा बाहेर जाल तेव्हा पाण्याची बाटली सोबत ठेवा… बाहेर दुकानातून बाटली विकत घेऊ नका.

२.प्रवासात सोबत दशम्या, उपमा, पोळीचे रोल्स, खिचडी करून सुटसुटीत PACK करून घ्या, बाहेर हॉटेलात किंवा कुठेही अन्न विकत घेऊन खाऊ नका.

३.घरात लागणारा किराणा, भाजीपाला जवळच्या छोट्या दुकानातून घ्या, भाजी खरेदी करायची असेल तर घराजवळील के छोटे दुकान वा गाडी वाल्या कडून घ्या,, सुपर मार्केट मध्ये जाणे बंद करा.

४.शनिवार-रविवार मोठ्या मॉल मध्ये जाणे बंद करा, याच्या ऐवजी आपल्या मित्र मंडळींकडे, नातेवाईकांकडे जा, आपले नाते संबंध घट्ट करा.

५.मोठे मोठे मल्टीप्लेक्स INOX, PVR अशा चित्रपटगृहात जाणे बंद करा. सिंगल स्क्रीन टॉकीज मध्ये जाऊन सिनेमा बघा…तिथे GST नाहीये.

६.सकाळ संध्याकाळ व्यायाम, योगासने, उद्यानफेरी नंतर घरी येऊन चहा-कॉफ़ी घ्या .. हॉटेल वर नाही.

७.कुठे प्रवासाला गेलात तर मित्राकडे, नातेवाईकांकडे उतरा … रिसॉर्ट्स/ हॉटेल/लॉज मध्ये उतरू नका.


८- ताक दूध, दही, ताक लोणी, घेतल्या पेक्षा गवळ्या कडून वा घरा जवळील दुकानातून सुटे दूध घ्या. त्यातूनच घरी दही, ताक, बनवा.


९- कोणतेही धान्य घेताना PACKING केलेले न घेता सुटे घ्या.

Government ने आपण आपले मित्र, नातेवाईक, शेजारी, यांना महत्व द्यावे यासाठी हे खाद्यानांवर जीएसटी लावला आहे.

सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचाराने आपण कशातही बदल घडवू शकता!

जनहितार्थ जारी!!!