Home महाराष्ट्र महाविद्यालयात प्रवेश घेताना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खालील गोष्टीची दक्षता घ्यावी

महाविद्यालयात प्रवेश घेताना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खालील गोष्टीची दक्षता घ्यावी

0
महाविद्यालयात प्रवेश घेताना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खालील गोष्टीची दक्षता घ्यावी

महाविद्यालयात प्रवेश घेताना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खालील गोष्टीची दक्षता घ्यावी

 

1.सदरील महाविद्यालय कोणत्या विद्यापीठातर्गत आहे ते तपासून पहावे तसेच ते विद्यापीठ देखील चांगले आहे की नाही याची शहानिशा करावी.(काही विद्यापीठे बोगस परवानगी देतात याची ही चौकशी करा)

 

2.सदरील महाविद्यालय विद्यापीठाचे सर्व नियमाचे परिपूर्ण पालन करते आहे की नाही याचा हि विचार करावा

 

3.महाविद्यालयाचे मागील 4 ते 5 वर्षाचे रेकॉर्ड चेक करावे तसेच त्या महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख तपासावा.

 

4.सदरील महाविद्यालयात किती अभ्यास शाखा आहेत तसेच अभ्यास शाखेसाठी पुरेसा प्राध्यापक वर्ग आहे की नाही याचा देखील विचार करावा. एका शाखेसाठी किमान 15 ते 20 प्राध्यापक असावेत जर 5 अभ्यास शाखा असतील तर त्या महाविद्यालयात किमान 90 ते 100 प्राध्यापक असले पाहिजेत.

 

5 सदरील महाविद्यालयात अभ्यासशाखा नुसार 20 ते 25 हजार पुस्तके असणारे ग्रंथालय आहे की नाही हे पहावे जर 5 अभ्यास शाखा असतील किमान ग्रंथालयात 1 ते 1.5 लाख इतकी पुस्तके असायला हवी

 

6.सदरील महाविद्यालयात अभ्यास शाखेनुसार क्लास रूम आणि प्रयोगशाळा उपलब्ध आहेत की नाही याचा विचार करा.

 

7. सदरील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग हा किमान 25 ते 30 असला पाहिजे आणि तो ही पात्रताधारक असावा.

 

8. महाविद्यालयात सर्व सुविधा स्वतंत्र आहेत की नाही याची माहिती घ्यावी.. सर्वात महत्वाचे मुलीसाठी सर्व सोयीनेयुक्त असणाऱ्या रूम उपलब्ध आहेत का हे पहावे

 

9. एकंदरीत कोणत्याच शैक्षणिक सुविधा नसणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ नका अन्यथा तुमचे पदवी शिक्षण केवळ कागदोपत्री होईल.

 

10. जर एखादे महाविद्यालय आपणास शैक्षणिक सुविधा न देता तुम्ही प्रवेश घ्या आम्ही आपणास परीक्षेत कॉपी पुरवून पास करतो असे सांगत असेल तर अशा महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपले शैक्षणिक नुकसान करून घेऊ नका.

 

10.आम्ही आपणास पास करून देतो म्हणणाऱ्या महाविद्यलयात प्रवेश घेऊन पालकांनो आपण आपल्या पाल्यांचे नुकसान करू नये.

 

11.काही महाविद्यालये तर केवळ विद्यार्थांना मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती लाटण्यासाठीच कागदोपत्री कॉलेज चालवतात याचा विचार पालकांनी करावा. अशा ठिकाणी विद्यार्थी हित पाहिले जात नाही तर केवळ आर्थिक फायदा पाहिला जातो तो ही कोणत्याच शैक्षणिक सुविधा न देता.

 

12. सदरील महाविद्यालये जर विद्यापीठाचे नियम डावलून आणि शासनाची दिशाभूल करून केवळ आर्थिक फायद्यासाठी चालवली जात असतील तर अशी महाविद्यालये येणाऱ्या काळात 100% बंद केली जाणार आहेत त्यामुळे अशा महाविद्यालयात चुकून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वेळीच जागरूक होऊन सदरील महाविद्यालयातील आपला प्रवेश रद्द करून अन्य सुविधा असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपले उज्ज्वल  भविष्य घडवावे