Home जीवनसार नोकरदार स्त्रीयांच्या कथा आणि व्यथेतील भयावह वास्तव !!

नोकरदार स्त्रीयांच्या कथा आणि व्यथेतील भयावह वास्तव !!

0
नोकरदार स्त्रीयांच्या कथा आणि व्यथेतील भयावह वास्तव !!

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त….“क्योंकि वह स्त्री है”

 

माय सावित्रीने आणि क्रांतीबा म. ज्योतीबा फुले या दोघांनी मिळून
1848 मध्ये भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा उघडली – आणि स्त्री शिक्षणांची मुहूर्तमेढ रोवली. युगानयुगे अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समस्त स्त्रीसमूहासाठी ज्ञानाची कवाडे खुली झाली. हळूहळू स्त्रीसाठी नोकरीच्या संधी ही खुल्या झाल्या. शिक्षणक्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्रात, कॉर्पोरेट, अवकाश इत्यादी सर्व क्षेत्रात स्त्रीयांनी अमूलाग्र कामगिरी केलेली दिसून येते. परंतू आजही स्त्रीचे अनेक आघाडयांवर संघर्ष सुरु आहे . त्याबद्दल समाजमनात सहानुभूतीपेक्षा समानुभूती निर्माण करण्याची गरज आहे . आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत , परंतू आजही एक सुदृढ समाजव्यवस्था निर्माण होण्यात आपण फार मागे आहोत. याचे कारण स्त्रीयांवर पडणारी दुहेरी जबाबदारी आहे. आपण नोकरी करणाऱ्या महिलांचा सर्वे केला तर असे लक्षात येईल की नोकरीचे 8 ते 12 तास या वेळेव्यतीरिक्त तिला जो मानव म्हणून आराम हवा, स्वतःसाठी वेळ हवा तो मिळत नाही. स्त्रीने या अपेक्षा करणे म्हणजे आजही गुन्हा समजला जातो. नोकरी करत घरकाम करणे, मुले सांभाळणे घराची काळजी घेणे अशा चौफेर भूमिका तिला निभावाव्या लागतात . कारण आपल्या समाजात स्त्रीची निर्माण केलेली सोशिक इमेज त्यामुळे या “सोशिक इमेज” ला तड़ा न जाऊ देण्याचा आटोकाट
प्रयत्न स्त्री कडून – केला जातो . आणि या अटोकाट प्रयत्नात तिची स्वतःची मात्र वाट लागते. स्त्री ही सुंदर असावी, शिकलेली उच्चशिक्षित असावी, नोकरी करणारी, पगार उचलणारी असावी सोबतच घरकामात पारंगत, गरीब गाय, जे सांगीतलं निमुटपणे ऐकणारी असावी अशा अपेक्षा समाजाकडून केल्या जातात. समाजाच्या दहशतीतच ती जन्मभर काहीच न बोलता निमूटपणे अपेक्षांच्या चक्की मध्ये भरडत राहते . आणि एखादवेळेस अशा स्त्रीयांच्या समाध्यांवर तिच्या मृत्यूनंतर फूले वाहीली जातात . नोकरदार स्त्रीकडून मुले सांभाळणे , घराची काळजी घेणे या जबाबदाऱ्यांमुळे जीवन जगण्याच्या अधिकाराकडे ‘मात्र दुर्लक्ष होते. नोकरी हीTime bounded असल्याने जसे 8 ते 5अशा ऑफिस वेळा असल्याने तिला भांडी धुणी अशा स्वयंपाक या सर्व गोष्टी आटोपून घराबाहेर पड़ावे लागते. नोकरीच्या वेळेआधी घराची स्वच्छता, कपडे, स्वयंपाक या सर्व गोष्टी आटोपूनच बाहेर पडावं लागतं. घरातील हे रोजच्या जीवनातील ही अत्यावश्यक काम असतात ज्यांना टाळून चालत नाही, यावर अस प्रत्युत्तर दिले जाते की दोन ते तीन माणसांचे काम करायला आजकालच्या बायकांना अवघड जातयं . जून्या काळातील बायका 15ते 20 लोकांची कामे करून सुदृढ राहत होत्या . पण सत्यता वेगळी आहे. पूर्वीच्या काळातही स्त्री आरोग्या कडे दुर्लक्ष केले जात होते. सर्व कामे, शेतीच्या कामात हातभार लावणे अशी कामे स्त्रिया करत तसेच या कामासोबत स्त्रीच्या पोषणाकडेही दुर्लक्ष होतच असायचे . त्यामुळेच अकाली मृत्यू, वाढलेला मातामृत्यूदर, स्त्रीया अनेमियाच्या शिकार व्हायच्या . गुणवत्तापूर्ण जीवन त्यांच्याकडेही नसायचे. मध्यमवर्गीय स्त्रीयांच्या बाबतीत ज्या नोकरीत नव्हत्या त्यांचे जीवन सुखमय होते असे मानायला मात्र थोडे हरकत नाही. पैसे कमावण्यासाठी पुरुष नोकरीत जायचे आणि या स्त्रीयांकडे घरकामाची जबाबदारी असे हे एकंदरीत चित्र. सकाळच्या धावपळी नंतर नोकरीत नसणाऱ्या बायकांना दुपारी विश्रांतीचा वेळ मिळत असल्याने सकाळच्या कामांचा शीण त्यांना येत नाही तसेच त्यांचे छंद जोपासले जातात . यामुळे त्या मेंटली Active राहतात , घरी असणाऱ्या 85% मध्यमवर्गीय स्त्रीयांच्या बाबतीत हे सत्य आहे त्यामूळेच कदाचित एकूण कार्यरत महिला या एकूण महिलांच्या तुलनेत ३३% च आहेत. यातून हेच सिद्ध होत की अनेक महिला घरी राहण्यास पसंती देतात कारण त्यांना नोकरीत दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते.

दुर्गोत्सवामध्ये महिलांचे दुर्गावतारामधील फोटो पोस्ट केले जातात. यात त्यांना घरकामासोबत बाळ सांभाळणे, नोकरी करणे, अभ्यास करणे, तसेच इतरही अनेक गोष्टींचा समन्वय करून smiling face मध्ये दाखवले जाते. खरेच एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा Face, “Smiling face” कसा राहत असेल ? असा प्रश्न मला नेहमी पडतो. स्त्रियांचे विशेषीकरण करून त्यांना आरोग्याच्या विचारापासूनसुद्धा अगदी रितसर दूर केलं जातं. स्त्रीयांवर सामाजिक दबाव जाणूनबुजून टाकला जातो. आजकाल तर एव्हाना ट्रेंडच निर्माण झाला आहे, सोशल मिडियाच्या माध्यमातून, यूट्यूब, whatsapp यांच्या द्वारे स्त्रीयांवर ‘पुरानी स्त्री और आज कि नये जमाने की स्त्री’ असे म्हणून स्त्रीयांवर अमानुष पातळीला जाऊन टीका केली जाते. किर्तना सारख्या समाज प्रबोधनाच्या साधनाद्वारे आजकाल समाजप्रबोधन कमी आणि स्त्रीवर टिका करण्याच काम अधिक होताना दिसून येतं.अगोदरच समाज व्यवस्थेनं दुर्बल बनवलेल्या घटकास प्रसारमाध्यमे, Internet च्या माध्यमातून आणखीच दुर्बल बनवलं जातं . समाजाच्या भितीपोटी स्त्रीया स्वतःचं दुख दैन्यावस्था, विवंचना इतरांशी बोलून दाखवण्यास घाबरतात. याप्रकारे शोषितांच शोषण युगोनयुगे चालू राहतं.

नोकरदार स्त्रीयांच्या बाबतीत एक फार मोठं वास्तव तर आणखी समाजाला माहितच नाही. स्त्री आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रयत्न आपल्या देशात सुरू आहेत, त्यात स्त्रीयांचे मासिक त्रास, त्यांना होणारे आजार, रक्तक्षय, मातामृत्यूचे प्रमाण, बालमृत्यू रोखण्यासाठी, गरोदर मातांचे आरोग्य, लसीकरण , संतुलित आहार या सर्वांची काळजी शासनस्तरावरून घेतली जाते. परंतू हे सर्व प्रश्न नोकरदार स्त्रीयांच्या बाबतीत मात्र जास्त भीषण स्वरूप घेऊन उभे असतात. यात नोकरी करणाऱ्या स्त्रीयांच्या मानसिक आरोग्य याचा विचार तर अतिशय दूरच. घड्याळ्याच्या काट्यावर धावताना या स्त्रीयांचे आरोग्य. जोपासले जात असेल का? याचा तिळमात्र विचार शोषण व्यवस्थेला येईल का? संतुलित आहाराचा प्रश्न तर दूरच कधी कधी दोनवेळच पण जेवणसुद्धा या स्त्रीयांच्या नशीबात नसतं. मासिक रजेच्या बाबतील आजही आपण आधुनिक विचारसरणीपासून शेकडो वर्षे दूर आहोत. संतुलित आहार न भेटल्याने अनेक स्त्रिया तरुणपणात निकृष्ट आरोग्य जगत असतात. रक्तक्षय, ब्लडप्रेशर, शुगर यांसारखे आजार
लवकरच नोकरदार स्त्रीयांना होतात. आजारी,
पडल्यानंतर शुश्रूषा करणारंदेखील कुणी नसतं.

त्यामुळं दुखणी अंगावर काढली जातात. आणि अनेकवेळा दुर्धर आजाराची लागण होण्याची शक्यता असते. कामाचा ताण, जेवणाच्या अनियमित वेळा, तसेच काम व नोकरीचं संतुलन अपूर्ण झोपेचे तास यामूळे आरोग्यासारख्या मूलभूत प्राथमिक गरजेचेसुद्धा पूर्णत्व होत नाही. या सर्व गोष्टीमुळेनासायांना कमी वयातच B. P, Sugar Thyroid, menstrual problems ना सामोरं जाव लागतं. Hormonal Balance ची तर वाट लागते. सतत ताणतणावाच्या स्थितीमुळे चिडचिड, नैराश्य , आत्महत्येचे विचार यासारख्या मानसिक आजारांना सामोरं जावं लागते. यातही सर्वात मोठा प्रश्न नवीन होणाऱ्या मातेचा असतो. 6 महिन्यांच्या प्रसूती रजेची तरतूद नोकरदार स्त्रीयांसाठी असली तरीही 6 महिन्यांनंतर बाळ लहान असल्यामुळे रात्रभर नसणारी झोप, दगदगीमुळे बाळासाठी न येणारं दूध, माता म्हणून बाळाची सर्व जबाबदारी सुद्धा पित्यापेक्षा स्त्रिवरच टाकली जाते. यामुळे हे सर्व सांभाळून नोकरी करणं म्हणजे अग्निदिव्यच पार पाडण्यासारखं आहे. यामध्ये बाळाचं आजारपण, कामाचा ताण यातुन postpartum depression सारख्या नवीन मातांना मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोर जावे लागतं. आईनेच बाळाची जबाबदारी घ्यावी, आईच बाळाच्या वजन कमी जास्त आईच असण्यास, बाळाच्या आजारपणाला कारणीभूत असल्याचं जेव्हा वारंवार तिला ऐकावं लागत तेव्हा ती स्वतःला दोषी समजून guilt feelingच्या दुष्टचक्रात अडकली जाते आणि अनेक आजार ती आपसूकच ओढवून घेते यातून स्त्रीचे आजही असणारे समाजातील दुय्यमत्व दिसून येते.
सुट्यांच्या दरम्यान किंवा रविवारी तर नोकरदार स्त्रीयांकडून अवाजवी अपेक्षा केली जाते. रविवारची सुटी जी इतरांसाठी कार्यालयीन कामकाजातून विश्रांतीकरता मिळते ती सुटी सुद्धा नोकरदार महिलांसाठी weekend housework bonus असतो. आठवड्याची काम आठवडा सूटीमध्ये करून विश्रांती आणखी पुढे पुढे ढकलली जाते. Body Pain , muscle pain, ताप, डोकेदुखी Painkiller ने थांबवली जाते आणि भविष्यातील मोठ्या आजाराला निमंत्रण दिलं जाते.

आशा की डोर से बांधने बैठी जीवन की लाचारी
जो दुख से घबराये
वो नहीं हिंद की नारी
दिल के उपर पत्थर रखले
रोना है कमजोरी, मत रो, मत रो

अशा गीतांमधून स्त्रियांना आणखी कठोर दगडासारखे बनण्याचे डोस दिले जातात. स्त्रीचं मनुष्यत्व नाकारून “superwoman” ची प्रतिमानं तिला दिली जातात. हे stereotypes स्त्रीयांकडून मोडली जात नाहीत कारण Social Pressure त्यांच्यावर असतं. या समस्यांवर कुणी भाष्य करायला गेले की त्यांना ‘Feminist’ आहे असे म्हटले जाते. Feminism असा काही शब्द झालाय की अतिशय तुच्छ नजरेने, वेडेवाकडे चेहरे करत एखाद्या व्यक्तीबद्दल बोलला जातो. खरंच feminism बाईट आहे का?पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना अधिकार व संधी मिळाल्या पाहिजेत असे असा विचार म्हणजे स्त्रीवाद.समानतामूलक वागणूकी साठी आग्रह धरावा लागणे ही समाजासाठी लाजीरवाणी गोष्ट नव्हे का?आज भारत चंद्रावर पोहोचलाय मात्र भारतीय समाजाची मानसिकता आदिमानवाच्या पूर्वीची दिसून येते. सामाजिक जागरुकतेच्या माध्यमातून संवेदनशिल समाज निर्माण करून आपण या समस्यांना कमी करू शकलो तर नक्कीच समतामुलक समाजाची पायाभरणी आपण केली असे आपण म्हणू शकतो.