हा अंदाज ऐकायला,वाचायला अवघड आहे.पण राजकारणात काहीही शक्य आहे.ते भाजप ने करून दाखवले आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना सहयोगी बनवून मुख्यमंत्री बनवले.असे तर ईशान्य कडील राज्यात अनेक कांग्रेस नेते भाजपचे मुख्यमंत्री बनवले.बिहार मधेही तसेच.भाजप विरोधी नितीश कुमार यांना समर्थन देऊन मुख्यमंत्री बनवले.युपीत मायावती यांना समर्थन देऊन मुख्यमंत्री बनवले.आता तर महाराष्ट्रील दोन माजी मुख्यमंत्री भाजपने सोबतीला घेतले.एकाला अवजड मंत्री बनवले.दुसऱ्याला सोबत घेऊन अवघड केले.हे अशक्य ते शक्य करून दाखवले,भाजपने.तर मग,अशी लहान सहान शिकार करण्याऐवजी सरळ राहुल गांधींना प्रधानमंत्री ची दावत देऊन भाजप पक्षात किंवा सहयोगी पक्ष म्हणून घेतले तर अवघड वाटून घेऊ नये.मोदीजी टुकडोमे क्यो जी रहे हो?
आज ही कांग्रेस चे उर्वरित नेते रूदन करतांना सांगतात कि आम्ही कांग्रेस चे लोकांशिवाय सरकार बनू शकत नाही.तितकी कुवत भाजप च्या नेत्यांमधे नाही.कांग्रेसची टांग अजूनही वर आहे.भाजप तोलून धरत आहे.हे वास्तव नाकारता येणे शक्य नाही.एकाच घटनेचे विविध वर्णन विभिन्न पक्ष करतात.
नारायण राणे आणि आसामचे सरमा असे अनेक मुख्यमंत्री आज भाजप मधे पुन्हा सत्तेवर आहेत.तर मग, अशोक चव्हाण भाजप मधे गेल्याचे नाविन्य वाटत नाही.तसेच उद्या राहुल गांधींना भाजपकडून प्रधानमंत्री बनण्याची दावत दिली तर गैर वाटून घेऊ नये.हे भाजपचे परिपक्व राजकारणाचे लक्षण आहे आणि कांग्रेस चे मोठेपणाचे लक्षण आहे.तर आपण बातमी वाचणाऱ्यांनी का नादान राहावे ?कामाठीपुरात काहीही चालते तर आगंतुकांनी का लाज वाटून घ्यावी?