Home आरोग्य धनसंपदा चेहरा आणि केसाचे आरोग्य कसे जपावे.

चेहरा आणि केसाचे आरोग्य कसे जपावे.

0
चेहरा आणि केसाचे आरोग्य कसे जपावे.

१)आपला चेहरा सकाळी उठल्यावर ड्राय आणि डल दिसतो…..?

२) आपल्या केसांसाठी घरगुती उपाय…..

अनेक कंपन्यांच्या क्रीम आणि लोशन वापरून झाले असल्यावरही चेहर्‍यावर ती चमक येत नाहीये का? तर आम्ही आज आपल्या घरगुती नाइट फेस मास्कबद्दल माहिती देत आहोत ज्याने आपली त्वचा चमकदार होण्यात मदत मिळेल.

हळद आणि बेसन…
चार चमचे बेसन आणि दोन चमचे दूध किंवा सायीत चिमूटभर हळद मिसळून मास्क तयार करा. हा रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा. सकाळी गार पाण्याने धुऊन घ्या.

स्ट्रॉबेरी…
व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिडने भरपूर स्ट्रॉबेरी त्वचेला निरोगी बनवतं. हे मास्क तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरी दुधासोबत क्रश करून पेस्ट तयार करा. त्यात एक चमचा बेसन मिसळून चेहर्‍यावर लावा. सकाळी गार पाण्याने धुऊन घ्या. चेहरा चमकदार दिसेल.

ओट्स आणि दही…
ओट्स बारीक वाटून त्या एक चमचा दही, एक चमचा मध आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. आवश्यकतेनुसार पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. सकाळी उठल्यावर धुऊन घ्या.

चंदन…
ड्राय, ऑयली आणि पिंपल असलेल्या ‍त्वचेसाठी चंदनाचे मास्क उत्तम आहे. हे लावल्याने खाज दूर होते आणि त्वचा निरोगी राहते. हे मास्क तयार करण्यासाठी चंदन पावडरमध्ये जरा दूध, लॅवेंडर ऑयल आणि दोन चमचे बेसन मिसळा. किंवा आपण फक्त चंदन पावडर ही वापरू शकता. नंतर गार पाण्याने धुऊन टाका. चेहरा ग्लो करेल.

झेंडू…
झेंडूच्या फुलात अॅटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टिरिअल गुण असतात. झेंडूचे पाने दुधात भिजवून ठेवा. यात एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावा. सकाळी पाण्याने स्वच्छ करा.

गुलाब…
गुलाबाच्या झाडांची पाने उन्हात वाळवून घ्या नंतर याची पावडर तयार करा. यात दूध, साय मिसळून आवश्यकतेनुसार ग्लिसरीन मिसळा. हा मास्क रात्रभर लावून ठेवा.

लिंबू आणि मध…

दोन चमचे मधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून त्वचेवर लावा. रात्रभर चेहर्‍यावर राहून द्या. सकाळी उठून धुऊन घ्या. त्वचा चमकेल.

२)आपले केस…..

केस हा आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. केस लांबसडक, दाट असावेत असे प्रत्येकीला वाढते. पण काही कारणांनी केस वाढत नसतील तर आपण कधी घरगुती तर कधी पार्लरमध्ये जाऊन काही ना काही उपाय करतो. पण त्याचाही म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. केस भरभर आणि लांबसडक व्हावेत यासाठी आपण १ सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत
ज्यामुळे काही दिवसांत केस वाढायला तर मदत होईलच पण केस दाट होण्यासाठीही याचा नक्कीच फायदा होईल. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा उपाय करता येत असल्याने त्यासाठी फार खर्चही येत नाही. पाहूया यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि हा उपाय नेमका कसा करायचा…

साहित्य…
१. लसूण पेस्ट – १ चमचा

२. कांदा पेस्ट – १ चमचा

३. लवंग – ४ ते ५

४. आलं पेस्ट – १ चमचा

५. खोबरेल तेल – अर्धी वाटी

लावण्याची पद्धत…
१. आलं-लसूण आणि कांदा यांची बारीक पेस्ट तयार करुन घ्या.

२. एका सुती कापडात ही पेस्ट घालून त्यात लवंग घाला आणि त्याची पुरचुंडी करा.

३. एका प्लास्टीकच्या ट्रान्सपरंट बाऊलमध्ये तेल घेऊन त्यात ही पुरचुंडी ठेवून द्या.

४. पुरचुंडी ठेवलेला हा बाऊल पूर्ण दिवस उन्हात ठेवा.

५. त्यानंतर या पुरचुंडीतील तेल पुळून काढा आणि ते केसांना लावा.

६. हे तेल रात्रभर केसांना लावून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी केस शाम्पूने धुवा.

७. आठवड्यातून एकदा हा प्रयोग केला तर केस लांब होण्यास मदत होईल.

फायदे…
१. या उपायामुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल. तसेच केस सॉफ्ट आणि शायनी होण्यासही याचा चांगला उपयोग होईल.

२. यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते आणि केस दाट होण्यासही याची चांगली मदत होते.

३. केस खूप पातळ असतील तर ते दाट होण्यास हा उपाय फायदेशीर ठरतो.

https://chat.whatsapp.com/Bea0miBZEsc0BzuXs3Vz19