Home शिक्षणावर बोलू काही भारतातील विज्ञान शाखेची स्थिती चिंताजनक!

भारतातील विज्ञान शाखेची स्थिती चिंताजनक!

0
भारतातील विज्ञान शाखेची स्थिती चिंताजनक!

www.janvicharnews.com

०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे यजमान पद यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मिळाले मंगळवारी या परिषदेचे मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले. तसे बघितले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला यजमानपद मिळण्याची हि दुसरी वेळ आहे या आधीही एकदा विद्यापीठामध्ये भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उदघाटनाला आधी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार होते परंतु त्यांचे येणे हे वेळेवर रद्द झाले नंतर माननीय राष्ट्रपती येणार होत्या परंतु काही कारणास्तव त्यांचे येणे सुद्धा रद्द झाले. परंतु उदघाटन प्रसंगी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने या परिषदेला संबोधित केले तसेच या प्रसंगी विविध मान्यवरांचे भाषणे झालीत त्यामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सर्वच मान्यवरांचा सहभाग होता. या सर्व मान्यवरांच्या भाषणाचा सूर बघितला तर त्यांच्या म्हणण्या प्रमाणे भारतातील विज्ञान प्रगती पथावर असण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात असलेल्या विविध योजना आणि मोदींच्या दूरदृष्टीकोण आहे. म्हणून या निमित्ताने आपल्या सर्वाना जाणून घेणे उचित होईल कि खरोखरच हे नेते मंडळी म्हणतात तसे भारतातील विज्ञान प्रगती पथावर आहे काय?

२०१६ ला प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते संशोधक व्यंकटरामन रामकृष्ण यांनी याच भारतीय विज्ञान काँग्रेसचे वर्णन सर्कस म्हणून केले होते. कदाचित तुम्हाला त्यांनी केलेले हे वर्णन रुचत नसेल तर आपल्या देशातील विज्ञानाची स्थिती दर्शवणाऱ्या काही अहवाल व त्यामध्ये दिलेली आकडेवारी आहे जे कि आपल्या सर्वाना देशातील विज्ञानाच्या स्थितीबद्दल विचार करायला लावतील. भारतातील ५९% माध्यमिक शाळांमध्ये एक ते दहावीपर्यंत विज्ञान अनिवार्य आहे परंतु शाळेमध्ये विज्ञान प्रयोगशाळाच नाहीत. त्यामुळे, बहुसंख्य विद्यार्थी कोणताही प्रयोग न पाहता विज्ञानाचा ‘अभ्यास’ करतात, हे तर सोडाच १० +२ स्तरावर जेथे विद्यार्थी विज्ञानाची निवड करतात, त्यामध्ये फक्त ३२% शाळांमध्ये प्रयोगशाळांसाठी स्वतंत्र खोल्या आहेत आणि त्यापैकी एक चतुर्थांश ‘अंशतः सुसज्ज’ आहेत. बाकी प्रयोगशाळांमध्ये प्रयोग हे वेब द्वारे शिकवण्याच्या मोठं मोठ्या गोष्टी केल्या जातात परंतु हे शिकवण्यासाठी लागणाऱ्या इंटरनेट सुविधांही तिथे उपलब्ध नाही एव्हढी विदारक स्थिती आपल्या देशात विज्ञान शिकवण्या संबधी आहे. यावर सरकारने काही तोडगा काढणे अपेक्षित आहे त्यामध्ये वैज्ञानिक उपकरणे स्वस्त दरामध्ये शाळांना उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. परंतु या उलट केंद्र सरकारने यावर कुठलीही उपाय योजना न करता संशोधन संस्था व कॉलेज, विद्यापीठे याना लागणार्या वैज्ञानिक उपकरणावरील जीएसटी हा ५% वरुन १२ ते १८% वाढवला आहे. आधीच आपल्या देशात संशोधनाच्या नावानी बोंब आहे. मोठ मोठ्या केंद्रीय संशोधन संस्थेत सुद्धा पाहीजे त्या प्रमाणात उपकरणे मिळत नाहीत त्यामूळे मोठ मोठे प्रकल्प हे अर्ध्यातच सोडून द्यावे लागतात. आता अश्यातच सरकारने विज्ञान व संशोधनावरील जीएसटी ५% वरुन डायरेक्ट १२ ते १८% केल्यामुळे संशोधन हे अधिक खर्चिक व न परवडनारे होणार आणि याचा डायरेक्ट परिणाम हा या संस्था मध्ये चालणार्या संशोधनावर होणार. अश्यात खरोखरच विज्ञानांची प्रगती केवळ मोठं मोठे भाषणे देऊन होणार आहे काय? हे तुम्हीच ठरवा.

जर आपल्या देशामध्ये सुसज्ज प्रयोग शाळाच नाही तर चांगल्या संशोधनाची आपण अपेक्षा तरी कशी करणार एका सर्वेक्षणा नुसार भारतामध्ये २०१३ ला वैज्ञानिक शोधनिबंधाची संख्या सुमारे ९०००० होती तर तीच अमेरिकैची ४५०००० तर चीनची ३२५००० होती. संदर्भही जागतिक सरासरीपेक्षा कमी होते. जर पेटंट चा विचार केला तर त्यामध्येही आम्ही कुठेच नाही भारतामध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्ये मांगे फक्त १७ पेटंट दाखल होतात. तेच चीन मध्ये बघितले तर ५४१ आणि दक्षिण कोरिया मध्ये ४४५१ पेटंट प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे दाखल होतात. एव्हढेच नाहीतर भारतामध्ये प्रत्येक १०००० लोकसंख्येमागे फक्त ४ वैज्ञानिक संशोधक आहेत, जे केवळ यूएस किंवा यूके सारख्या प्रगत देशांच्याच नव्हे तर चीन आणि ब्राझीलच्या तुलनेत खूपच कमी आहेत. प्रसिद्ध वैज्ञानिक सी. एन. एन. राव यांच्या म्हणण्या नुसार अजूनही जगातील सर्वोच्च १% संशोधनामध्ये भारताचा वाट १% पेक्षा कमी आहे. एव्हढा अंधार असताना भारतातील विज्ञान खरोखरच प्रगतीपथावर आहे का? हे आता तुम्हीच ठरवा.

विज्ञान आणि संशोधनाच्या नावाने आपल्या देशात एव्हढी सारी बोंबाबोब असताना जागतीक पातळीवर शिक्षण आणि संशोधनावर होणाऱ्या खर्चावर आपला देश कुठे आहे हेही पडताळून बघावे लागणार आहे. यामध्ये संशोधनावर खर्च करणार्या आकडेवारीचा जर विचार केला तर आपल्याला असे दिसून येइल की जगात विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनावर इजराइल हे राष्ट्र आपल्या जीडीपी मधला ५.४४% खर्च करतो. विज्ञान आणि संशोधनावर इतका जास्त खर्च करन्यात इजराइल हे राष्ट्र जगात प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर क्रमांक येतो तो अमेरीका चा अमेरीका आपल्या जीडीपी च्या जवळपास ३.४५% इतका खर्च संशोधनवर करतो. इतकेच नव्हे चीन सुद्धा जीडीपी च्या २.४% खर्च विज्ञान व तंत्रज्ञानावर करतो आणि यामध्ये हा देश जवळपास ८ % येणार्या काळात वृद्धी करणार आहे. इतकेच नव्हे तर जर्मनी ऑस्ट्रिया स्विटझरलँड हे देश सुद्धा आपल्या जीडीपी च्या ३% पेक्षा जास्त वाट विज्ञान व संशोधनावर खर्च करताना दिसून येतात. या तुलनेत आपल्या भारताची स्थीती खुप वाईट आहे कारन आपला देश विज्ञान आणि संशोधनावर फक्त जीडीपी च्या 0.६५५७% इतका खर्च करतो जो की लोकसंख्या आणि इतर घटकांच्या तुलनेत खुपच कमी आहे. संशोधना मध्ये इतकी जबरदस्त नाचक्की असताना संशोधन वाढीसाठी सरकारने काही ठोस पावले ऊचलणे आवश्यक होती परंतु सरकारने यावर ठोस पावले उचलण्या ऐवजी सरकारने विज्ञान मंत्रालयाच्या आर्थिक तरतुदीत मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्यावर्षी ३.९% थेट कपात करुन टाकली आहे गेल्या काही वर्षाच्या डेटा चे विश्लेषण केले तर सरकार या बजेट सातत्याने कपातच करत आलेली आहे.

यामध्येच अलीकडच्या काळामध्ये काही मोठं मोठ्या नेत्यांच्या बेजवाबदार पुराणातील भाकड्कथाना विज्ञान म्हणून प्रसारित करणाऱ्या घोषणा आणि कार्यक्रम बघितला तर खरोखरच आपल्या देशात विज्ञान संस्कृती जिवंत आहे काय? असे प्रकर्षाने जाणवत राहते. अश्या घोषणा करताना आणि अवैज्ञानिक बोलन्या पासून स्वतः प्रधानमंत्री सुद्धा स्वतःला आवरु शकले नाही आहेत त्यामध्ये त्यांचे रडार तंत्रज्ञान व नाली वरच्या गॅस ची चहा हे खूप प्रसिद्ध झालेले वक्त्यव्य आहेत. म्हणून या सर्व घटनांवरून एक प्रकर्षाने जाणवते कि भारतातील विज्ञान केवळ पोकळ घोषणा बाजी राजकीय पुढाऱ्यांच्या अतिरंजित भाषणातून प्रगतीपथावर जाणार आहे काय? कि भारतातील विज्ञानाला प्रगती पथावर नेण्यासाठी काही धोरण ठरवावे लागतील चांगले वैज्ञानिकांना त्यांच्या कामांमध्ये फ्री हॅन्ड देऊन चांगला रोडमॅप द्यावा लागेल. यामधले कोणती कृती केली तर भारतातील विज्ञान प्रगतीपथावर जाईल हे आता आपल्यालाच ठरवावे लागेल.

डॉ. विवेक बी. कोरडे
मोबाईल:- ८७८८०८०७३३
ईमेल:- vivekkorde0605@gmail.com
(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून शिक्षण या विषयावर लिहीत असतात)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here