Home यशोगाथा सर्वसामान्याची माऊली : मदर तेरेसा

सर्वसामान्याची माऊली : मदर तेरेसा

0
सर्वसामान्याची माऊली : मदर तेरेसा

सर्वसामान्याची माऊली : मदर तेरेसा

www.janvicharnews.com

 

 १९७९ साली जगातला मानाचा समजला जाणारा नोबेल पुस्काराची घोषणा करण्यात आली. ह्या पुरस्काराचे वैशिष्ट्य असे की जगातला सर्वात मोठा असणारा हा पुरस्कार ज्यांना मिळतो त्यांनी स्विडनच्या राजांकडून पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अगोदरच्या दिवशी खास मेजवानी दिली जाते. त्यावर्षी सुध्दा तसेच होते. मेजवानीचे नियोजन करून पुरस्कार्थीना निमंत्रणे पाठविली गेली आणि अचानक एके दिवशी स्विडनच्या राजांना एक विनंतीवजा पत्र येऊन धडकले. ज्यात लिहले होते, “नोबेल पुरस्कारांच्या निमित्ताने आपण मेजवानी दरवर्षी देता परंतु ह्यावेळी मेजवानीचा पैसा जर गोरगरीबांच्या सेवेकरिता दिला तर खूप बरे होईल!” स्विडनच्या राजांनी पत्र वाचले आणि पत्राखालचे नाव वाचल्यावर राजानं मेजवाणीच रद्द केली आणि तो सगळा पैसा गरिबांच्या आरोग्य व शिक्षणाच्या विकासासाठी देऊन टाकला. पत्र पाठवून ही गोष्ट राजांपर्यंत पाठवायची ताकद ज्या नावाची होती ते नाव होते ”

मदर तेरेसा “१९१० साली मॅकडोनिया ह्या छोट्याशा देशात जन्माला आलेल्या ह्या स्त्रीने कर्तृत्वाने विश्वच उजळून सोडले. मदर तेरेसांचे मूळ नाव गोक्षा अनेस.बालवयातच वडिलांचे छत्र डोक्यावरुन हरवलेले. गोक्षा आईच्या संस्काराखाली वाढत होती. उपजतच प्रेमळ असणाऱ्या ह्या तरुणीने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षीच घर सोडले आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराकरता स्वत :ला वाहून घेतले. तरुण वयातच संपूर्ण जगभरात काम करीत ही युवती भारतातल्या कलकत्ता शहरात येऊन पोहचली आणि कलकत्यालाच आपली कर्मभूमी बनवून टाकले. कलकत्याच्या चर्चने गोक्षा अग्रेस यांचे नामकरण भगिनी तेरेसा असे करून टाकले. कलकत्ता शहरातल्या सेंट मेरी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असतांना त्यांना कलकत्याचे जवळून दर्शन झाले. बकाल असणाऱ्या झोपडपट्टीमधले दारिद्र्य, आरोग्य सुविधा अभावी बोकाळणारे आजार, बालमजुरी करणारे मुलं, अन्न पाण्याअभावी तडफडणारे वृध्द हे सगळे दुःख पाहून भगिनी तेरेसाचे काळीज पिळवटून निघायचे. आपण ह्या सर्वांचे काहीतरी देणे लागतो ह्यांचे जग आपल्याला बोलावतय याची जाणीव त्यांना सातत्याने व्हायची. परंतु नेमके पाऊल मात्र पडत नव्हते . त्यातच १९४६ साली कलकत्त्यामध्ये दंग्यांनी थैमान घातले. हजारो निरपराध नागरिक त्यात भरडले जाऊ लागले. तेरेसा सगळे दृष्य उघड्या डोळ्यांनी बघत होत्या आणि अशातच एके दिवशी सायंकाळी चर्चकडे येत असतांना एक जखमी मनुष्य त्यांना मरणासन्न अवस्थेत गटारात पडलेला दिसला. ह्या स्त्रीचे काळीज हेलावले. त्यांनी मोठ्या कष्टाने त्याला गटारातून बाहेर काढले . त्याच्या अंगावरच्या सगळ्या जखमा धुतल्या. त्याचे शरीर साफ केले. त्याला पाणी पाजून चार घास खाऊ घातले आणि काही वेळातच ह्या माणसाने प्रसन्न मनाने प्राण सोडला. परंतु मरतांना तो तेरेसांना एक वाक्य बोलून गेला. “आई तू सगळ्या जगाची माउली होशील ” ह्या वाक्याने तेरेसांच्या मनात घर केले . ह्या मनुष्याच्या चेहऱ्यावरचे अखेरचे समाधान ही माझी सर्वात मोठी कमाई आहे, असे मानत ह्या माउलीने १९४८ साली शाळेची नोकरी सोडली आणि मिशनरीज ऑफ चोरटी ह्या जगाला प्रेम शिकवणाऱ्या संस्थेची स्थापना केली.समाजासाठी काहीतरी करायचे आहे. पण हातात पैसा तर अजिबात नाही मग करायचे काय? अशा द्विधा मन : स्थितीत असणाऱ्या तेरेसांनी स्वतः जवळ असणाऱ्या पाच रुपयांना सोबत घेऊन झोपडपट्टीतल्या मुलांकरीता झाडाखाली शाळा सुरु केली. झाडाखालच्या या शाळेत गोरगरीबांची अनाथ, अपंगांची पोरे शिक्षण घेऊ लागली. ही पोरं माउलीला मदर तेरेसा नावाने बोलवायची आणि हीच “मदर” पुढे चालून संपूर्ण जगाची “मदर तेरेसा ” झाली . मदर तेरेसा भारताला ख्रिश्चन राष्ट्र बनविण्यासाठी आल्या आहेत. त्यांनी अनेकांचे धर्मातर सुध्दा घडवून आणलय, अशी विषारी टीका त्यांच्यावर अनेकदा झाली पण मदर तेरेसा अजिबात डगमगल्या नाहीत. एकदा एका पत्रकाराने त्यांना सरळच प्रश्न विचारला की,” तुम्ही लोकांचे धर्मांतर करता का? ” त्यावेळी ह्या धाडसी स्त्रीने सांगितले की ,” हो , मी धर्मांतर घडवते, हिंदूनी अधिक चांगले हिंदू व्हा, मुस्लिमांनी अधिक चांगले मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी अधिक चांगले ख्रिश्चन व्हा , असे मी सांगते मदर तेरेसांचे नाव एवढे वेगाने पसरत होते तितक्याच वेगाने त्यांच्या कामाचा आवाका वाढत होता. १९५२ साली त्यांनी बेवारस निर्वासित आणि मस्तीमुख रोगी महिलांकरता निर्मलहदस आश्रमाची स्थापना केली. १९६४ साली पश्चिम बंगालमध्ये त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी कुष्ठगृहाची स्थापना केली. आजारी, अपंग आणि गरजूंची सेवा हीच खरी मानवतेची सेवा म्हणत स्वतःला समाज कार्यात पूर्णपणे झोकून दिले.

१९७६ मध्ये मुंबईमध्ये “आशादान” नावाचे स्वीकारगृह सुरु करून त्या माध्यमातून निधी उपलब्ध करायला सुरुवात केली. कधी काळी मदर तेरेसांना “सेंट ऑफ गटर्स” कार्याचा गौरव करत होती. म्हणून हिणवणारी पांढरपेशी लोक त्यांच्या मागेपुढे फिरून मदर तेरेसांच्या जगाला प्रेमाची दीक्षा देणाऱ्या मदर तेरेसांनी उभे केलेले काम एवढे भव्य होते कि संपूर्ण भारतात त्यांच्या संस्थेचा गवगवा झाला. अवघ्या पंधरा वर्षात ह्या संस्थेला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली. व्हेनेझुला, अमेरिका, आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया अशा जगभरात त्या सगळ्या कोपऱ्यात मदर तेरेसांच्या स्वयंसेवकांनी आपले काम उभे करायला सुरुवात केली. पूर, नैसर्गिक आपत्ती, बॉम्यरफोट, महारोग, व्यसनाधीनता अशा अनेक क्षेत्रात संपूर्ण विश्वात काम सुरु होते. जगभरात एकूण २२७ ठिकाणी मदर तेरेसांच्या संस्थेची सेवाकेंद्रे सुरु झाली. जगातल्या १२३ देशांमध्ये दहा लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक काम करु लागले. शंभरापेक्षा अधिक शाळा, ४५० फिरती रुग्णालये, १०२ कुष्ठरोग उपचार केंद्र, ३० शिशुभवन, ५० पेक्षा जास्त अनाथाश्रम असा प्रचंड मोठा विस्तार ह्या संस्थेचा झाला. कलकत्याच्या मातीतुन सुरु झालेल्या ह्या कामाचा डंका संपूर्ण जगभरात वाजत होता. सेवा हाच धर्म आणि प्रेम हेच भांडवल ह्या ब्रीदवाक्यातून उभे राहिलेले हे काम सर्वासाठी प्रेरणादायी होते. सर्वार्थाने बरबटलेल्या जगाला मात्र हे नवीन होते, जगाने मदर तेरेसांच्या ह्या कार्याला डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. १९७९ साली शांततेचा जगातला सर्वोच्च नोबेल पुरस्कार मदर तेरेसांना बहाल करण्यात आला. भारत सरकारने सुध्दा १९८० साली त्यांना भारतरत्न किताब देवुन सन्मानित केले. सदभावना पुरस्कार, पोपचा पुरस्कार, नार्वेलोक पारितोषिक असे जगभरातले अनेक सर्वोच्च सन्मान त्यांना देण्यात आले. परंतु ह्या माऊलीचे पाय अखेरपर्यंत जमिनीवरच होते.

जगाला प्रेमाची गरज आहे, असे म्हणत मदर तेरेसांनी प्रेमाचा खरा अर्थ विश्वाला आपल्या कार्यातुन उलगडून दाखवला. वयाच्या ८६ व्या वर्षी कलकत्यात मदर तेरेसांच्या मृत्यूची अफवा पसरली. सगळे जग हादरले . पण बातमी खोटी ठरल्यावर सर्वांनी नि : श्वास टाकला आणि त्याच दिवशी सायंकाळी पन्नास साठ भिकाऱ्यांचा जथ्था मदर तेरेसांच्या आश्रमासमोर येऊन उभा राहिला. एका सिस्टरने मदर तेरेसांना जावून सांगितले कि आश्रमात पत्रास-साठ भिकारी आलेत, त्वरित मदर तेरेसांनी सांगितले कि अगं त्यांना पोटभर जेवायला दे, कपडे नसतील तर कपडे दे, काय हवे नको बध! पण सिस्टर सांगत होती की, मदर ते भिकारी म्हणतात की आम्ही भीक मागायला नाही आलोय, आम्हाला फक्त पाच मिनिटांसाठी मदरना भेटायचयं, आम्ही त्याशिवाय इथुन जाणार नाही! भिकाऱ्यांची ती आर्त हाक ऐकून ह्या माउलींचे हृदय हेलावले.  अंगात त्राण नसतांना सुध्दा मदर तेरेसा जिना उतरून खाली आल्या आणि त्यांनी बघितले की अनेक भिकारी समोर उभे होते, कुणी आंधळा होता, कुणी पांगळा, कुणी म्हातारे, कुणी अपंग होते. सर्वांनी मदरला नमस्कार केला आणि एक म्हातारा भिकारी समोर आला त्याने हातातला नाण्यांनी भरलेला कटोरा मदर समोर धरला व सांगितले की , मदर आज आम्ही मागायला नाही तर काही द्यायला आलो, तुमच्या मृत्यूची बातमी खोटी ठरली हा आम्हा सर्वान करीता खूप मोठा दिवस आहे. म्हणून आम्ही दिवसभराची कमाई आम्ही तुमच्या कार्याला देतोय. मदर तेरेसांच्या डोळघातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. काय बोलावे हेच त्यांना कळेना, ही माऊली फक्त एकच वाक्य बोलली, तुमची ही भेट मला जगातल्या सर्वोच्च नोबेल पुरस्कारापेक्षा मोठी वाटतेय! भेट स्वीकारत समृध्द मोठा क्षण होता. मनाने मदर तेरेसा पुन्हा जिना चढल्या कारण त्यांच्या साठी देखील हा खूप २०१० साली मदर तेरेसांची शंभरावी जयंती साजरी झाली. त्यावेळेला भारत सरकारने त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ पाच रुपयांचे नाणे काढले. पाच रुपयेच होते. कारण त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली असतांना त्यांच्याकडे फक्त पाच रुपयेच होते.

मदर तेरेसा यांचे विचार –

ज्याच्यावर प्रेम करायला कोणी नाही, काळजी करायला कोणी नाही, ज्याला सगळ्यांनीच विसरले आहे, माझ्या मते, ज्याच्याकडे खायला काहीच नाही त्यापेक्षा जास्त भुकेलेला असतो, जास्त गरिबीने ग्रासलेला असतो.

जर आपल्याला शांतता नसेल तर त्याचे कारण म्हणजे आपण एकमेकांचे आहोत हे विसरलो आहोत.

तुम्ही शंभर लोकांना खाऊ शकत नसाल तर फक्त एकालाच खायला द्या.

शांततेची सुरुवात हसण्याने होते.

तुम्ही जिथे जाल तिथे प्रेम पसरवा, जो तुमच्याकडे येतो तो आनंदाने परत येतो.

कुष्ठरोग किंवा क्षयरोग हा सर्वात मोठा आजार नसून नकोसा वाटणे हा सर्वात मोठा आजार आहे.

चमत्कार हा नाही की आपण ते करतो, परंतु ते करण्यात आपल्याला आनंद मिळतो.

रुग्णाची भूक भागवण्यापेक्षा प्रेमाची भूक भागवणे महत्त्वाचे असते.

एकटेपणा ही सर्वात वाईट गरिबी आहे.

जर तुम्हाला तुमचा प्रेम संदेश ऐकायचा असेल तर तो पुन्हा पुन्हा सांगा, जसे की दिव्याला तेवत ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा तेल घालत राहणे आवश्यक आहे.

मदर तेरेसांचे हे विचार त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी सांगतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शब्दातून शिकून मानवतेची सेवा करण्याची शपथ घेऊया.