Home यशोगाथा सुभाषचंद्र बोस एक दुर्लक्षित देशभक्त…

सुभाषचंद्र बोस एक दुर्लक्षित देशभक्त…

0
सुभाषचंद्र बोस एक दुर्लक्षित देशभक्त…

सुभाषचंद्र बोस एक दुर्लक्षित देशभक्त…

www.janvicharnews.com

 १९१९ सालची गोष्ट आहे, बी.ए.चे शिक्षण पूर्ण केलेल्या एका विद्यार्थ्याने इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापिठात प्रवेश घेतला होता. आई वडील अश्रू भरल्या नजरेने मुलाला निरोप देत होते. इंग्लंडला जात असतांना वडीलांनी सांगितले ,“बेटा तुला आयसीएस व्हायचेच आहे .” तुझ्या नावासमोर मला ही तीन अक्षरे बघायची आहेत, मुलाच्या तोंडातून तर शब्दच बाहेर पडेना तसे आई कडाडली  “बाळ मी आजपर्यंत तुझ्याकडून कसलीही अपेक्षा केलेली नाही काहीही मागितलेले नाही, बेटा एवढंच कर माझ्यासाठी” तसा ह्या पोराच्या अश्रूंचा बांधच फुटला. आई वडिलांच्या गळ्यात पडला हा पोर त्यांना सांगत होता, हो मी करेल तुमचे स्वप्न पूर्ण. मी मे १९२० मध्ये आयसीएसची परीक्षा होणार होती. आयसीएस म्हणजे बुध्दिवंताच्या बुध्दिचा कस काढणारी परीक्षा होय. इंग्लंड आणि भारतातील कित्येक विद्यार्थी आपली सारी बुध्दिमत्ता ह्या परीक्षेसाठी पणाला लावत तरी देखील यश मिळणे अवघड असायचे. मग अशा अवस्थेत अवघ्या आठ महिन्याच्या काळात डोंगराएवढा अभ्यास कसा पुर्ण करायचा हाच ह्या तरुणासमोर मोठा प्रश्न होता. पण आई वडिलांच्या स्वप्नाचे स्मरण करत ह्या तरुणाने अभ्यासाला सुरुवात केली. सारे विसरून एकाग्र चित्ताने अभ्यास सुरु केला. चित्त अनेकदा विचलित व्हायचे पण वेळ कमी होता आणि कर्तृत्वाचे शिखर गाठायचेच होते. पाहता पाहता परीक्षा आटोपली. निकालाचा दिवस उगवला. अवघ्या आठ महिन्यात ह्या परीक्षेचा अभ्यास अशक्य होता. त्यामुळे कुटुंब किंवा मित्र परिवाराला काहीही अपेक्षा नव्हत्या. निकाल जाहीर झाला तशी इंग्लंडमधून भारतात एक तार येवून धडकली हा तरुण आयसीएसच्या परीक्षेत विद्यापीठात चौथा क्रमांक प्राप्त करत मेरिटने पास झाला होता. घरात आई वडीलाच्या आनंदाला उधाण आले मिठाई वाटली जाऊ लागली. तशी इंग्लंडहून दुसरी तार पुन्हा घरी येवून धडकली. ही तार त्या तरुणाने आईवडिलांना पाठवली होती. आणि तिच्यात लिहले कि “मी तुमच्या इच्छेनुसार आयसीएस होवुन भारतात परत येतोय. पण तुमचा मुलगा आयसीएस होवुन इंग्रजांसोबत काम करेल, अशी अपेक्षा करु नका. आयसीएस होऊन मी तुमचे स्वप्न पूर्ण केलंय. आता भारताला स्वातंत्र्य करत मला माझ्या मातीचे स्वप्न पुर्ण  करू दया क्षणात साऱ्या घरात स्मशान शांतता पसरली, तोपर्यंत वृत्तपत्राच्या माध्यमातून ही बातमी भारतभर पोहचली. सर्वत्र खळबळ माजली, असे कधीच घडले नव्हते. आयसीएसची परीक्षा मेरिटमध्ये पास होवुनही तिथी सनद नाकारणारा हा पहिला भारतीय होता आणि त्या भारतीयाचे नांव होते” सुभाषचंद्र बोस” अवघ्या चोवीसाव्या वर्षी सुभाषचंद्रांनी इंग्रजी सत्तेवर केलेला हा प्रचंड मोठा प्रहार होता. आयसीएसच्या वैभवशाली नोकरीचा त्याग करून सुभाषचंद्र बोसांनी निवडलेला रस्ता साधा सोपा नाही तर जिवघेण्या वेदनांचा होता परतु आयुष्याचे देखील तसेच होते. अगदी अल्पावधीतच देशबांधवांच्या गळ्यातला ताईत ठरलेल्या ह्या नेत्याने प्रत्येक संकटाशी एकाकी झुंज दिली. हर एक वेदनेला नेताजी पाठ न दाखवता सामोरे गेले. त्यात काही जखमा इंग्रजांकडच्या होत्या. तर काही वार स्वकीयांचे सुध्दा होते. परंतु सुभाषचंद्रांनी माघार घेतली नाही. १९२० नंतरच्या काळात भारतात गांधी युग वेगाने पुढे आले. कांग्रेस म्हणजे महात्मा गांधी आणि महात्मा गांधी म्हणजेच कांग्रेस है। अलिखित समीकरणच झाले. गांधीचा शब्द काँग्रेसमध्ये प्रमाण मानला जायचा आणि हरीपूरच्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गांधींनी सुभाषचंद्र बोसाची निवड केली. त्याच्या अवघ्या ३९ व्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बसलेल्या सुभाषचंद्रांनी देशभर झंझावात सुरु केला. सुभाषचंद्रांची मते, भाषणे लक्षवेधी ठरु लागली. लोक क्रांतीचा गजर करु लागले. त्यांच्या वादळी व्यक्तिमत्वामुळे फक्त इंग्रजच नव्हे तर सगळा गांधीगटच हादरू लागला. एरवी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणजे फक्त लोकांनी दिलेले हारतुरे मिरवत खुर्चीवर रेलून बसणारा. पण तसे वागतील ते सुभाषबाबु कसले? त्यांनी सगळी सूत्रे ताब्यात घेऊन सर्वांना धक्का दिला. इतकी आक्रमकता काँग्रेसला अनपेक्षित होती. हादरलेल्या गांधी गटाने अवघ्या वर्षभराच्या कार्यकाळानंतरच नेताजींना राजीनामा द्यायला सांगितले. परंतु कार्यकाळ संपायच्या आतच सुभाषचंद्रांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची उमेदवारी घोषित करून खुद गांधींनाच धक्का दिला. सुभाषचंद्रांमुळे काँग्रेसमध्ये जहाल मवाळ असा उभा दावा पेटला. बोस गांधी संघर्षाने आता वेगळच वळण घेतले होते. गांधींनी सुभाषचंद्राच्या विरुध्द भूमिका घेऊन डॉ. सीतारामय्या यांची उमेदवारी घोषित केली. तर सुभाषबाबुंनी गांधींच्या उमेदवाराविरोधात उभे राहिले. काँग्रेसच्या इतिहासात असा प्रसंग पहिल्यांदाच उद्भवला होता. नेहमी बिनविरोध होणारी निवडणूक कधी नव्हे ती वादात अडकली. प्रत्येकजन सुभाषचंद्रांचा पराभव अटळ मानत होता. निकालाचा दिवस उगवला. त्यांची झुंज एकतर्फीच दिसू लागली. एकदाची निवडणूक आटोपली आणि निकाल ऐकून देशभरातली सगळी काँग्रेसच हादरली. पराभव केला होता सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीचे उमेदवार डॉ . सीतारामय्या यांचा…. सुभाषचंद्र बोस ही काही सर्वसामान्य व्यक्ती नाही याची चांगलीच जाणीव इंग्रज सरकारला झाली. दुसरे महायुध्द ऐन रंगात आले होते आणि अशा काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रिटिशांच्या शत्रूशी संधान बांधण्याचे सामर्थ्य फक्त सुभाषचंद्रामध्येच आहे, याची जाणीव इंग्रजांना होती. म्हणूनच हालवेल स्मारकाचे ” निमित्त काढून त्यांना अटक करण्यात आली. परंतु सुभाषबाबुंनी तुरुंगातच आमरण उपोषण सुरू केले. उपोषणामुळे त्यांची तब्येत वेगाने खालावू लागली. वजन कमी होत होते. दुसरीकडे त्यांच्या समर्थनासाठी संपूर्ण देशभरात आंदोलने, उपोषणे सुरु तुरुंगातून हालवत घरातच नजरकैद केले. आणि जनतेचा उद्रेक कमी व्हावा म्हणून ब्रिटिशांनी सुभाषचंद्रांना छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारे सुभाषचंद्र बोस नजरकैदेत राहतीलच कसे? त्यांनी नजरकैदेतूनच इंग्रज सरकारला चकमा दिला. योजनाबद्ध रीतीने प्रवास करत ते अफगाणिस्तानच्या सीमेवर येवून पोहचले. कधी मौलवीचा तर कधी मुक्या बहिन्याचे सोंग घेत हा अवलिया जर्मनीच्या उंबरठ्यावर जावून धडकला. तोपर्यंत नेताजींच्या भारतातून गायब होण्याची बातमी जगभर पोहचली होती आणि तेच सुभाषचंद्र जर्मनीत येत असल्याचे कळताच जर्मन सरकारने त्यांचे स्वागत एखाद्या राष्ट्रप्रमुखांप्रमाणे केले. सुभाषबाबुजी जर्मनीचा हुकूमशाहा हिटलरची भेट घेऊन त्यांच्याकडे भारताच्या स्वातंत्र्यासाठी सहकार्य मागितले. तिथून नेताजी इटलीला गेले. मुसोलिनीची भेट घेऊन त्यांना आपली भुमिका समजावून सांगितली परंतु ही दोन्ही राष्ट्रे भौगोलिकदृष्ट्या भारतापासून दूर असल्याने त्याची आपल्याला मदत होणार नाही हे लक्षात आल्यावर सुभाषचंद्रांनी आपला मोर्चा जपानकडे वळवला परंतु जपान गाठणे इतके सोपे नव्हते. पावलोपावली ब्रिटिशांचा पाठलाग सुरु होता. दोस्त राष्ट्रांचे हेर मागावर होते अशावेळी तब्बल अठरा आठवडे पाणबुडीने सागरी प्रवास करत हा माणूस जपानमध्ये पोहचला. उमेदीच्या काळातली सुखाची नोकरी लाथाडत देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगाला गवसणी घालणारा असा नेता भारतात कुणीही नव्हता. जपानमध्ये जाऊन सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. पाहता पाहता जगभरातल्या नऊ राष्ट्रानी ह्या सरकारला पाठिंबा देत त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि आझाद हिंद सेनेची झुंज सुरू झाली. ऐन महायुध्दाच्या धामधुमीत आझाद हिंद सेनेची “सुभाष रेजिमेंट” भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी दोन हात करत होती. स्वातंत्र्याचा एक प्रचंड महत्वाकांक्षी प्रवास चालू होता. संपूर्ण भारत सुभाषचंद्रांचा जयघोष करत त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करू लागला. आझाद हिंद सेना भारताच्या वाटेवर असतांनाच एक डोकेसुन्न करणारी घटना घडली. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी ह्या शहरांवर अणुबॉम्ब टाकले. आणि युध्दाचा रंगच पालटला. जपानने विनाशर्त शरणागती पत्करली. त्यातच हिटलरच्या आत्महत्येमुळे जर्मनी शरण आलेले पाहुन सुभाषचंद्रांच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. पण तरी देखील ह्या निडर नेत्याने रशियात जावून लढा सुरु ठेवायचे जाहीर केले. मानाची नोकरी आणि भरमसाट पगार नाकारत ह्या माणसाने भारताचा संसार मांडला होता. अणुबॉम्ब पडून नेस्तानाबूद झाल्यावरही जपान सरकारने सुभाषचंद्रांसोबतची मैत्री निभावली. अमेरिकन ब्रिटिश फौजा जपानमध्ये घुसण्याआधीच त्यांनी सुभाषबाबुंना सुरक्षित स्थळी पाठवण्याची व्यवस्था केली. त्यांना सुखरूप बाहेर पडता यावे म्हणून विमानाची व्यवस्था करण्यात आली. जपानच्या सायगाय विमानतळावरून नेताजींच्या विमानाने उड्डाण केले. नऊ जणांची क्षमता असणाऱ्या ह्या विमानात बारापेक्षा जास्त लोक बसले होते. टुरेन, ताइपेईचे विमानतळ मागे टाकत विमांनुरियाच्या दिशेने प्रवास सुरु होता. आणि अचानकच विमानाची घरघर वाढली. काही कळायच्या आतच विमानाचा एक पंखा धाडदिशी कोसळला. उरलेल्या विमानाने पेट घेतला आणि क्षणात ते जमिनीवर येऊन कोसळले. प्रत्येकजण विमानातून बाहेर पडायची धडपड करत होता  सुभाषचंद्रांचे तर सगळे शरीर भाजून निघाले. प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला. एका सहकारीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु शरीर उपचाराला साथ देईना अखेर मध्यरात्रीच्या सुमारास नेताजींनी शेवटचा श्वास घेतला. युध्दकाळामुळे त्यांचे पार्थिव कुठे नेणे ही शक्य होत नव्हते. म्हणून तेहोकु मध्येच जपानी अधिकाऱ्यांच्या साक्षीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. करोडो भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या ह्या क्रांतीपुत्राच्या चितेसमोर उभे राहायचे भाग्यसुध्दा एखाद्या भारतीयाला मिळाले नाही. अखंड आयुष्य देशासाठी संघर्ष करणारा हा योध्दा दूरदेशीच्या रानावनातल्या उदध्वस्त स्मशानभूमीत एकाकी जळाला. परंतु त्यांच्या बलिदानाच्या ज्वालांनी देशात क्रांतीचा आगडोंब उसळला त्यामुळेच ब्रिटिशांना भारत सोडुन जावे लागले. हे सत्य कुणी नाकारु शकत आज उच्च पदावर असणारे अनेक बुध्दिमान तरुण भारतात आहेत. त्यांनी फक्त सुभाषचंद्र बोसांच्या देशप्रेमाचा आदर्श जरी डोळ्यासमोर ठेवला तरी भारत सुजलाम सुफलाम झाल्यावाचून राहणार नाही. फक्त तो आदर्श घेतांना कुठल्या मान सन्मानाची अपेक्षा मात्र ठेवू नये. कारण क्रांतीपुत्रांच्या वाटेला मानसन्मान कधी येतच नाहीत. खुद सुभाषचंद्र बोस यांना १९९२ साली भारत सरकारने ” भारतरत्न ” हा किताब दिला परंतु त्याविरोधात एक जनहित याचिका दाखल झाली म्हणून भारत सरकारने तो पुरस्कार पुन्हा काढून घेतला. त्यांचे तैलचित्र संसदेत लावावे म्हणून त्यांच्या अनुयायांना तब्बल ५० वर्षे सरकारशी संघर्ष करावा लागला. जिथे सुभाषचंद्रांसारख्या महापुरुषांची ही अवस्था आहे तिथे इतरांच्या वाट्याला काय येणार ??? .

“भारतात आता इंग्रजाची सत्ता येऊ शकत नाही हे अगदी खरे आहे. परंतु राज्यकर्त्यांच्या नितिमत्ता जर इंग्रजाप्रमाणेच असतील तर ?? साठ वर्षात फक्त एकच गोष्ट ह्या देशात घडलीय ‘ सत्तेत बसणारे लोक फक्त बदललेत गुलामी मात्र तशीच चालू आहे.’ आणि ती तोपर्यंत तशीच अखंड राहील जोपर्यंत प्रत्येकाच्या काळजातला भगतसिंग जिवंत होत नाही देशाकरता प्रत्येकाने मेलेच पाहिजे असे फक्त देशाकरता प्रत्येकजण जगणे करेल सुरु त्यादिवशी सगळे बदलेल …. “