Home महाराष्ट्र बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या निर्णयाशी माझा संबध नाही ,माजी खासदार रविंद्र गायकवाड यांची निष्ठा कायम शिवसेनेशी…..

बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या निर्णयाशी माझा संबध नाही ,माजी खासदार रविंद्र गायकवाड यांची निष्ठा कायम शिवसेनेशी…..

0
बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या निर्णयाशी माझा संबध नाही ,माजी खासदार रविंद्र गायकवाड यांची निष्ठा कायम शिवसेनेशी…..

बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या निर्णयाशी माझा संबध नाही ,माजी खासदार रविंद्र गायकवाड यांची निष्ठा कायम शिवसेनेशी…..

www.janvicharnews.com

 

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार ज्ञानराज चौगुलेही आहेत. चौगुले यांनी आपण रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने बंडात सहभागी झालो असे एका व्हिडिओत म्हटले आहे. आता यावरून रविंद्र गायकवाड यांनी पत्रक जारी केले आहे.शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या दाव्यानंतर माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे. आपण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायमस्वरुपी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केलेला आहे. त्या संवाद पोष्टशी माझा कोणताही संबध नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.आमदार ज्ञानराज चौगुले यांनी माझ्याशी कसलीही चर्चा केलेली नाही.मी गेल्या ३५ वर्षापासून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेसाठी एकनिष्ठेने काम केले आहे, करत आहे आणि करत राहणार, .उमरगा व लोहारा तालुक्यातील संपूर्ण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे कायमस्वरुपी आहे, असे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी म्हटले आहे.