राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त
janvicharnews.com
विज्ञान सांगतं –
❣️ विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं
❣️ ते कारण आपल्या मानवी बुद्धीला समजू शकतं
❣️सर्व कारणं आजच समजतील असं नाही पण जेव्हा केव्हा समजतील त्यावेळी विज्ञानाच्या नियमानेच समजतील.
❣️ही कारणं समजल्यावर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या विकासासाठी, काही समस्या दूर करण्यासाठी करून घेता येतो.
❣️ हजारो वर्षे अनुत्तरित असणारे प्रश्न आधुनिक विज्ञानाने सोडवले आहेत.
❣️ याचा अर्थ सर्वच प्रश्न सुटले आहेत असे नाही पण आज अनुत्तरित असणारे प्रश्न ही विज्ञानाच्या आधारेच सोडवता येणार आहेत.
❣️ विज्ञान स्वतः काही चागलं किंवा वाईट ठरवत नाही. विज्ञान जे आहे ते, जसं आहे तसं आपल्यासमोर मांडतं.
❣️ शाळा महाविद्यालयांतून निबंध, भाषण स्पर्धेसाठी दिला जाणारा विज्ञान शाप की वरदान हा विषयच चूक आहे. विज्ञान हे वरदानच आहे. ते कधीच शाप असू शकत नाही.
❣️ विज्ञान वापरणाऱ्याच्या विवेकावर आपण विज्ञानाला शाप किंवा वरदान ठरवत असतो. शाप किंवा वरदान हा विज्ञानाचा गुण नसून वापरणाऱ्याचा आहे.
❣️ विज्ञान संपल्यावर अध्यात्म सुरू होते ही समाजाने जोपासलेली एक गोंडस अंधश्रद्धा आहे. उलट जिथे अध्यात्म थांबतं तिथून विज्ञान सुरू होतं असं म्हणता येऊ शकतं.
❣️ विज्ञान हे अध्यात्माप्रमाणे मला सर्व समजतं किंवा समजलेलं आहे असं म्हणत नाही.
❣️ आजपर्यंतच्या ज्ञानाच्या आधारे मला एवढं समजलेला आहे असं विज्ञान म्हणतं. अजून न समजलेल्या अनेक गोष्टी आहेत हे विज्ञान नम्रपणे मान्य करतं.
❣️ न समजलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी विज्ञान नेहमी नवनवीन ज्ञानाच्या शोधात असतं.
❣️ विज्ञान आपल्याला निर्भय, समग्र आणि व्यापक विचार करायला शिकवतं.
❣️ निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग हे विज्ञानाचे सत्य शोधण्याचे मार्ग आहेत.
❣️ अलीकडे विज्ञानाचा वापर करून अज्ञान आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे (फलज्योतिष, वास्तुज्योतिष वगैरे वगैरे) प्रकार सुरू आहेत त्यापासून सावध राहिलं पाहिजे.
❤️ राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक सदिच्छा!❤
️२८ फेब्रुवारी