कर्जत दि. 18/03/2023
कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालय व कोकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च नवी दिल्ली यांच्या सहकार्याने आणि भारतीय मूर्ती व स्थापत्य संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने प्राचीन भारतीय प्रतिमा शास्त्रातील नवीन संशोधन प्रवृत्ती – मंदिरे, लेणी, स्तूप, चैत्यगृह आणि शैली चित्रे या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन सोमवार व मंगळवार दिनांक 20 व 21 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आले आहे.
या दोन दिवशीय परिषदेत लेणी, मंदिर व मूर्ती शिल्प अभ्यासक मा.डॉ.गो.ब.देगलुरकर (पुणे), मा. डॉ. प्रभाकर देव (नांदेड), प्रा.डॉ. वाय. एस.अलोणे ( जे. एन. यु. दिल्ली ) डॉ. मंजिरी भालेराव (पुणे), प्रो. डॉ. अंबालिका सुद जोकोब (पटियाला, पंजाब) प्रा. डॉ. किशोर गायकवाड (मिझोरम) डॉ. विलास वाहने (सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग.महाराष्ट्र शासन, रत्नागिरी व पुणे) डॉ. सोमनाथ कदम,(कणकवली) डॉ. श्रीकांत गणवीर (पुणे), डॉ. अरविंद सोनटक्के (नांदेड), डॉ. नितीन बावळे (परभणी), डॉ जेठावत मोथिलाल (हैदराबाद) इत्यादी अभ्यासक व मान्यवरांचे मार्गदर्शन या परिषदेत लाभणार आहे. परिषदेत सहभागी अभ्यासक व संशोधक आपला शोध निबंध विविध सत्रामध्ये वाचन करणार आहेत. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री प्रदीपचंद्र शृंगारपुरे, प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड, प्राचार्य प्रा. रवींद्र कटके, प्रा.के. ए. शामा, प्रा.डॉ.एम.जी. लोणे, परिषद आयोजक प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे,प्रा.डॉ. जितेंद्र भामरे आदींनी संशोधक व अभ्यासकांना परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अवाहन केले आहे. ही परिषद कोकण ज्ञानपीठ संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्जत.ता. कर्जत जि.रायगड या ठिकाणी संपन्न होणार आहे.