Home करिअर कट्टा क्रीडा (Sports) क्षेत्रातील करिअर

क्रीडा (Sports) क्षेत्रातील करिअर

0
क्रीडा (Sports) क्षेत्रातील करिअर

आपली शारीरिक क्षमता व कौशल्ये पणाला लावून वैयक्तिक किंवा सांधिक पातळीवर स्पर्धेसाठी किंवा मनोरंजनासाठी केली कृती म्हणजे क्रीडा होय. खरतर खेळामध्ये करिअर हा काही वर्षापूर्वी जवळपास थट्टेचाच विषय होता; परंतु आज चित्र बदल खेळातही उत्तम करिअर करता येऊ शकते हा विचार जनमानसात आता रुजत आहे. लहानपणापासूनच जर खेळात रुची असेल तर शालेय जीवनातच  आवडत्या खेळाचे प्रशिक्षण घेऊन पुढे खेळात करिअर करणे सहज शक्य होते. तसेच, आता केवळ खेळाडू म्हणूनच करिअर करता येते असेही नाही. आपल्या आवडत्या खेळाच्या क्षेत्रात खेळाडू व्यतिरिक्त आणखी अनेक पदांवर चांगल्या संधी उपलब्ध शकतात.

क्षेत्राची व्याप्ती व संधी

खेळाचे क्षेत्र आज मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. केवळ खेळाडू, प्रशिक्षक यापलीकडे जाऊनही अनेक संधी झाल्या आहेत. या क्षेत्रात आता क्रीडा व्यवस्थापन, प्रशिक्षण, पत्रकारिता जाहिरात व्यवस्थापन, नियोजन, समालोचन, फिजिओथेरपी, अर्थ व्यवस्थापन, प्रायोजक व्यवस्थापन अशा अनेक विभागांमध्ये काम करता येते. खेळाची आवड मैदानावर काही वर्षांचा अनुभव असणाऱ्याना क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करता येते. प्रशिक्षक म्हणून अनेक वर्षांचा अनुभव मिळवणाऱ्यांसाठी स्वतःची प्रशिक्षण संस्था काढण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो. सध्या अनेक शाळांमध्येही काही क्रीडाप्रकार शिकवले जातात; ज्यासाठी प्रशिक्षक म्हणून संधी उपलब्ध असते. हल्ली जगभरात क्रीडाविषयक बातम्या लेख यांना महत्व आल्यामुळे क्रीडा पत्रकारितेचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. फिजिओथेरपिस्ट हाही करिअरचा एक उत्तम पर्याय आहे. खेळाडूचे स्वास्थ्य व तंदुरुस्ती, तसेच खेळाचा उत्तम दर्जा यामागे फिजिओथेरपिस्टची भूमिका महत्त्वाची असते. खेळाडूचे स्वास्थ्य चांगले राहण्यास योग्य पोषणमूल्ययुक्त आहाराची गरज असते. त्यामुळे, आहाराबाबत मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा आहारतज्ज्ञाना (डाएटिशिअन) या क्षेत्रात खूप वाव आहे. साहसी खेळांचे क्षेत्रही आता। नावारूपाला येत आहे. अँडव्हेंचर स्पोर्टसमध्ये माऊंटन बाइकिंग, पैराग्लाइडिंग, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डाइव्हिंग, ट्रेकिंग इ प्रशिक्षण घेता येते. पर्यटन क्षेत्रात या प्रशिक्षकांना खूप वाव असतो. यात अॅडव्हेंचर स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर, अँथेलिट, आउटबाउंड ट्रेनिग, फॅसिलिटेर अॅण्ड ट्रेनर, अँडव्हेंचर स्पोर्टस फोटोग्राफर, अॅडव्हेंचर टूरिझम फॅसिलिटेर, ट्रेकिंग अॅण्ड माऊंटन गाईड, अँड गाईड अशा विविध पदांवर काम करता येते. स्पोर्ट्स मार्केटिंगद्वारे खेळाडू किंवा क्रीडा संघाची प्रसिद्धी केली जाते. क्रीडाविषयक उत्पादनात सुप्रसिद्ध खेळाडूंद्वारे जाहिरात केली जाते किंवा एखादया क्रीडा उत्पादक कंपनीस प्रायोजकत्व क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात व या गोष्टीचे नियोजन करण्यासाठी प्रशिक्षित लोकांची गरज भासतेच. क्रीडा समालोचन हि सुद्धा क्षेत्रातील एक आकर्षक संधी आहे. मैदानावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे स्पर्धेचे आकर्षक व रंजक शैलीत व श्रोत्यांसमोर सादर करणे हे काम क्रीडा समालोचकाचे असते. या अशा महत्त्वाच्या संधीखेरीज आणखीन ही अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत, जसे – क्रीडा कायदेतज्ञ, क्रीडा समीक्षक, क्रीडा पेहराव निर्मिती, कॉर्पोरेट जगतासाठी स्पोर्टस इव्हेंट क्रीडा संघटक पंच, सामनाधिकारी, स्कोअर्स स्टॉटस्टिशिअन्स सीडीओ अनालायझर्स इत्यादी. राज्याचे व राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणात्या शासकीय व निमशासकीय नोकऱ्यामध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात येते आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशिष्ट क्रीडा पदके संपादित करणाऱ्या राज्यातील खेळाडूना शासकीय सेवेत थेट नियुक्त केले जाऊ शकते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये या खेळाडूंना त्यांच्या क्रीडासंघातर्फे खेळासाठीहि संधी मिळते. लष्करी व निमलष्करी दलांमध्येसाठी राखीव जागा असतात. खेळाडूच्या शारीरिक सुद्ढतेमुळे अशा दलामध्ये त्याना संधी मिळण्याची शक्यता दृढ होते.

 

आवश्यक गुण

क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी काही अंगभूत गुण असणे अतिशय जरुरीचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खेळाविषयी मनापासून आवड. तसेच, शारीरिक क्षमता या क्षेत्रात अतिशय महत्त्वाची ठरते कारण फक्त खेळाची आवड असून चालणार नाही. सोबत आपले शरीर तंदुरुस्त असणे, आपली तग धरण्याची क्षमता, नैसर्गिक सामर्थ्य उत्तम असणे तेवढेच महत्त्वाचे असते… खेळात हार-जीत होतेच. त्यामुळे, खेळाच्या क्षेत्रात प्रामुख्याने खेळाडू माणून करिअर करताना खिलाडूवृत्ती असणे खूप महत्त्वाचे असते. क्रीडा समालोचकाच्या पदासाठी उत्तम संवादकौशल्य, समयसूचकता, चांगला वक्ता असणे, भाषेवर प्रभुत्व या गोष्टी असतात. अंपायर किंवा पंच म्हणून काम करताना खेळाची आवड व खेळतील विविध नियम यांचे अचूक ज्ञान असणे महत्वाचे असते. तसेच, अँडव्हेंचर स्पोर्ट्स अॅक्शन स्पोर्टस या साहसी खेळांच्या क्षेत्रातही शारीरिक व मानसिक क्षमतेसह नेतृत्वगुण, संघभावना, पराकोटीची जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्याविषयीची बांधिलकी तसेच उत्तम सामान्य ज्ञान, भौगोलिक प्रदेशाचे ज्ञान, प्रसंगावधान या गोष्टी असणे महत्त्वाचे असते. याचबरोबर मेहनत करण्याची तयारी, स्वतःची शारीरिक तंदुरुस्ती जपण्याचे प्रयत्न. वेळेचे नियोजन व उत्तम व्यवस्थापन कौशल्य या गुणांच्या बळावर या क्षेत्रात चांगले भविष्य नक्कीच घडवता येते.

अभ्यासक्रम

अंडरग्रॅज्युएट कोर्स:

B.SC इन फिजिकल एज्युकेशन, हेल्थ एज्युकेशन अँण्ड स्पोर्टस सायन्सेस

बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (B.P.E)

B.A इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट

B.A इन स्पोर्ट्स अॅण्ड रिक्रिएशन मॅनेजमेंट

बॅचलर ऑफ बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन (BBA) इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट

 

पोस्टग्रॅज्युएट कोर्स:

मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन

M.Sc इन स्पोर्ट्स कोचिंग

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मेडिसिन

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स बिजनेस

MBA इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट

मास्टर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (MSM)

M.Sc इन स्पोर्ट्स सायन्स

 

डॉक्टोरल डिग्री कोर्स:

Ph.D इन फिजिकल एज्युकेशन

M.Phil इन फिजिकल एज्युकेशन

Ph.D Rh इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट

 

डिप्लोमा कोर्स:

डिप्लोमा इन स्पोर्ट्स मेडिसिन

डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग

डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट

डिप्लोमा इन स्पोर्ट्स सायन्स अॅण्ड न्यूट्रिशन