गोपाळकृष्ण गोखले नैतिक आणि भौतिक शिक्षणाचे अग्रणी’
डॉ. डोंगरदिवे वासुदेव एम.
पुण्याच्या सार्वजनिक सभेचे चिटणीस पद त्यांनी काही काळ सांभाळले. लोकहिताला तसेच सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न सोडविण्याची त्यांच्यात एकप्रकारे चढाओढ निर्माण झाली. अशाप्रकारे सामाजिक दृष्टिकोणाच्या व्याप्ती बरोबरच त्यांची राजकीय स्वातंत्र्याची भूमिका नव्याने जन्माला येत होती. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील कार्य आणि त्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच होती. यासर्वांमधून गोखले यांच्यामध्ये देशभक्ती, देशहिताची तळमळ, देश विकासातील कर्तव्यबुद्धी ही दिवसेंदिवस आवासून उभी राहत होती. देशहित जोपासणे एवढे एकाच ध्येय डोळ्यासमोर निर्माण होउ लागले यातूनच देश सेवेचे व्रत त्यांच्यात निर्माण होउ लागले.१
साध्य आणि साधन –
गोपाळ कृष्ण गोखले एके ठिकाणी असे म्हणतात की, मनुष्य हा एक नैतिक प्राणी आहे. ज्यामुळे मानवी जीवनात असणारे ध्येय हे प्रथमता नैतिक स्वरूपाचेच असतात. असे असले तरी राजकीय भूमिका ही मानवाच्या जीवनाचे एक अंग आहे. सार्वजनिक जीवनाच्या (Public Life) प्रत्येक हालचाली ह्या नैतिकतेवर आधारित असाव्यात. मानवाच्या नैतिक मूल्यांच्या ध्येय पूर्तीच्या मार्गात नैतिक दृष्टिकोण खूप महत्वाचा असावा.२ गोखले यांनी आपल्या जीवंत नैतिक मूल्यांना बरेच महत्वाचे स्थान दिले आहे.
सामाजिक विचार –
गोपाल कृष्ण गोखले यांचे सामाजिक क्षेत्रातील विचार हे विभिन्न क्षेत्रांच्या सामूहिक एकयाचे, सामूहिक हिताचे प्रतीक असल्याचे म्हटल्या जाते. असे असले तरी आपल्या असे लक्षात येते की, लोकमान्य टिळकांप्रमाणे गोखले यांनी सामाजिक क्षेत्राशी संबंधित आपले कार्य नसले तरी सुद्धा गोखले खरे समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. गोखले यांनी सामाजिक समतेप्रति बरीच आपुलकी जोपासली होती. सामाजिक क्षेत्राशी विशेष सक्रिय नसले तरी सुद्धा एक समाज सुधारक म्हणून त्यांना ओळखले जाते. समाजात रूढी- प्रथा परंपरा अस्तित्वात होत्या त्यावेळी सुद्धा दुष्ट चालीरीतीचा विरोध केला आहे. देशाच्या प्रगतीच्या मार्गातील महत्वाची अडचण म्हणजे, समाजातील चालीरिती, दुष्ट प्रथा परंपरा ह्या होत. अशातच गोखले यांनी देशातील गरीब, निराधार व अल्पसंख्यांक वर्गाप्रति अधिक जिव्हाळ्याचे, आपुलकीचे संबंध निर्माण केले. भारतामधील दलित वर्गाचा उत्तम प्रकारे उदय व्हावा, त्यांचा महत्वपूर्ण विकास घडवून यावा असे त्यांना वाटले. गोखले यांना दृढ आत्मविश्वास होता की, देशातील जाती-पाती स्पृश्य-अस्पृश्य नष्ट केल्यास देशाची प्रगती मोठ्या प्रमाणात घडून येणार आहे, इतकेच नव्हे तर तत्कालीन परिस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेत जाती-पाती, अस्पृश्यता यांना विरोध केला. जाती पाती, स्पृश्य-अस्पृश्य हा सामाजिक भेदभाव नष्ट झाल्यास देशाच्या प्रगतीची विशेष विकसित स्वरूप दिसणार नाही.
हिंदसेवक समाज भूमिका –
होतकरू तरुणांनी एकत्र यावे व देश सेवेच्या कार्यात आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, याच भूमिकेतून ‘सर्व्हट्स ऑफ इंडिया’ या सोसायटीची स्थापना सन १९०५ मध्ये स्वता गोखले यांनी केली. देशभक्तीचा विचार करून मिशनरी वर्गाप्रमाणे देशसेवेचे कार्य स्वीकारून ज्यामध्ये मुद्दामपणे शिकलेले तरुण यांना सहभागी करावे, ज्यामधून देशशाचा विकास होऊन, राष्ट्र विकसित करण्याची आज खरी गरज आहे. यातून सुशिक्षित वर्गाला उभे केल्याशिवाय पर्याय नव्हता. कारण राष्ट निर्मितीचे व राष्ट्र विकासाचे कार्य हे सिद्धीस जाणार नव्हते या उदात्त ध्येयाने गोखले यांनी या संस्थेची स्थापना केली. या समजायला ब्रिटिश वर्गाशी संबंध मान्य होता. साम्राज्यातर्गत स्वराज्य हे या संस्थेचे ध्येय होते. सार्वजनिक जीवनाकडे एक धर्म म्हणून, देशप्रेम असे असावे की, त्यापुढे इतर कशाचेही आकर्षण वाटू नये. उच्च दर्जाचे शील व कार्यक्षमता या गुणांची जोपासना करण्यात यावी.४
वरील प्रकारच्या भूमिकेतून आपणास गोखले यांनी सामाजिक क्षेत्रातील भूमिका ही प्रत्यक्ष स्वरूपात दिसत नसली तरी व्यक्तीला समाज कार्यात सक्रिय होण्यास अत्यंत महत्वाची असल्याचे म्हणता येते. समाजातील रुढी, प्रथा- परंपरा यांचा त्यांनी विरोध केला आहे. याशिवाय गोखले यांनी दलित वर्गाच्या सामाजिक जीवनात परिवर्तन होऊन जीवन स्तर कसा विकसित करता येईल यांचा त्यांनी विचार केला आहे. यातुनच त्यांनी राजकीय क्षेत्रांमध्ये नैतिक मुलांची उत्तम जोपासना करता येतील याचाही विचार मांडला. प्रत्यक्षात गोपाळकृष्ण गोखले यांना तत्कालीन हिंदू धर्म व इस्लामवादी विचार विकसित करण्यात प्राधान्य द्यावे. हिंदू-मुसलमान वर्गांमध्ये सामाजिक दृष्ट्या सुमधुर संबंध प्रस्थापित करण्यास त्यांनी प्रयत्न केलेत. गोखले हे धर्म निरपेक्षतेचे उपासक आहेत असेही एकविण्यात येत असे. म्हणजेच गोखले हे मानवतावादी स्वरूपाचे मानवतावादी विचार प्रवर्तक होते असेच आपणास म्हणता येईल.५
शिक्षण आणि समाज सुधारणा –
एका आदर्शवादी शिक्षकांच्या भूमिकेचा गोखले यांना परिचय आलेला होता. अगदी मोजक्याच स्वरूपाच्या मिळकतीमध्ये शिक्षकांच्या स्वरूपात कार्य करीत असत. शिक्षण विषयक विचार त्यांनी व्यापक अर्थाने व सामूहिक बांधीलकीच्या भावनेने नमूद केलेले आहेत. साहाजिकच शिक्षण विषयक विचार तसेच शिक्षण विषयक दृष्टिकोण बराच व्यापक स्वरूपाचे असल्याचे सांगता येतिल. ना. गोखले यांनी आपल्या नमूद केलेल्या भाषणांतून संपूर्ण भारतामध्ये अशिक्षित वर्गाचे असणारे प्रमाण म्हणजे, समर्पकता व निष्ठापूर्वकता या गुणांचे बरेच महत्वपूर्ण वर्णन केले आहे. याचवेळी केंद्रीय वर्गाने राबविलेल्या शैक्षणिक धोरणात महत्वपूर्ण बदल घडवून आणण्याचे आव्हाहन त्यांनी केले आहे.६
भारतामध्ये इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या वर्गाचे प्रमाण अल्प स्वरूपाचे असले तरी त्यामुळे इतर वर्गास एक वेगळीच प्रेरणा मिळत आहे. या इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय वर्ग उदारवादी, समानतावादी, स्वातंत्रतावादी मूल्यांचे महत्व समजून घेण्यास सज्ज झाला आहे. या नव परिस्थितीची भारतीय वर्गास जाणीव होत असल्याचे गोखले यांनी सरकारला सांगण्यास पुढाकार घेतला आहे. सन १९११ मध्ये त्यांनी सरकार दरबारी ह्याची माहिती पोहचविली आहे. भारतीय वर्ग या परिस्थितीला अनुकूल आहे किंवा नाही यासाठी सरकारने आमची परीक्षा चार प्रकारे घ्यावी. असेही गोखले यांनी सरकारला सुचविले. त्यासाठी भारतीय वर्ग हा बहुसंख्यांक आहे म्हणून त्यांच्या नैतिक, व भौतिक विकासाकरिता सरकारची कोणती योजना आहे? असा त्यांनी पहिला प्रश्न केला. भारतामध्ये ब्रिटिश सरकारने शिक्षणासाठी कोणत्या मार्गाचा यासाठी उपयोग करेला आहे? साधन व्यवस्थेची सरकारला कोणती जाणीव आहे? सरकारने केवळ त्यांच्या अस्तित्वाला लक्षात घेऊनच त्या मार्गांचा वापर केला आहे. मात्र त्यामुळे भारतीय जनतेला कोणताही फायदा झाला नाही. त्यासाठी उदाहरण देण्याचे वाटल्यास, भारतात रेल्वे मार्गाचा अवलंब सरकारने केवळ आपल्या आर्थिक समृद्धीसाठी केला आहे. तसेच टपाल व तार सेवा ही सुद्धा सारकारच्याच हितासाठी निर्माण करण्यात आली आहे. म्हणून सरकारने जनतेच्या नैतिक व भौतिक विकसंकरिता यासारखे भरीव व महत्वपूर्ण कोणते उपाय केले आहेत?७
शिक्षणाबरोबरच कृषि क्षेत्रातील विकास, सफाई व्यवस्थेचा विकास कुठेही फारसा दिसत नाही असा गोखले यांनी सरकारला प्रश्न केला आहे. याशिवाय सरकारने स्थानिक प्रशासन व्यवस्थेमध्ये भारतीय वर्गास किती व कोणते महत्वाचे स्थान दिले आहे? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न सरकार दरबारी विचारण्याचे धैर्य केले आहे. मात्र त्यामुळे भारतीय जनतेला कोणताही फायदा झाला नाही. ज्याठिकाणी काही धोरणे, काही महत्वाची भूमिका निश्चित होतात अशा महत्वाच्या सभागृहांमध्ये सरकारने आम्हा भारतीयांना सहभागी करून घ्यावेत असेही मागणी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी स्थानीय प्रशासन व्यवस्था व संहा गृहांमध्ये भारतीय वर्गास सहभागी करून घ्यावे अशी विनंती गोखले यांनी केली आहे. आणि याच स्वरूपाचा अन्य प्रश्न करताना गोखले विचारतात की, भारतीय वर्गास सरकारने नोकरीमध्ये कितपत सहभागी करून घेतले आहे?
प्राथमिक शिक्षणानंतर गोखले यांनी सरकारला तांत्रिक स्वरूपाच्या शिक्षणाची मागणी केली आहे. केंद्र सरकारने कृषि क्षेत्रांमध्ये २० लाख रुपये इतकी तरतूद केली आहे. त्याच वेळी सरकारने तांत्रिक व कौशल्यधिष्ठित शिक्षणास का प्राधान्य दिले नाही? असंही एक महत्वपूर्ण त्यांनी विचारलं आहे.
गोखले यांनी उच्च शिक्षण क्षेत्रांमध्ये विद्यापीठांची स्वायत्तता असण्याची मागणी केली आहे. विद्यापीठांवर सरकारी नियंत्रण ठेवणाऱ्या व्हाईसरॉय लॉर्ड कर्जन च्या ‘इंडियन युनिव्हर्सिटी अॅक्ट’ च्या सन १९०४ च्या कायद्याचा जोरदार निषेध केला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रांमध्ये राज्य सरकारचे स्थान महत्वाचे असल्याचे आपणास दिसून येते. अशाप्रकारे गोपाळकृष्ण गोखले यांनी शिक्षणाला राष्टरनिर्मितीमधील अत्यंत महत्वाचे साधन मानले आहे हेच यातून अधिक स्पष्ट होते. संपूर्ण प्राशासनिक तंत्रे ही केवळ विदेशी वर्गाच्या हाती आहे. अशा विपरीत स्थितीमध्ये भारतीय वर्गाला आपला विकास करणे आवश्यक आहे असे ना. गोपाळकृष्ण गोखले यांनी सरकरच्या निदर्शनास आणून दिले आहे.