शिंदे गटातील आणि भाजपातील मातब्बर नेत्याचे मंत्रिमंडळातील स्थान दिल्लीश्वरांच्या हाती…..

www.janvicharnews.com
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेऊन २१ दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र आजपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दोघेही आज दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहे. प्रश्न असा आहे की, शिंदे आणि फडणवीस सरकार दिल्लीतून चालते का?
केंद्रीय भाजपाने अचानकपणे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले…तिथेच महाराष्ट्र भाजपा कार्यकारणीला चेकमेट केले..
महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर न बसवता उपमुख्यमंत्री पदावर बसवले येथेच केंद्रीय नेतृत्वाचा वरचष्मा उघडपणे दिसून आला.
मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास का विलंब लावत आहेत..वारंवार दिल्लीच्या वाऱ्या का कराव्या लागतात यामुळे मुख्यमंत्री पदाचे अधिकार दिल्लीच्या इशाऱ्यावर अवलंबून आहेत कि काय अशी चर्चा होते आहे…
विद्यमान सरकारमध्ये भाजपाचे फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना देखील केंद्रीय कार्यकारणीने मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी अधिकार दिलेले नाही…
केंद्रीय भाजपाने शिंदे आणि फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवले परंतु मंत्रिमंडळातील सहकारी नेमण्याचा अधिकार दिला नाही..शिंदे गटाला आणि भाजपाला कोण-कोणती खाती तसेच कोणते खाते कोणाला दिले जाईल याची देखील चर्चा दिल्लीत होईल असे चित्र तूर्तास तरी दिसते आहे….