इतिहासाच्या पाऊलखुणा

 “कोनिहूर” या जगप्रसिद्ध हिऱ्याचा चर्चित इतिहास समजून घ्या  

कोहिनूर हा जगातील सर्वात प्रसिद्ध आणि जुना हिरा आहे. त्यामागचा इतिहास मोठा आणि महान आहे. कोहिनूर हे पर्शियन नाव आहे, ज्याचा अर्थ "प्रकाशाचा पर्वत" आहे. कोहिनूर हिर्‍याचा प्रथम उल्लेख 1306 मध्ये माळव्याच्या राजाच्या काळात झाला होता. हा हिरा अनेक शतके राजाच्या कुटुंबाकडे राहिला. हा अंडाकृती पांढर्‍या रंगाचा (लहान कोंबडीच्या अंड्याचा आकार) 186 कॅरेटचा हिरा आहे. ते पुन्हा कापल्यानंतर 105.6 कॅरेट शिल्लक आहे, जे टॉवर ऑफ लंडनमध्ये सुरक्षित आहे.

हैदराबाद संस्थानातील सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ

हैदराबाद संस्थानाचे निजामशाहीला हैदराबाद स्टेट म्हणून ओळखले जाते. मीर कमरुद्दीन कुलीखान आजम शाह निजाम उल मुल्क याने मोगल बादशाहच्या दुर्बलतेचा आणि राजकीय अस्तित्वाचा फायदा घेऊन दक्षिण भारतात हैदराबाद भागानगर येथे इसवीसन 1724 मध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली होती

औरंगजेबाच्या दाढीने मंदिराची सफाई करण्याची प्रथा

औरंगजेबाच्या कालखंडात जेव्हा हिंदू मंदिराविषयी फर्मान निघाले तेव्हा मथुरेतील कृष्णभक्तात भीतीचे वातावरण निर्माण होऊन तेथील मूर्ति इतरत्र हलविल्याशिवाय पर्याय नसल्याने वल्लभपंथीय दामोदरलाल उर्फ दाऊजी यांनी वृंदावनातील मूळ मूर्ति घेऊन राजस्थानचा प्रवास सुरू केला. आग्रा, बुंदी, किशनगड करत ते मेवाड परिसरातील चौपासनी गावात पोहोचले.

तेलंगणातील अरे मराठा

वेळ आणि काळ कसाही असो मराठे ज्याठिकाणी जातील तेथे आपले अस्तित्व कायम ठेवतात. पानिपत युद्धानंतर गुलाम म्हणून बलुचिस्तान प्रांतात नेलेला बुग्ती मराठा मुस्लिम बनविला गेलातरी त्याने आपला बाणा आणी भाषा बदलली नाही. तीच अवस्था हरियणाच्या पानिपत परिसरात राहणारा रोड मराठा आपली मराठी अस्मिता जपत जगतोय.

छत्रपतींच्या भोसले कुळाचे तथाकथित काल्पनिक सिसोदियाकरण व भोसलेंचे होयसळ मूळ!!

राज्याभिषेकापूर्वी शिवरायांनी बाळाजी आवजीस उदेपूरास धाडून वंशावळ करवीयली म्हणून त्या मागचे 'समाजशास्त्रीय' कारण व पारिस्थितीक विसंगतींची चिकित्सा न करता भोसलेंस सिसोदिया म्हणून घाईघाईने दाखवणारांनी पुढील तथ्यात्मक सवालांवर जरूर विचार करावाच

Latest news